SIP ची भन्नाट योजना, 3 लाखांची गुंतवणूक करा आणि 11 लाख कमवा
भविष्यकालीन गुंतवणुकीसाठी एसआयपी हा एक उत्तम पर्याय मानला जातो. यात तुम्हाला एकरकमी गुंतवणूक करावी लागत नाही. (Saving And Investment Invest In Sip Know The Best Plan for more profit)
Best SIP Plane मुंबई : सुरक्षित भविष्यासाठी प्रत्येकजण दीर्घकालीन गुंतवणूक करण्यावर भर देतो. जर तुम्हीही भविष्यासाठी बचत करण्याचा विचार करत असाल तर एसआयपी (SIP) हा उत्तम पर्याय ठरु शकतो. भविष्यकालीन गुंतवणुकीसाठी एसआयपी हा एक उत्तम पर्याय मानला जातो. यात तुम्हाला एकरकमी गुंतवणूक करावी लागत नाही. (Saving And Investment Invest In Sip Know The Best Plan for more profit)
कोरोना काळात सर्वचजण सिस्टमॅटिक इनवेस्टमेंट प्लॅन म्हणजे एसआयपी मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. आपल्यातील अनेकांना एसआयपी योजनेची माहिती असते. पण यात तुमचे पैसे सुरक्षित राहतील का? यात नेमकी गुंतवणूक कशी करता येईल, याची आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
एसआयपीमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक
एसआयपी ही म्युच्युअल फंडाप्रमाणेच गुंतवणूक आहे. पण यात तुम्हाला दर महिना पैसे जमा करण्याचा पर्याय दिला जातो. तज्ज्ञांचे मते, एसआयपीमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक केल्याने तुम्हाला जास्त परतावा मिळू शकतो. सध्या बाजारात गुंतवणूकीसाठी अनेक योजना उपलब्ध आहे. यात तुम्ही दर महिना 100 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत गुंतवून गुंतवणूकीस सुरुवात करु शकता. विशेष म्हणजे यात तुम्ही अधिक रक्कम गुंतवण्याचाही पर्याय उपलब्ध असतो.
पाच वर्षात 25 टक्के परतावा
मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, गेल्या पाच वर्षात अनेक कंपन्यांच्या योजनांनी चांगला परतावा दिला आहे. PGIM इंडिया मिडकॅप अपॉर्च्युनिटी फंड, कोटक स्मॉलकॅप यासारख्या अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला परतावा मिळत आहे. पीजीआयएम इंडिया मिडकॅपमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना गेल्या पाच वर्षात 25 टक्के परतावा मिळाला आहे.
म्हणजेच जर तुम्ही 5 वर्षात 3 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर त्याचे किंमत वाढून 11 लाख रुपये इतकी झाली आहे. तर कोटक स्मॉलकॅप फंडाने गेल्या 5 वर्षात 23 टक्क्यांहून अधिक रिटर्न दिले आहेत. म्हणजे पाच वर्षात जर तुम्ही 3 लाख रुपये जमा केले असतील तर तुम्हाला 10 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे मिळतील.
मिरा एसेट इमर्जिंग ब्लूचिप ही देखील एक उत्कृष्ट योजना आहे. मिरा एसेट इमर्जिंग ब्ल्यूचिपने गेल्या पाच वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 23 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. यातही ज्यांनी पाच वर्षांसाठी 3 लाख रुपयांची गुंतवणूक केली त्यांना 10 लाख रुपयांहून अधिक रक्कम मिळाली आहे.(Saving And Investment Invest In Sip Know The Best Plan for more profit)
Video : 6 वर्षाच्या चिमुकलीचे क्रिकेट शॉट्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल, केरळच्या महकचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल#ViralVideo #Video #Crickethttps://t.co/GN9qsjFimX
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 13, 2021
संबंधित बातम्या :
मोदी सरकारचा निर्णय पथ्यावर पडला; ‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणूकदार एका महिन्यात मालामाल