HDFC बँकेला RBI ने दिला मोठा झटका, या प्रकरणात लावला 10 लाखांचा दंड
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एचडीएफसी (HDFC) बँकेला मोठा दणका दिला आहे.
नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) एचडीएफसी (HDFC) बँकेला मोठा दणका दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, RBI ने रिझर्व्ह बँकेला दहा लाखांचा दंड ठोठावला आहे. एचसीएफसी बँक (HDFC Bank) सब्सिडीअरी जनरल लेजर (Subsidiary General Ledger) मध्ये आवश्यक ते किमान शिल्लक राखू शकली नाही. त्यामुळे एसजीएल (सबसिडीरी जनरल लेजर) मध्ये वाढ झाली आहे. यामुळे बँकेला हा दंड आकारण्यात आला आहे. एचडीएफसीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये (Stock Exchange Filing) ही माहिती दिली आहे. (rbi imposes fine on hdfc bank of rs 10 lakh)
आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, 9 डिसेंबर रोजी एचडीएफसी बँकेला आदेश देण्यात आले होते. याची माहिती 10 डिसेंबर रोजी उघडकीसदेखील करण्यात आली होती. आरबीआयने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, एचजीएफसीने (SGL) एसजीएलमधील वाढीसाठी दहा लाख रुपये (आर्थिक) दंड आकारला आहे. इतकंच नाही तर या आदेशानंतर 19 नोव्हेंबर रोजी बँकेच्या सीएसजीएल खात्यातील सिक्युरिटीजची शिल्लक काही प्रमाणात कमी करण्यात आला आहे. यामुळे शुक्रवारी एचडीएफसी बँकेचे शेअर्स 1,390.05 रुपयांवर उघडले.
याआधीही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) एचडीएफसी बँकेला डिजिटल व्यवसायातील कामं आणि नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यावर तात्पुरती बंदी घालण्यास सांगितलं होतं. एचडीएफसीच्या डेटा सेंटरच्या गेल्या महिन्यातील कामकाजामुळे केंद्रीय बँकेने हा आदेश दिला होता.
यावर एचडीएफसी बँकेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षात आपली आयटी प्रणाली आणखी मजबूत करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या असून उर्वरित काम जलद गतीने पूर्ण करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. खरंतर, डिजिटल बँकिंगमध्ये हल्ली समस्या सोडवण्यासाठी ठोस पावलं उचलली जात असल्याचं बँकेनं म्हटलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन नियामक निर्णयाचा सध्या चालू असलेल्या क्रेडिट कार्ड, डिजिटल बँकिंग माध्यमांवर आणि चालू कामांवर कोणताही परिणाम होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. (rbi imposes fine on hdfc bank of rs 10 lakh)
इतर बातम्या –
आधार कार्डला पॅन लिंक केलात का? नाहीतर द्यावा लागेल 10 हजाराचा दंड, डेडलाईन संपतेय!
सोन्याच्या दराचा शत्रू कोण? का घसरतोय सातत्यानं भाव?
(rbi imposes fine on hdfc bank of rs 10 lakh)