मुकेश अंबानी यांचा नवीन उद्योग, एसी, फ्रिज अन् LED ब्लब बनवणार

Mukesh Ambani turns to 'Wyzr': रिलायन्सकडून वाइजर ब्रॅण्ड अंतर्गत कुलर लॉन्च करण्यात आला आहे. कंपनीची योजना या ब्रँडचा विस्तार करण्याची आहे. त्यासाठी रिलायन्स या ब्रॅण्ड अंतर्गत टीव्ही, फ्रिज, एसी, वॉशिंग मशीन, एलईडी बल्ब बनवणार आहे. हे ब्रॅण्ड बाजारात आपले स्थान निर्माण केल्यानंतर रिलायन्स स्वत:चे उत्पादन युनिट सुरु करणार आहे.

मुकेश अंबानी यांचा नवीन उद्योग, एसी, फ्रिज अन् LED ब्लब बनवणार
mukesh ambani
Follow us
| Updated on: Apr 24, 2024 | 10:22 AM

देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्सने आपला तिमाही आर्थिक निकाल जाहीर केला. कंपनीने प्रत्येक भागधारकास दहा रुपये लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक असणारे मुकेश अंबानी यांनी नवीन क्षेत्रात पाऊल टाकण्याची रणनीती तयार केली आहे. देशात वाढत जाणाऱ्या कंज्युमर इलेक्ट्रॉनिक्स आणि होम अप्लायंस उद्योगात रिलायन्स उतरणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज एलईडी बल्बपासून एसी अन् फ्रिज बनवणार आहे. यासंदर्भात इकोनॉमिक्स टाईम्सने वृत्त दिले आहे.

काय आहे मुकेश अंबानी यांची योजना

रिलायन्स इंडस्ट्रीजचे लक्ष विदेशी कंपन्यांचे वर्चस्व असलेल्या कंज्युमर इलेक्ट्रॉनिक्स आणि होम अप्लायंस क्षेत्राकडे लागले आहे. या क्षेत्रात विदेशी कंपन्यांना आव्हान देण्याचा निर्णय रिलायन्सने घेतला आहे. रिलायन्स वाइजर (Wyzr) ब्रँड अंतर्गत मेड-इन-इंडिया प्रॉडक्ट लॉन्च करणार आहे. मुकेश अंबानी यांच्या या योजनेनुसार येत्या दिवसांत एलईडी बल्ब, टीव्ही, एसी, फ्रिज, वॉशिंग मशीन यासारखे प्रॉडक्ट लॉन्च होणार आहे.

वाइजर ब्रँड असणार

रिलायन्स कंपनीने मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रॉडक्शन फायनल करण्यासाठी बोलणी सुरु केली आहेत. आता वाइजर ब्रँड अंतर्गत कंज्युमर इलेक्ट्रॉनिक्स आणि होम अप्लायंस देशांतर्गत कंपन्यांसोबत डिक्सॉन टेक्नोलॉजीज आणि मर्क इलेक्ट्रॉनिक्स (ओनिडाची पॅरेंट कंपनी) करार करण्याचे काम सुरु केले आहे.

हे सुद्धा वाचा

रिलायन्सकडून नुकताच कुलर लॉन्च

रिलायन्सकडून वाइजर ब्रॅण्ड अंतर्गत कुलर लॉन्च करण्यात आला आहे. कंपनीची योजना या ब्रँडचा विस्तार करण्याची आहे. त्यासाठी रिलायन्स या ब्रॅण्ड अंतर्गत टीव्ही, फ्रिज, एसी, वॉशिंग मशीन, एलईडी बल्ब बनवणार आहे. हे ब्रॅण्ड बाजारात आपले स्थान निर्माण केल्यानंतर रिलायन्स स्वत:चे उत्पादन युनिट सुरु करणार आहे. सध्या कंज्युमर इलेक्ट्रॉनिक्स सेगमेंटमध्ये रिलायन्सची मर्यादीत उत्पादने आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजने 2022 मध्ये अमेरिकेत इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी Sanmina चे अधिग्रहण केले होते. 1,670 कोटीत 50 टक्के भाग कंपनीने अधिग्रहीत केला होता. Sanmina चा चेन्नईमध्ये 100 एकर क्षेत्रावर प्लॅन्ट आहे. त्या प्लॅन्टमध्ये वाइजर ब्रॅण्डचे प्रॉडक्ट बनवता येतील.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.