रशिया-युक्रेन युद्धामुळे महागाईचा भडका; खाद्यतेलाच्या किंमतीत 20 ते 25 रुपयांची वाढ

होळीपूर्वीच महागाईचा (Inflation) भडका उडताना दिसून येत आहे. गेल्या आठ दिवसांपासून युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध (Russia Ukraine War) सुरू आहे. या युद्धाचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर मोठा प्रभाव पडला आहे. खाद्यतेलाच्या किमतीमध्ये प्रति लिटर मागे 20 ते 25 रुपयांची वाढ झाली आहे.

रशिया-युक्रेन युद्धामुळे महागाईचा भडका; खाद्यतेलाच्या किंमतीत 20 ते 25 रुपयांची वाढ
खाद्यतेल
Follow us
| Updated on: Mar 03, 2022 | 1:47 PM

नवी दिल्ली : होळीपूर्वीच महागाईचा (Inflation) भडका उडताना दिसून येत आहे. गेल्या आठ दिवसांपासून युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध (Russia Ukraine War) सुरू आहे. या युद्धाचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर मोठा प्रभाव पडला आहे. कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडले असून, प्रति बॅरल 118 डॉलरवर पोहोचले आहेत. दरम्यान दुसरीकडे खाद्यतेलाच्या (Edible Oil) दरात देखील वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. राजधानी दिल्लीमध्ये गेल्या 15 दिवसांमध्ये खाद्य तेलाच्या किमती प्रति लिटर मागे 20 ते 25 रुपयांनी वाढल्या आहेत. सोयाबीन, सुर्यफूल, शेंगदाना अशा सर्वच तेलाच्या किमती वाढल्या आहेत. मोहरीच्या तेलाने तर दोनशे रुपयांचा टप्पा पार कला आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असल्यामुळे तेलाची पुरवठा साखळी खंडीत झाली आहे. पुरवठ्यापेक्षा मागणी वाढल्याने येणाऱ्या काळात तेलाचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आयातीवर परिणाम

भारतात सरासरी 65 टक्के तेलाची आयात केली जाते. पाम ऑईल आपण इंडोनेशियाकडून आयात करतो. जवळपास साठ टक्के पाम ऑईल एकटा इंडोनेशिया भारताला पुरवतो. तर सुर्यफूल तेल आपण रशिया आणि युक्रेनकडून आयात करतो. यातील जवळपास सत्तर टक्के सुर्यफूल तेलाची आयात आपण युक्रेनकडून करतो. तर वीस टक्के सुर्यफूल तेलाचा पुरवठा आपल्याला रशियाकडून होतो. तर दहा टक्के तेल आपण आर्जेंटिनाकडून आयात करतो. मात्र सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असल्यामुळे तेलाच्या आयातीवर मोठा परिणाम झाला आहे. तेलाचा पुरवठा होत नसल्याने तेलाचे दर वाढले आहेत. येत्या काळात तेलाच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.

सर्वसामान्यांना मोठा आर्थिक फटका

तेलाचे दर वाढल्यास केवळ त्याचा परिणाम हा किचनमधील बजेटवर होणार नाही, तर हॉटेलमधील अन्न पदार्थ तसेच आइसक्रीम खाने देखील महागणार आहे. कारण आइसक्रीमच्या उत्पादनामध्ये मोठ्याप्रमाणात वनस्पती तेलाचा उपयोग होतो. तेल महाग झाल्याने आता सर्वसामान्यांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागणार आहे.

संबंधित बातम्या

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान गुंतवणूकदारांना ‘फेडरल रिझर्व्ह’चा आधार; शेअर बाजार सावरला

कच्चे तेल प्रति बॅरल 118 डॉलरवर; जाणून घ्या आजचे पेट्रोल डिझेलचे भाव

Ukraine Russia war: सोने हजार रुपयांनी महागले, चांदीच्या दरातही वाढ

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.