आता इंटरनेटशिवायही वापरता येणार UPI सेवा! RBI कडून फीचर फोनसाठी यूपीआय सेवा सुरु

भारतीय रिझर्व बँकेचे (Reserve Bank of India) गवर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी एका नवीन सेवेची घोषणा केली आहे. या सेवेच्या माध्यमातून 40 कोटी पेक्षा अधिक फीचर फोन (Feature Phone) किंवा सामान्य मोबाईल फोन द्वारे आपण डिजिटल व्यवहार करू शकतो.

आता इंटरनेटशिवायही वापरता येणार UPI सेवा! RBI कडून फीचर फोनसाठी यूपीआय सेवा सुरु
Follow us
| Updated on: Mar 08, 2022 | 7:26 PM

मुंबई : भारतीय रिझर्व बँकेचे (Reserve Bank of India) गवर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी एका नवीन सेवेची घोषणा केली आहे. या सेवेच्या माध्यमातून 40 कोटी पेक्षा अधिक फीचर फोन (Feature Phone) किंवा सामान्य मोबाईल फोन द्वारे आपण डिजिटल व्यवहार करू शकतो. ज्या व्यक्तींकडे इंटरनेट कनेक्शन नाही अशा व्यक्ती “यूपीआय 123 पे”( UPI 123 pay) नावाने सुरू केलेल्या सेवेच्या माध्यमातून डिजिटल व्यवहार करू शकतात. दास यांनी म्हटले की, आतापर्यंत यूपीआय ही सेवा प्रामुख्याने स्मार्टफोनमध्ये आपल्याला पाहायला मिळत होती. या सेवेचा उपयोग फक्त ठराविक वर्ग करत होता परंतु समाजातील खालच्या थरापर्यंत ही सेवा पोहोचत नव्हती. या समाजातील अनेक लोकांना या सेवेचा पूर्णपणे लाभ घेता येत नव्हता, आता मात्र तसे होणार नाही. यूपीआय सेवा ही प्रत्येक वर्गातील व्यक्ती वापरण्यासाठी तत्पर राहतील म्हणूनच ही सेवा ग्रामीण भागातील नागरिकांना लाभदायक ठरणार आहे.

दास यांनी म्हटले की आर्थिक वर्ष 2021 22 मध्ये आतापर्यंत यूपीआय व्यवहार 76 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला त्याचबरोबर गेल्या वर्षी हा आकडा 41 लाख कोटी रुपये इतका होता. येणाऱ्या दिवसांमध्ये हा व्यवहाराचा आकडा 100 लाख कोटींच्या पुढे जाईल अशी शक्यता दास यांनी वर्तवली आहे. एका अंदाजानुसार देशामध्ये 40 कोटी मोबाईल फोन वापरकर्त्यांकडे सामान्य फीचर फोन आहे. डेप्यूटी गवर्नर टी रविशंकर यांच्या मते, सध्या यूपीआय सेवा यूएसएसडी आधारित सेवांच्या माध्यमातून काही वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. ही प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आहे. या प्रक्रियेचा सर्वसामान्य व्यक्तीला लाभ घेता येत नाही आणि म्हणूनच सर्व मोबाईल धारकांना ही सेवा वापरता देखील येत नाही.

आरबीआयच्या मते, फिचर फोन वापरकर्ते आता चार तांत्रिक पर्यायाच्या आधारावर कोणत्याही प्रकारचे व्यवहार करू शकतात.

  • आयव्हीआर (इंटरअॅक्टिव्ह व्हाईस रिस्पॉन्स) नंबरवर कॉल करणे
  • फीचर फोनमध्ये ॲपची कार्यक्षमता
  • मिस्ड कॉल आधारित सेवा
  • प्रॉकिस्मिटी साउंड बेस्ट पेमेंट

इंटरनेट शिवाय प्रियजनांसोबत करू शकतो व्यवहार.

UPI 123Pay ग्राहकांना स्कॅन आणि व्यवहार सोडून सर्व प्रकारचे व्यवहार करण्यासाठी फिचर फोनचा वापर करण्यास परवानगी देते. अशा प्रकारचे व्यवहार करण्यासाठी आपल्याला इंटरनेटची आवश्यकता नाही. ही सेवा वापरताना ग्राहकांना आपले बँक खाते फिचर फोन सोबत लिंक करावे लागेल. फीचर फोन वापरकर्ते आता फक्त चार तांत्रिक पर्यायांच्या आधारावर व्यवहार करण्यास सक्षम ठरतील. ग्राहक आपले बँक खाते लिंक करणे, यूपीआय पिन सेट करणे किंवा बदलणे अशा प्रकारच्या गोष्टी सुद्धा आपण करू शकतो.

या सेवेच्या माध्यमातून युजर्स त्यांचे मित्र आणि आप्तेष्टांना पैसे पाठवू शकतात. वेगवेगळ्या प्रकारचे बिल भरू शकतात आणि गाड्यांवरील फास्ट टॅग रिचार्ज करणे, मोबाईल रिचार्ज करणे यांसारख्या अनेक प्रकारचे व्यवहार आपण या सुविधाच्या माध्यमातून करू शकतो.

आरबीाय गव्हर्नर दास यांनी डिजिटल पेमेंटसाठी एक नवीन हेल्पलाइन देखील सुरू केली आहे. ज्यास भारतीय राष्ट्रीय भुगतान निगम (NPCI) ने तयार केले आहे. ‘डिजीसाथी’ (Digisaathi) नावाच्या या हेल्पलाइन मदतीने वेबसाइट ‘डिजीसाथी डॉट कॉम’ (www.digisaathi.info) आणि फोन नंबर – ‘14431’ व ‘1800 891 3333’ आधारे माहिती प्राप्त करू शकतो.

इतर बातम्या

Two-wheeler sales fell : दुचाकीचे चाक ‘रुतले’! विक्री प्रचंड घटली, काय कारणं? वाचा सविस्तर

Airtel-Axis Bank चे क्रेडिट कार्ड, फायद्याचे भंडार

Share Market | 4 दिवसांत 6% पेक्षा जास्त पडझड! गुंतवणूकदारांचे तब्ब 11.28 लाख कोटी बुडाले

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.