AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राकेश झुनझुनवाला यांची अकासा एयर जूनपासून करणार उड्डाण, पाच वर्षात 72 विमानांपर्यंतचा आकडा गाठण्याची आशा!

राकेश झुनझुनवाला यांची एयरलाइन अकासा एयर या वर्षाच्या जून महिन्यापासून आपले कामकाज सुरू करेल अशी शक्यता वर्वण्यात आली आहे. या बद्दलची माहिती अकासा एयर चे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे यांनी दिली आहे.

राकेश झुनझुनवाला यांची अकासा एयर जूनपासून करणार उड्डाण, पाच वर्षात 72 विमानांपर्यंतचा आकडा गाठण्याची आशा!
Rakesh ZunzunwalaImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 26, 2022 | 7:31 PM
Share

नवी दिल्लीः राकेश झुनझुनवाला (Rakesh Zunzunwala) यांची एयरलाइन अकासा एयर या वर्षाच्या जून महिन्यापासून आपले काम काज सुरू करेल, अशी शक्यता वर्वण्यात आली आहे. अकासा एयरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे यांनी ‘विंग्स इंडिया 2022’ संमेलनाच्या एका सत्रात याबद्दल वक्तव्य केले. दुबे यांनी म्हटले की, जून महिन्यापासून एयरलाइन (Airline) ची पहिली व्यावसायिक उड्डाण (Flight) सुरू होण्याची शक्यता आहे. दुबे यांना विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना दुबे यांनी सांगितले की, सर्व नियम व अटी पूर्ण करण्याबाबत आणि विमान लायसन प्रक्रियासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) यांच्यासोबत बातचीत चालू आहे.

शुक्रवारी आयोजित केल्या गेलेल्या या चर्चासत्रामध्ये दुबे यांनी सांगितले की, येणाऱ्या 5 वर्षांमध्ये एअरलाईन्सकडे 72 विमानं उड्डाणासाठी असतील अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली आहे. वाहतूक सुरू होण्यापूर्वीच 12 महिन्याची योजना 18 विमानं उड्डाणा साठी सज्ज करण्याची आहे. त्यानंतर प्रत्येक वर्षी एअरलाइन 12 ते 14 विमान नव्याने उड्डाणासाठी तयार ठेवेल अशी योजना आखत आहोत,असे देखील त्यांनी सांगितले.

महानगरांमध्ये देखील विमानाची केली जाईल उड्डाणे..

सत्रामध्ये दुबे यांनी सांगितले की, उड्डाणे सुरू करण्यासाठी आणि लोकांच्या प्रत्यक्ष सेवेमध्ये येण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. सुरवातीच्या काळामध्ये अकासा विमानांची उड्डाणे हे मेट्रो महानगरांमध्ये टियर-2 आणि टियर-3 शहरांसाठी असेल याशिवाय महानगरांमध्येदेखील विमानांची उड्डाणे लवकरच सुरू केली जातील. भारतीय हवाई क्षेत्रातील या नव्या एअरलाइनला ऑक्टोंबर 2021 मध्ये नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून हवाई उड्डाणा साठी ना-हरकत प्रमाणपत्र दिले गेले.

इंडिगो एयरलाइनचे वर्चस्व

आपणास सांगू इच्छितो की, अकासा एयर देशात खूपच कमी दरात (अल्ट्रा लो कॉस्ट) फ्लाइट सर्विस सुरू करेल असा दावा करत आहे. भारताच्या एविएशन मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा चालू आहे ,ज्यात छोट्या-मोठ्या कंपनी आपल्या सेवा देत आहेत. अकासा देखील या छोट्या मोठ्या कंपन्यांमधील एक कंपनी आहे. सध्या भारताच्या एविएशन मार्केट मध्ये इंटर ग्लोब एविएशन लिमिटेड ची इंडिगो एयरलाइन चे सगळी कडे वर्चस्व पाहायला मिळत आहे.

हे रंग उष्णता आणि उर्जा यांचे प्रतिक

अल्ट्रा लो कॉस्ट केरियर किंवा यूएलसीसी अंतर्गत येणारे एयरलाइन कमी दरात बिजनेस मॉडल आधारावर कार्य करतात. लो कॉस्ट केरियर आणि फुल सर्विस करियरच्या तुलनेत अल्ट्रा लो कॉस्ट केरियरचे यूनिट कॉस्ट आणि कमाई कमी होते. अकासा एयर कंपनीदेखील याच श्रेणीमध्ये येते. अकासा एयरने केलेल्या वक्तव्यनुसार ,एयरलाइनने ब्रॅण्डिंगसाठी ‘सनराइज ऑरेंज’ आणि‘पैशनेट पर्पल’ रंगाची निवड केली आहे. हे रंग उष्णता आणि उर्जा यांचे प्रतिक मानले जातात.

संबंधित बातम्या

2 रिसॉर्ट, 2 नेते, 200 गाड्या आणि 400 कार्यकर्ते, दापोलीतल्या मेगानाट्यात नक्की घडतंय काय?

Falaknuma Express train accident: मोठा अपघात होता होता टळला; चालत्या ट्रेनच्या तीन बोगी वेगळ्या झाल्या

Petrol Diesel नंतर आता आणखी एक फटका! पॅरासिटेमॉलसह 800 औषधं महागणार, असं नेमकं का होणार?

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.