देश विकासाच्या पुढच्या टप्प्यावर जाण्यासाठी सज्ज, SBI चे अध्यक्ष दिनेश कुमार खारांचं मोठं विधान
दुबई येथे आयोजित एक्स्पो 2020 दरम्यान भारतीय पॅव्हेलियनमध्ये खारा म्हणाले की, देशाने ज्या प्रकारची लसीकरण मोहीम राबवली, ती सर्व भारतीयांना अभिमानास्पद आहे. विशेषत: देशांतर्गत बनवलेल्या लसीचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे.

दुबई : कोविड 19 लसीकरण कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे भारत विकासाच्या पुढील टप्प्यात जाण्यासाठी सज्ज आहे, अशी माहिती देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI चे अध्यक्ष दिनेश कुमार खारा यांनी दिली. दुबई येथे आयोजित एक्स्पो 2020 दरम्यान भारतीय पॅव्हेलियनमध्ये खारा म्हणाले की, देशाने ज्या प्रकारची लसीकरण मोहीम राबवली, ती सर्व भारतीयांना अभिमानास्पद आहे. विशेषत: देशांतर्गत बनवलेल्या लसीचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे.
अर्थव्यवस्थेतील पतवाढ गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत खूपच कमी
ते म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून देशात अर्थव्यवस्थेतील पतवाढ खूपच कमी आहे. आता क्षमता वापरात सुधारणा होईल आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील गुंतवणुकीची मागणी पुनरुज्जीवित होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीवर भर
SBI चेअरमन म्हणाले, “सरकारने पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करून एक उत्तम काम केले, ज्याने अर्थव्यवस्थेच्या मुख्य क्षेत्रांना चालना देण्यासाठी खूप मोठा पल्ला गाठला. खासगी कॉर्पोरेट क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे भारताची अर्थव्यवस्था निश्चितपणे विकासाच्या पुढील टप्प्यात जाईल.” ते म्हणाले की, एक्स्पो 2020 मधील देशातील पॅव्हेलियन वास्तविक भारताचे सादरीकरण करत आहे, जो संधींनी परिपूर्ण आहे.
जर अर्थव्यवस्थेला वेग आला तर महसुलात वाढ होणार
लसीकरणामुळे आर्थिक सुधारणेची गती खूप वेगवान आहे. या आर्थिक वर्षात अंदाजापेक्षा जास्त कमाई होईल, असा सरकारचा अंदाज आहे. 2021-22 या आर्थिक वर्षासाठी सरकारने 15.45 लाख कोटी रुपयांचे महसूल लक्ष्य ठेवले. चार वर्षांनंतर पहिल्यांदाच अपेक्षेपेक्षा जास्त पैसा सरकारी तिजोरीत येईल, असे मानले जाते. हा पैसा सरकार वित्तीय तूट कमी करण्यासाठी वापरणार नाही. दोन विश्वसनीय सरकारी सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे.
RBI ने विकासदराचा अंदाज कमी
आरबीआयने चालू आर्थिक वर्षातील वाढीचा अंदाज 10.5 टक्क्यांवरून 9.5 टक्क्यांपर्यंत कमी केला, तर IMF ने 2021 मध्ये 9.5 टक्के आणि पुढील वर्षात 8.5 टक्के वाढीचा अंदाज वर्तवला आहे.
संबंधित बातम्या
राकेश झुनझुनवालांचा सल्ला, प्रत्येकाने शेअर बाजारात गुंतवणूक करावी, सांगितली महत्त्वाची ‘कारणे’
आयकर विभागाची महाराष्ट्रातील ‘या’ बँकेच्या 53.72 कोटींच्या व्यवहारांवर बंदी, तुमचंही खातं नाही ना?