SBI मध्ये खातं असेल तर लगेच चेक करा अकाऊंट, बँकेकडून ग्राहकांना ‘Alert’ जारी

एसबीआय बँकेच्या नावावर ग्राहकांना बनावट ईमेल पाठवला जात असल्याचं बँकेनं म्हटलं आहे.

SBI मध्ये खातं असेल तर लगेच चेक करा अकाऊंट, बँकेकडून ग्राहकांना 'Alert' जारी
Follow us
| Updated on: Nov 18, 2020 | 1:46 PM

मुंबई : जर भारतीय स्टेट बँकेमध्ये (state bank of india) तुमचंही खातं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना ट्विट (tweet) करुन एक महत्त्वाचा संदेश जारी केला आहे. यामध्ये बँकेने ग्राहकांना आवाहन केलं आहे की, एसबीआयच्या (SBI) नावे जर तुम्हाला खोटा आणि बनावट ईमेल आला तर त्यास अजिबात उत्तर देऊ नका. एसबीआय बँकेच्या नावावर ग्राहकांना बनावट ईमेल पाठवला जात असल्याचं बँकेनं म्हटलं आहे. त्यामुळे ग्राहकांनी बँकेच्या नावे आलेला मेल खरा आही की फसवणुकीसाठी आहे याची खात्री नक्की करून घ्या असं आवाहन करण्यात आलं आहे. (sbi alert massage for their customers on online fraud)

एसबीआयने ट्विट म्हटलं आहे की, ‘बँक ग्राहकांना विनंती करत आहे की त्यांनी सोशल मीडियावर अलर्ट राहा. कोणत्याही दिशाभूल आणि बनावट मेसेजद्वारे तुमची फसवणूक केली जाऊ शकते’ यामुळे ग्राहकांनी कुठल्याही मेसेजवर आपली खासगी माहिती शेअर करण्याआधी तपासणी करा.

फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांनी अलर्ट करण्यासाठी एक व्हीडिओदेखील शेअर केला आहे. यामध्ये आपली कोणतीही खासगी माहिती ऑनलाइन शेअर करू नका असं आवाहन ग्राहकांना करण्यात आलं आहे. बँकेने यामध्ये सावधान, सुरक्षित आणि आलेला मेसेज खरा की फसवणुकीसाठी आहे याची तपासणी करण्याचा सल्ला दिला आहे. (sbi alert massage for their customers on online fraud)

अधिकृत सेवांचा वापर करा बँकेनं ग्राहकांना स्पष्ट केलं आहे की, कोणत्याही प्रकारच्या बँकिंग सेवांसाठी अधिकृत पोर्टलचा वापर करा. जर तुम्ही या सूचनेकडे दुर्लक्ष केलं तर तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल. बँकेने ग्राहकांना सतर्क करण्यासाठी आणखी एक संदेश जारी केला आहे. त्यामध्ये जर तुमच्यासोबत फसवणूक झाली तर तक्रार नोंदवण्यासाठी तुम्ही बँकेच्या अधिकृत पोर्टलवर राज्याचे नाव, लॉगिन आयडी, मोबाइल नंबर आणि ओटीपी अशी माहिती देतस तक्रार नोंदवू शकता.

संबंधित बातम्या – 

24 तासांत दोन बँकांवर धडक कारवाई, लक्ष्मी विलासनंतर RBI चे आणखी एका बँकेवर निर्बंध

लक्ष्मी विलास बँकेतून महिन्याकाठी काढता येणार फक्त ‘एवढे’ रुपये, RBI ने लादले निर्बंध

(sbi alert massage for their customers on online fraud)

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.