जगातील टॉप टेन श्रीमंतांच्या यादीतून मुकेश अंबानी बाहेर, इतकी कमी झाली संपत्ती, भारतातील ही महिला टॉप पाचमध्ये
विप्रोचे अजीम प्रेमजी यांच्याकडे 2.2 लाख कोटी रुपयांची संपत्ती असून ते पाचव्या क्रमांकावर आहे. कुमार मंगलम बिर्ला यांच्याकडे 2 लाख कोटी रुपयांची संपत्ती असून ते सहाव्या क्रमांकावर आहे. सायरस पुनावाला 2 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह संयुक्तपणे सहाव्या क्रमांकावर आहे.

देशातील सर्वात मुल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना धक्का बसला आहे. जगातील टॉप टेन श्रीमंताच्या यादीतून मुकेश अंबानी बाहेर पडले आहे. त्यांची संपत्ती मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. अंबानी यांच्या नेटवर्थमध्ये एक लाख कोटींपेक्षा जास्त घसरण झाली आहे. दुसरीकडे भारतीय महिला अन् आयटी कंपनी एचसीएलच्या रोशनी नादर श्रीमंत महिलांच्या लिस्टमध्ये टॉप पाचमध्ये आल्या आहेत. श्रीमंताच्या टॉप टेन यादीत आलेल्या त्या पहिल्या भारतीय महिला झाल्या आहेत.
कोणाकडे किती संपत्ती
मुकेश अंबानी अजूनही भारत आणि अशियातील श्रीमंतांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांच्याकडे 8.6 लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांची संपत्ती मागील वर्षाच्या तुलनेत 13 टक्के कमी झाली आहे. दुसरीकडे गौतम अदानी यांच्या संपत्तीत 13% वाढ झाली आहे. त्यांची संपत्ती 1 लाख कोटीने वर्षभरात वाढली आहे. ते आता 8.4 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह देशातील दुसरे श्रीमंत झाले आहे. एचसीएलच्या रोशनी नादर यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. सन फार्माचे दिलीप सांघवी यांची संपत्ती 21% वाढली आहे. त्यांच्याकडे 2.5 लाख कोटींची संपत्ती आहे. ते चौथ्या क्रमांकावर आहे.
विप्रोचे अजीम प्रेमजी यांच्याकडे 2.2 लाख कोटी रुपयांची संपत्ती असून ते पाचव्या क्रमांकावर आहे. कुमार मंगलम बिर्ला यांच्याकडे 2 लाख कोटी रुपयांची संपत्ती असून ते सहाव्या क्रमांकावर आहे. सायरस पुनावाला 2 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह संयुक्तपणे सहाव्या क्रमांकावर आहे. बजाज ऑटोचे नीरज बजाज 1.6 लाख रुपयांच्या संपत्तीसह आठव्या क्रमांकावर तर रवी जयपुरिया आणि राधाकिशन दमानी 1.4 लाख कोटी रुपयांसह संयुक्तपणे नवव्या क्रमांकावर आहे.




रोशनी नादर यांच्याकडे किती संपत्ती?
टॉप 10 अब्जाधीशात केवळ मुंबईतील पाच जण आहेत. त्यानंतर नवी दिल्लीतील दोन, बंगळुरु, अहमदाबाद आणि पुणे येथील एक एक अब्जाधीश आहे. रोशनी नादर जगातील टॉप 10 श्रीमंत महिलांच्या यादीत आल्या आहेत. त्यांच्याकडे 3.5 लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. रोशनी नादर यांचे वडील शिव नादर यांनी त्यांना एचसीएलची 47% भागेदारी दिली होती.