आणखी एका सहकारी बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई, बँकेचा परवाना रद्द; चेक करा तुमचे खाते तर ‘या’ बँकेत नाहीना?
भारताची मध्यवर्ती बँके असलेल्या भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (Reserve Bank of India) आणखी एका सहकारी बँकेवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. आरबीआयने या बँकेचा परवाना रद्द केला आहे. त्यामुळे बँकेच्या ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
मुंबई : भारताची मध्यवर्ती बँके असलेल्या भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (Reserve Bank of India) आणखी एका सहकारी बँकेवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. आरबीआयने सांगलीच्या सर्जेरावदादा नाईक शिराळा सहकारी बँकेचा (Sarjeraodada Naik Shirala Sahakari Bank) परवाना रद्द केला आहे. बँकेकडे व्यवहारासाठी पर्याप्त भांडवल नसल्यामुळे आरबीआयने या बँकेचा परवाना रद्द केला आहे. आयबीआयने दिलेल्या माहितीनुसार बँकेकडे व्यवहारासाठी पर्याप्त भांडवल नसल्यामुळे तसेच आरबीआयने घालून दिलेल्या नियमाचे उल्लंघन झाल्याप्रकरणी बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. बँकेचा परवाना रद्द करण्यात आल्यामुळे आता या बँकेला यापुढे कोणताही आर्थिक व्यवहार करता येणार नाही. बँकेवर अचानक कारवाई झाल्यामुळे खातेदारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान यापूर्वी आरबीआयकडून महाराष्ट्र इंडिपेंडंस को – ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (Independence Co-operative Bank Ltd) या बँकेचा देखील परवाना रद्द करण्यात आला आहे.
पाच लाखांपर्यंतची रक्कम मिळणार
सांगलीच्या सर्जेरावदादा नाईक शिराळा सहकारी बँकेवर आरबीआयच्या वतीने कारवाई करण्यात आली. या बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. परवाना रद्द केल्यामुळे आता ही बँक कुठलेही आर्थिक व्यवहार करू शकणार नाही. आरबीआयच्या या कारवाईने खातेदारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर स्पष्टीकरण देताना आरबीआयने म्हटले आहे की, प्रत्येक खातेदाराला त्याने जर पाच लाखांच्या आत रक्कम ठेवली असेल तर ती संपूर्ण रक्कम किंवा पाच लाखांपेक्षा अधिक रक्कम असेल तर पाच लाख रुपये मिळतील. ही रक्कम खातेदारांच्या दुसऱ्या बँक खात्यावर जमा केली जाईल.
अन्य दोन बँकांवर कारवाई
दरम्यान आरबीआयने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन तसेच बँकिंग व्यवहारात आढळलेली अनियमितता प्रकरणात अन्य दोन बँकांवर देखील एक मार्च रोजी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये नागरिक सहकारी बँक आणि जिल्हा सहकारी केंद्रीय बँक मर्यादीत पन्ना या दोन बँकांचा समावेश आहे. दोनही बँकांकडून एकूण साडेपाच लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या
पुढील आठवड्यात इंधन दरवाढ; पेट्रोलचे भाव नऊ रुपयांनी वाढणार?
7 लाखांचा विमा तोही अगदी मोफत; जाणून घ्या ‘ईडीएलआय’बद्दल
शेअर बाजाराला युद्धाचे ग्रहण, बाजार कधी सावरणार? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात