AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नेटफ्लिक्स, हॉटस्टार, अ‍ॅमेझॉनला टक्कर देण्यासाठी रिलायन्स सज्ज

रिपोर्टनुसार रिलायन्स मीडिया बिझनेसमध्ये मोठी गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक झाली तर अ‍ॅमेझॉन, नेटफ्लिक्स आणि हॉटस्टारला तगडी स्पर्धा निर्माण होईल.

नेटफ्लिक्स, हॉटस्टार, अ‍ॅमेझॉनला टक्कर देण्यासाठी रिलायन्स सज्ज
Reliance IndustriesImage Credit source: twitter
| Edited By: | Updated on: Jan 26, 2022 | 9:35 PM
Share

देशाची सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज( RIL) लिमिटेड आता मीडिया बिझनेसला ( Media Business) मजबूत करण्यासाठी गुंतवणूकदारांकडून 12000 कोटी रूपये जमा करण्याची योजना आखत आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार रिलायन्स इंडस्ट्रीज स्वतःसोबत गुंतवणूकदारांना सहभागी करून घेत ब्रॉडकास्टिंग आणि डिजिटल मीडिया या दोन्ही बिझनेसला दुपटीने वाढवायचे नियोजन करत आहे. याशिवाय कंपनी मीडिया व्यवसायात स्वतःची गुंतवणूक करणार आहे. मनीकंट्रोलच्या एका रिपोर्टनुसार रिलायन्स इंडस्ट्रीज ब्रॉडकास्टिंग आणि डिजिटल मीडियाला प्रयत्नपूर्वक मीडिया बिझनेस वाढवायचा आहे. रिलायन्स मोठी गुंतवणूक करून अँमेझॉन, नेटफ्लिक्स, हॉटस्टारला स्पर्धा देण्याच्या तयारीत आहे.

मीडिया बिझनेसमध्ये रिलायन्सचा अधिक वाटा

रिपोर्टमध्ये अज्ञात सूत्रांच्या माहितीनुसार रिलायन्सने स्टार आणि डिझ्नी इंडियाचे माजी अध्यक्ष उदय शंकर आणि मीडिया तज्ज्ञ जेम्स मर्डोक यांना मीडिया बिझनेसची रणनीती ठरवण्यासाठी सहभागी करून घेतले आहे. मीडिया बिझनेसच्या विकासात योगदान देण्यासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची असेल.  रिपोर्टमध्ये पुढे म्हटले आहे की, रिलायन्सच्या डिसरप्शन स्ट्रँटिजी जियो( JIO) सोबत डिजिटल व्यवसायात समान सहभागी असतील. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मीडिया बिझनेसमध्ये रिलायन्सचा अधिक वाटा असेल तर वायकॉमचा वाटा हा कमी असणार आहे.

अ‍ॅमेझॉन, नेटफ्लिक्सला तगडी स्पर्धा

वायकॉम 18, नेटवर्क 18 आणि वायकॉमसीबीएस यांचे एकत्रित व्हेंचर आहे. यामध्ये नेटवर्क 18 चा 51 % आणि वायकॉमसीबीएस 49% वाटा आहे. वायकॉम 18 हे 52 चँनलची ऑफर देऊन महिन्याला जवळपास 6 कोटी भारतीयांपर्यंत पोचणार आहे. त्यामुळे आता हे भरतामध्ये सर्वात मोठे मनोरंजन नेटवर्क तयार होणार आहे. यामाध्यमातून  अ‍ॅमेझॉन, नेटफ्लिक्स आणि हॉटस्टारला तगडी स्पर्धा निर्माण होईल हे नक्की.

संबंधित बातम्या

टीसीएसचा जागतिक ठसा, आयटीमधील जगातील दुसरी सर्वात मोठी कंपनी!

Gold price Today : सोन्यात गुंतवणूक करायची? जाणून घ्या- मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांतील आजचे भाव

OYOचा IPO लवकरच बाजारात, बीएसई, एनएसई मध्ये लवकरच समावेश, मंजुरी मिळाली

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.