टाटांच्या गाडीला ‘सुमो’ नाव कसे पडले? हे जपानी नाव नव्हे तर मराठी व्यक्तीच्या कार्याचा रतन टाटांनी केला गौरव

How did Tata Sumo get its name: सुमंत मूळगावकर यांचा 1 जुलै 1989 रोजी मृत्यू झाला. परंतु टाटा समूह त्यांना विसरला नव्हता. 1994 मध्ये टाटा समुहाची दणकट गाडी लाँच झाली. मग रतन टाटा यांनी त्यांच्या या कर्मचाऱ्यांचे नाव त्या गाडीला दिले. त्यांच्या नाव आणि आडनावाच्या अद्याअक्षरावरुन त्या गाडीला सुमो नाव दिले.

टाटांच्या गाडीला 'सुमो' नाव कसे पडले? हे जपानी नाव नव्हे तर मराठी व्यक्तीच्या कार्याचा रतन टाटांनी केला गौरव
Sumant Moolgaokar and Ratan Tata
Follow us
| Updated on: Oct 18, 2024 | 10:55 AM

भारतीय उद्योगपती रतन टाटा यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाच्या धक्क्यातून देश अजूनही सावरु शकला नाही. पण फक्त रतन टाटाच नाही तर त्यांच्यापूर्वी जे जे व्यक्ती चेअरमन झाले त्यांनी देश अन् समाज यांनाच प्राधान्य दिले. व्यक्तीने केलेल्या कार्याची नेहमी दखल घेतली. त्यांचा गौरव केला आहे. कधीकाळी भारतीय वाहन बाजारपेठेच वर्चस्व गाजवणाऱ्या टाटा सुमो गाडीला हे नाव पडले तरी कसे? कोणालाही सुमो हे नाव जपानी वाटते. परंतु सुमोचा आणि जपानचा काहीच संबंध नाही. टाटा समुहाने एका मराठी व्यक्तीचा केलेला हा गौरव आहे. ते मराठी व्यक्ती म्हणजे पद्मभूषण सुमंत मूळगावकर होय. त्यांच्या नावाच्या अद्याक्षरावरुन सुमो हे नाव दिले. त्यांनी टेल्को आणि टाटा मोटर्सच्या उभारणीत दिलेल्या योगदानाचा गौरव म्हणून हा सन्मान दिला गेला.

कोण आहेत सुमंत मूळगावकर

सुमंत मूळगावकर यांचा जन्म 5 मार्च 1906 रोजी मुंबईत झाला. त्यांनी इम्पिरियल कॉलेज ऑफ लंडनमधून अभियांत्रिकी शिक्षण घेतले. सुमंत मूळगावकर हे एसीसी सिमेंटमध्ये काम करत होते. त्यावेळी जेआरडी टाटा यांनी त्यांना संपर्क केला. किती दिवस तुम्ही विटा चिपकवण्याचे काम करणार? असे त्यांना सांगितले. तसेच एससीसी सिमेंटचे चेअरमन सर होमी मोदी यांना सुमंत मूळगावकर यांना सोडण्याची विनंती केली. परंतु सर होमी मोदी यांनी नकार दिला. परंतु जेआरडी आपल्या मागणीवर ठाम राहिले. अखेर सुमंत मूळगावकर टाटा कंपनीत रुजू झाले.

भारत सरकारने दिला पद्मभूषण

सुमंत मूळगावकर 1949 मध्ये टाटाच्या टाटा इंजिनीअरिंग आणि लोकोमोटिव्ह कंपनी म्हणजे टेल्कोमध्ये प्रभारी संचालक म्हणून रुजू झाले. 1954 मध्ये टाटाच्या ट्रक निर्मिती प्रकल्पात त्यांचा महत्वाचा सहभाग होता. 1966 मध्ये टेल्को प्रकल्पाची उभारणी केली. त्यांनी टाटाच्या ट्रकमध्ये लक्षणीय सुधारणा केल्या. त्यामुळे ग्राहकांच्या पसंतीला या ट्रक आल्या. ते टाटा स्टीलचे उपाध्यक्ष देखील होते. त्यांनी केलेल्या कामांमुळे 1990 मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मभूषण हा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला.

हे सुद्धा वाचा

रतन टाटा यांनी दिले सुमो नाव

सुमंत मूळगावकर यांचा 1 जुलै 1989 रोजी मृत्यू झाला. परंतु टाटा समूह त्यांना विसरला नव्हता. 1994 मध्ये टाटा समुहाची दणकट गाडी लाँच झाली. मग रतन टाटा यांनी त्यांच्या या कर्मचाऱ्यांचे नाव त्या गाडीला दिले. त्यांच्या नाव आणि आडनावाच्या अद्याअक्षरावरुन त्या गाडीला सुमो नाव दिले. एखाद्या कर्मचाऱ्यांचे कौतूक करण्याचा दिलदारपणा दिवंगत रतन टाटां यांच्याशिवाय आणखी कोण करणार? त्यानंतर टाटांची सुमो शहरापासून ग्रामीण भागापर्यंत लोकप्रिय झाली.

Non Stop LIVE Update
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.
मुंबईत सर्वाधिक मतदान 'या' मतदारसंघात तर सर्वात कमी मतदान कुठे?
मुंबईत सर्वाधिक मतदान 'या' मतदारसंघात तर सर्वात कमी मतदान कुठे?.
सत्ता स्थापनेबाबत महायुतीच्या मंत्र्याचं मोठं वक्तव्य, 'गरज पडल्यास..'
सत्ता स्थापनेबाबत महायुतीच्या मंत्र्याचं मोठं वक्तव्य, 'गरज पडल्यास..'.