रशिया – युक्रेन युद्धाचा भारताला फटका, विदेशी मुद्रा भंडारातून दोन अब्ज डॉलरचा अतिरिक्त खर्च!

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध (Russia Attack On Ukraine) सुरूच आहे. आज या युद्धाचा नववा दिवस आहे. युद्धाचा परिणाम हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर होत असल्याचे पहायला मिळत आहे. कच्च्या तेलाच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. गुरुवारी कच्चे तेल प्रति बॅरल 118 डॉलरवर पोहोचले. तसेच रुपयाच्या मुल्यामध्ये देखील घसरण होत आहे.

रशिया - युक्रेन युद्धाचा भारताला फटका, विदेशी मुद्रा भंडारातून दोन अब्ज डॉलरचा अतिरिक्त खर्च!
रिझर्व्ह बँकImage Credit source: Wikipedia
Follow us
| Updated on: Mar 04, 2022 | 8:07 AM

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध (Russia Attack On Ukraine) सुरूच आहे. आज या युद्धाचा नववा दिवस आहे. युद्धाचा परिणाम हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर होत असल्याचे पहायला मिळत आहे. कच्च्या तेलाच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. गुरुवारी कच्चे तेल प्रति बॅरल 118 डॉलरवर पोहोचले. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झालेली ही गेल्या आठ वर्षांमधील सर्वोच्च वाढ आहे. दरम्यान दुसरीकडे युद्धाच्या पार्श्वभूमीवर रुपयाच्या मुल्ल्यात देखील चढउतार पहायला मिळत आहे. रुपयाच्या मुल्यामध्ये होणारी घसरण थांबवण्यासाठी आता भारताची मध्यवर्ती बँक असलेली आरबीआय (RBI) काही महत्त्वपूर्ण पाऊले उचलण्याच्या तयारीत आहे. एकीकडे रुपयांचे मुल्य घसरत आहे, तर दुसरीकडे कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. याचा ताण हा भारताच्या अर्थव्यवस्थेवर (Economy) पडत असून, परिणामी विदेशी मुद्रा भंडारातून दोन अब्ज डॉलरचा अतिरिक्त खर्च झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 9 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या आहेत. बाजारात तणावाचे वातावरण आहे. तसेच रुपयांचे मुल्य देखील डॉलरच्या तुलनेमध्ये घटताना दिसत आहे. भारत कच्च्या तेलाचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. एकीकडे कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. तर दुसरीकडे भारतीय चलन असलेल्या रुपयाच्या मुल्ल्यात घसरण होत आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसत आहे. त्यामुळे रुपयाची घसरण थांबवण्यासाठी आरबीआयकडून काही महत्त्वपूर्ण उपाययोजना करण्यात येण्याची शक्यता आहे.

खाद्यतेलाच्या किमतींमध्ये देखील वाढ

रशिया आणि युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर दबाव निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे. कच्च्या तेलाच्या किमती तर भडकल्या आहेतच सोबतच खाद्य तेलाच्या किमतीमध्ये देखील तेजी दिसून येत आहे. भारत जवळपास 80 टक्के कच्चे तेल तर 65 टक्के खाद्य तेल इतर देशांकडून आयात करतो. हा सर्व व्यवहार डॉलरमध्ये होतो. अशा स्थितीत जर रुपयाचे मुल्य घसरले तर त्याचा मोठा फटका देशाला बसू शकतो.

संबंधित बातम्या

युद्धादरम्यान ग्राहकांना दिलासा; देशी खाद्यतेलाच्या किमतीमध्ये घसरण, पाम तेलाच्या दरात तेजी कायम

तुम्ही पत्नीला संपत्तीमध्ये नॉमिनी केलंय? नसेल तर आजच करा; भविष्यातील संकटे टाळा

रशिया-युक्रेन युद्धात SBI चे अडकले कोटी रुपये, कशी केली जाईल रिकव्हरी?

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.