Jio Offer : पैसा वसूल ऑफर, रोज मिळणार 2.5 GB डेटा, सोबतच 3000 रुपयांपर्यंतचे फायदे !

Reliance Jio Independence Offer 2022 ची घोषणा करण्यात आली आहे. ही ऑफर अतिशय खास आहे. कारण यामध्ये कंपनीतर्फे 3000 रुपयांपर्यंतचे फायदे मिळणार आहेत. जाणून घेऊया संपूर्ण माहिती.

Jio Offer : पैसा वसूल ऑफर, रोज मिळणार 2.5 GB डेटा, सोबतच 3000 रुपयांपर्यंतचे फायदे !
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 10, 2022 | 5:00 PM

 Reliance Jio Offers : देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ या टेलीकॉम कंपनीद्वारे त्यांच्या प्रीपेड युजर्ससाठी एक खास ऑफर आणण्यात आली आहे. त्या ऑफरचे नाव आहे Jio Independence Offer 2022. भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य ( 75th Independence day of India) दिनाच्या पार्श्वभूमीवर ही ऑफर सादर करण्यात आली आहे. या ऑफर अंतर्गत कंपनीतर्फे 3000 रुपयांपर्यंतचे अनेक फायदे मिळणार आहेत. जिओची ही ऑफर नेमकी काय आहे, त्याचा तुम्हाला कसा फायदा होईल याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. जिओ 2999 प्लॅन (Jio 2999 plan) या अंतर्गत कंपनी 2999 रुपयांच्या प्लॅनसह 3000 रुपयांचे फायदे देत आहे. म्हणजे 100 टक्के व्हॅल्यू बॅक ऑफर (Value back offer) या प्लॅनसह मिळत आहे.

जाणून घ्या काय आहे ऑफर ?

9 ऑगस्ट किंवा त्यानंतर कोणत्याही युजरने 2999 रुपयांच्या प्लॅनचे रिचार्ज केले तर त्या युजरला Ixigo शिवाय Netmeds आणि AJIO चे रिडीम कूपन मिळतील. या प्रत्येक कूपनची किंमत 750 रुपये इतकी आहे. त्यासह युजर्सना 75 जीबी अतिरिक्त डेटा ऑफर करण्यात येणार आहे. त्याचीही किंमत असेल 750 रुपये. 2999 रुपयांच्या या प्लॅनसह कंपनीतर्फे 2.5 जीबी हाय-स्पीड डेटासह 365 दिवसांची व्हॅलिडिटी देण्यात येत आहे. याचाच अर्थ तुम्हाला आता या प्लॅनसह 912.5 जीबी हाय-स्पीड डेटा वापरण्यास मिळेल. त्यासह कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि प्रत्येक दिवशी 100 SMS ची सुविधाही देण्यात येईल. इतर फायद्यांबाबत बोलायचे झाले तर, या जिओ रिचार्ज प्लॅनसह युजर्सना एका वर्षासाठी डिस्ने प्लस हॉटस्टार (Disney Plus Hotstar) मोबाईल प्लॅनचा फायदाही मिळणार आहे.

15 ऑगस्ट रोजी भारताचा 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येणार आहे. देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक कंपन्यांकडून वेगवेगळ्या ऑफर्स सादर केल्या जातात. तर काही ठिकाणी काही प्रॉडक्टसवर डिस्काऊंट अर्थात किमतीत काही सूटही दिली जाते.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.