संजय दत्तने डिसेंबर महिन्यात लॉन्च केला दारुचा हा बॅन्ड, 45 दिवसांत 15 कोटींची कमाई
Liquor Business: भारतीय क्रिकेटचे दिग्गज खेळाडू युवराज सिंह दारुच्या व्यवसायात उतरले आहे. युवराजने नवीन लग्झरी टकीला ब्रँन्ड लॉन्च केला आहे. त्याने अल्ट्रा-प्रीमियम कॅटेगरीसाठी टकीला लॉन्च केला आहे. सध्या हा बँड अमेरिकन बाजारपेठेत उपलब्ध आहे.

Liquor Business: बॉलीवूड कलाकार असो की क्रिकेट खेळाडू सर्वच जण अधिक पैसा मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे खेळाडूसुद्धा व्यवसायत उतरतात आणि बॉलीवूड कलाकार व्यवसाय करतात. अभिनयक्षेत्रासोबत व्यवसायात आलेले संजय दत्ता यांनी जोरदार कमाई सुरु केली आहे. संजय दत्तचा स्कॉच व्हिस्की ब्रँन्ड द ग्लेनवॉक (The Glenwalk) सध्या धूम करत आहे. डिसेंबर 2024 मध्ये त्यांनी हा बॅन्ड लॉन्च केला. केवळ 45 दिवसांत 15 कोटींची कमाई केली आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक विक्री
संजय दत्त यांचा व्हिस्की बॅन्डने 200 एमएलची 3 लाखांपेक्षा जास्त बॉटल दारु विकली आहे. म्हणजे दीड महिन्यात त्यांनी 15 कोटींची कमाई या माध्यमातून केली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक प्रमाणात ही दारु विकली जात आहे. त्यामुळे संजय दत्तच्या उत्पन्नात वाढ होत आहे. संजय दत्त दारुच्या व्यवसायातून वेगाने कमाई करत आहेत. या व्यवसायात आणखी एक नाव जोडले गेले आहे.
हा खेळाडू दारुच्या व्यवसायात
भारतीय क्रिकेटचे दिग्गज खेळाडू युवराज सिंह दारुच्या व्यवसायात उतरले आहे. युवराजने नवीन लग्झरी टकीला ब्रँन्ड लॉन्च केला आहे. त्याने अल्ट्रा-प्रीमियम कॅटेगरीसाठी टकीला लॉन्च केला आहे. सध्या हा बँड अमेरिकन बाजारपेठेत उपलब्ध आहे. परंतु लवकरच तो भारतात मिळणार आहे.




भारतही लॉन्च करणार
अमेरिकेत शिकागोमध्ये आयोजित एका स्पेशल इव्हेंटमध्ये युवराजने टकीला ब्रँड फिनो (FINO) लॉन्च केला. यावेळी युवराज म्हणाला फिनोमध्ये सर्व काही आहे, ज्यामध्ये मी विश्वास करतो. हा बँड भारतात एप्रिल 2025 मध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. युवराज आपल्या अल्कोहल बँडसाठी खूप आशावादी आहे.
संजय दत्त, युवराज प्रमाणे बॉलीवूडमधील खलनायक म्हणून ओळख असलेला डॅनी डेन्जोंगपा दारुच्या उद्योगात आहे. डॅनी प्रसिद्ध बिअर बँड युकसोम बेवरेजचा मालक आहे. हा देशातील तिसरा सर्वात लोकप्रिय बँड आहे.