Russia-Ukraine war : भारतातून गव्हाची निर्यात वाढली, 70 लाख टन गहू निर्यातीचा अंदाज 

भारतातून या वर्षी वार्षिक आधारावर जवळपास 70 लाख टन गव्हाची (Wheat) निर्यात (Export) होण्याची शक्यता आहे. रॉयटर्सने केलेल्या दाव्यानुसार एका उच्चपदस्त सरकारी अधिकाऱ्याने रॉयटर्सला बोलताना सांगितले की, सध्या रशिया (Russia) आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगात गव्हाचा तुटवडा निर्माण झाला आहे, या संधीचा भारताला फायदा होऊ शकतो.

Russia-Ukraine war : भारतातून गव्हाची निर्यात वाढली, 70 लाख टन गहू निर्यातीचा अंदाज 
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 9:16 PM

नवी दिल्ली : भारतातून या वर्षी वार्षिक आधारावर जवळपास 70 लाख टन गव्हाची (Wheat) निर्यात (Export) होण्याची शक्यता आहे. रॉयटर्सने केलेल्या दाव्यानुसार एका उच्चपदस्त सरकारी अधिकाऱ्याने रॉयटर्सला बोलताना सांगितले की, सध्या रशिया (Russia) आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगात गव्हाचा तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच जागतिक बाजारपेठेत गव्हाचे भाव देखील वाढले आहे. ही सर्व परिस्थिती भारताला गव्हाच्या निर्यातीसाठी अनुकूल आहे. याबाबत बोलताना अन्न व ग्राहक मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी सुधांशु पांडे यांनी शनिवार सांगितले की, भारतातून गव्हाची निर्यात वाढत असून, फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत 6.6 मिलियन टन गव्हाची निर्यात करण्यात आली आहे. भारत रशियानंतर जागातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा गहू उत्पादक देश आहे.

रशिया – युक्रेनची निर्यात ठप्प

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर गव्हाची निर्यात ठप्प झाली आहे. रशिया हा जगातील सर्वात मोठा गहू उत्पादक देश आहे. तर युक्रेनचा गव्हाच्या उत्पादनामध्ये तिसरा क्रमांक लागतो. भारत रशियानंतर जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. दरवर्षी रशिया आणि युक्रेनमधून मोठ्या प्रमाणात गव्हाची निर्यात होते. दोन देश मिळून जवळपास जागतिक स्थरावर तीस ते चाळीस टक्के गव्हाची निर्यात करतात. मात्र सध्या युद्ध सुरू असल्याने निर्यात ठप्प आहे. या सधींचा भारताला फायदा होऊ शकतो. भारतातून गव्हाची निर्यात वाढत आहे.

भारतातून अफगानिस्तानला गव्हाची निर्यात

पांडे पुढे बोलताना म्हणाले की, दरवर्षी भारताकडून अफगानिस्तानला देखील 50,000 टन गहू निर्यात केला जातो. मात्र यंदा अफगानिस्तानची सत्ता तालिबान्यांच्या हातात गेली आहे. तरी देखील त्यांना गव्हाची निर्यात केली जाईल. अफगानिस्तानमध्ये मोठ्याप्रमाणात अन्नधान्य टंचाई आहे. ती भरून काढण्यासाठी भारतातून गव्हाची निर्यात केली जाते. सध्याची एकूण परिस्थिती पहाता आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गंत स्थरावर गव्हाचे भाव वाढण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले.

संबंधित बातम्या

येत्या वर्षात 25 हजार भारतीयांना नोकरी देणार डेन्मार्कची ‘ही’ कंपनी, महसुलाच्या दुप्पट वाढीचे लक्ष

रशिया-युक्रेन युद्धामुळे जगाची आर्थिक कोंडी? सविस्तर वाचा काय होतील परिणाम

नॅनो नंतर आता इलेक्ट्रिक नॅनो लवकरच येणार बाजारात? गाडी पाहून रतन टाटा म्हणाले…

लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.