डिसेंबरपर्यंत येऊ शकते आरबीआयची स्वतःची क्रिप्टोकरन्सी! गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे मोठे विधान

ग्लोबल क्रिप्टो अॅडॉप्शन इंडेक्स 2021 मध्ये भारताचा दुसरा क्रमांक आहे. त्याने चीन, अमेरिका, यूके आणि इंग्लंड सारख्या देशांना मागे टाकले आहे. जून 2020 ते जुलै 2021 दरम्यान क्रिप्टोकरन्सीच्या स्वीकृती दरात 880 टक्के वाढ झाली आहे.

डिसेंबरपर्यंत येऊ शकते आरबीआयची स्वतःची क्रिप्टोकरन्सी! गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे मोठे विधान
डिसेंबरपर्यंत येऊ शकते आरबीआयची स्वतःची क्रिप्टोकरन्सी!
Follow us
| Updated on: Aug 27, 2021 | 5:46 PM

Shaktikanta Das on Digital Currency नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँक आपल्या डिजिटल चलनावर बऱ्याच काळापासून काम करत आहे. सीएनबीसीशी बोलताना गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, डिसेंबर 2021 पर्यंत आरबीआय आपल्या डिजिटल चलनासाठी चाचणी कार्यक्रम सुरू करू शकते. जगभरातील केंद्रीय बँका या दिशेने काम करत आहेत. चीन, युरोप आणि यूकेची सेंट्रल बँक क्रिप्टोकरन्सीच्या व्यावसायिक आणि सार्वजनिक वापरासाठी शक्यतांवर विचार करीत आहे. (RBI’s own cryptocurrency may come by December, Governor Shaktikant Das’s big statement)

कोणत्याही केंद्रीय बँकेने जारी केलेल्या डिजिटल चलन किंवा क्रिप्टोकरन्सीला CBDC (central bank digital currencies) असे नाव देण्यात आले आहे. या चलनाला पूर्ण कायदेशीर मान्यता असेल. सध्याच्या फिएट चलनाची ही डिजिटल आवृत्ती असेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आपण सीबीडीसीबद्दल खूप सावध आहोत, कारण ती पूर्णपणे नवीन संकल्पना आहे, शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केले.

आर्थिक व्यवस्थेवर परिणाम मूल्यांकन

डिजिटल चलनाच्या विविध पैलूंवर रिझर्व्ह बँक गांभीर्याने विचार करत आहे. सर्वप्रथम ते प्रत्येक प्रकारे सुरक्षित असले पाहिजे. या व्यतिरिक्त, त्याचा भारतीय वित्तीय व्यवस्थेवर कोणताही नकारात्मक परिणाम होऊ नये. विशेषतः कोरोनानंतर, अर्थव्यवस्थेवर अजूनही दबाव आहे. अशा स्थितीत, सेंट्रल बँक आर्थिक बाजाराबाबत अत्यंत सावध आहे.

क्रिप्टोकरन्सी अॅडॉप्शन इंडेक्समध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर

सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने बंदी हटवल्यानंतर क्रिप्टोकरन्सीसंबंधी भारतातील क्रेझ खूप वाढली आहे. ग्लोबल क्रिप्टो अॅडॉप्शन इंडेक्स 2021 मध्ये भारताचा दुसरा क्रमांक आहे. त्याने चीन, अमेरिका, यूके आणि इंग्लंड सारख्या देशांना मागे टाकले आहे. जून 2020 ते जुलै 2021 दरम्यान क्रिप्टोकरन्सीच्या स्वीकृती दरात 880 टक्के वाढ झाली आहे. 2019 च्या तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत (ऑक्टोबर-डिसेंबर 2019), त्यात 2300 टक्के ऐतिहासिक वाढ नोंदवण्यात आली आहे.

विविध पैलूंवर काम चालू

ऑगस्टमध्ये चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीनंतर डेप्युटी गव्हर्नर टी रबी शंकर म्हणाले होते की रिझर्व्ह बँक या वर्षाच्या अखेरीस कायदेशीर डिजिटल चलनाचे ऑपरेशनचे मॉडेल आणू शकते. ते म्हणाले होते की, या चलनाच्या सर्व बाबींवर तंत्रज्ञान, वितरण यंत्रणा, प्रमाणीकरण यंत्रणा यांवर काम केले जात आहे. 22 जुलै रोजी ते म्हणाले की भारत टप्प्याटप्प्याने डिजिटल चलन सुरू करण्याचा विचार करत आहे.

खाजगी क्रिप्टोकरन्सीबाबत चिंता कायम – दास

शंकर म्हणाले की, डिजिटल चलनावर अनेक वर्षांपासून काम सुरू आहे. तथापि, बिटकॉइन आणि इथेरियम सारख्या खाजगी क्रिप्टोकरन्सीच्या वाढत्या लोकप्रियतेने लक्ष वेधले आहे. या सर्व क्रिप्टोकरन्सी ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित आहेत. एमपीसीच्या पत्रकार परिषदेत गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, केंद्रीय बँकेची चिंता खाजगी क्रिप्टोकरन्सीबाबत आहे. ते म्हणाले की ते अद्याप नियंत्रित केले गेले नाही आणि ही बाब सरकारशीही शेअर केली गेली आहे. (RBI’s own cryptocurrency may come by December, Governor Shaktikant Das’s big statement)

इतर बातम्या

Tokyo Paralympics: भाविना पटेलची ऐतिहासिक कामगिरी, टेबल टेनिसच्या सेमीफायनलमध्ये एन्ट्री, अशी कामगिरी करणारी पहिली भारतीय

दोन एसटी कर्मचाऱ्यांमध्ये वाद, औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकात गोंधळ

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.