Russia Ukraine war : काय बोलता! युद्ध ठरलं वरदान, काही देशांची 8 वर्षांची मंदी संपली

मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरात तणावाचं वातावरण आहे. मात्र, या युद्धामुळे काही देशांची लॉटरी लागली आहे. त्यांची आठ वर्षांची मंदी संपली आहे आणि जीडीपीमध्ये चांगली वाढही झाली आहे. आता तुम्ही म्हणाल युद्ध सुरु असताना इतकं नुकसान सुरु असताना युक्रेनचा कुणाला फायदा होऊ शकतो, किंवा रशियाचा कुणाला फायदा होऊ शकतो. पण काही देशांना याचा फायदा झाला आहे.

Russia Ukraine war : काय बोलता! युद्ध ठरलं वरदान, काही देशांची 8 वर्षांची मंदी संपली
सांकेतिक फोटो.Image Credit source: social
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 2:23 PM

नवी दिल्ली : मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine war) जगभरात तणावाचं वातावरण आहे. युक्रेनच्या हल्ल्यामुळे अमेरिका आणि युरोपातील देश रशियावर (Russia) सातत्याने कठोर निर्बंध लादत आहेत. युद्ध आणि या निर्बंधांमुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. अनेक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत आणि जगभरातील अनेक अर्थव्यवस्थांवर त्याचा परिणाम झाला आहे. त्याचवेळी असे काही देश आहेत त्यांना हेच युद्ध (war) वरदान ठरलंय. या युद्धामुळे या देशांची लॉटरी लागली आहे. त्यांची आठ वर्षांची मंदी संपली आहे आणि जीडीपीमध्ये चांगली वाढही झाली आहे. आता तुम्ही म्हणाल युद्ध सुरु असताना इतकं नुकसान सुरु असताना युक्रेनचा कुणाला फायदा होऊ शकतो, किंवा रशियाचा कुणाला फायदा होऊ शकतो. पण काही देशांना याचा फायदा झाला आहे.

काही देशांना फायदा

रशिया-युक्रेन युद्धामुळे तेलाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे जगातील काही सर्वात मोठ्या हायड्रोकार्बन उत्पादक, आखाती राष्ट्रांनी त्यांच्या तिजोरीत अब्जावधी डॉलर्स ओतले आहेत. आठ वर्षांच्या तेल मंदीनंतर आणि कोरोनामुळे झालेल्या घसरणीनंतर या देशांना पहिल्यांदाच बजेट वाढण्याची आशा या देशांना आहे

एक महत्वाचं संशोधन

MUFG या आर्थिकविषयक समूहाने केलेल्या त्यांच्या एका संशोधनानुसार, तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे, गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC) च्या देशांच्या GDP वाढीचा अंदाज 6.1 टक्के आहे. 2022 मध्ये. तसेच, सन 2014 नंतर प्रथमच महसूल अधिशेषाचा अंदाज लावला आहे. GCC देशांमध्ये सौदी अरेबिया, ओमान, संयुक्त अरब अमिराती, कुवेत, कतार आणि बहरीन यांचा समावेश आहे. “2022 मध्ये आखाती देशांचा एकूण महसूल $27 अब्ज अधिशेष असण्याचा अंदाज आहे.

कोरोनाचा सर्वाधिक परिणाम

कोरोनामुळे 2020 आणि 2021 मध्ये कच्च्या तेलाच्या मागणीत लक्षणीय घट झाली होती . या दोन वर्षांत अनेक देशांमध्ये लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे कच्च्या तेलाच्या मागणीत मोठी घट झाली. जास्त पुरवठा झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती खूपच खाली गेल्या. बेंचमार्क ब्रेंट क्रूड तेलाची किंमत मार्च 2020 मध्ये प्रति बॅरल 22 डॉलर होती. त्याच वेळी या वर्षी मार्चच्या सुरुवातीला रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे किंमती 130  डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या होत्या. हा  14 वर्षांचा उच्चांक आहे. हायड्रोकार्बन हे आखाती देशांच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहेत. हे देश त्यावर अवलंबून आहेत. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने हे देश श्रीमंत झाले आहेत.

इतर बातम्या

Gold Price Rates Today : सलग दोन दिवस सोन्याच्या दरात घसरण, चांदीचा भाव वधारला, जाणून घ्या सोन्याचे दर

NCERT : NCERT पुस्तकातील कथेवरून वाद ! NCPCR कडून तक्रार दाखल

सलमान खानला दिलासा; पत्रकाराला धमकी प्रकरणी कोर्टात हजर राहण्यापासून सूट

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.