Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दसऱ्याच्या तोंडावर SBI चा मोठा निर्णय, ATM मधून पैसे काढण्याचा नियम बदलला

एसबीआय (SBI-State Bank of India) ने ATM मधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. ऐन दसऱ्याच्या तोंडावर बँकेने मोठा बदल केला आहे.

दसऱ्याच्या तोंडावर SBI चा मोठा निर्णय, ATM मधून पैसे काढण्याचा नियम बदलला
Follow us
| Updated on: Oct 23, 2020 | 9:39 AM

नवी दिल्ली : देशातल्या सगळ्या मोठी सरकारी बँक एसबीआय (SBI-State Bank of India) ने ATM मधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. ऐन दसऱ्याच्या तोंडावर बँकेने मोठा बदल केला आहे. आता ओटीपी टाकल्याशिवाय तुम्हाला पैसै काढता येणार नाहीत. नव्या नियमानुसार, आता तुम्हाला 10 हजार रुपये कॅश काढण्यासाठी ओटीपी आवश्यक असणार आहे. म्हणजे विना ओटीपी तुम्ही बँकेतून पैसे काढू शकत नाही. (sbi state bank of india set a new rules for atm cash withdrawal)

स्टेट बँकेने या आधीच हा नियम लागू केला होता. 18 सप्टेंबरपासून हा नियम 24 तासांसाठी लागू करण्यात आला होता. यापूर्वी, एसबीआयने 1 ऑक्टोबरपासून एसबीआय बँकिंग नियमांमध्ये ( SBI Banking Rules ) परदेशात पैसे पाठवण्याचे नियम बदलले होते. यानुसार आता ग्राहकांना परदेशात व्यवहार करण्यासाठी कर ( Tax ) भरावा लागतो. म्हणजेच ग्राहकांना परदेशात पैसे पाठवण्यासाठी जास्तीचे पैसे द्यावे लागतात.

बँक खात्यामध्ये नाहीत पैसे, तरीही करू शकता UPI पेमेंट, वाचा कसे?

SBI ने केलं महत्त्वाचं ट्वीट SBI ने यासंबंधी एक ट्वीट करत नव्या नियमांची माहिती दिली आहे. SBI च्या ट्विटनुसार, आतापासून एटीएममधून पैसे काढण्यासाठी ग्राहकांना वन टाइम पासवर्ड (OTP) टाकावा लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा नियम आता 24 तासांसाठी लागू करण्यात आला आहे. (sbi state bank of india set a new rules for atm cash withdrawal)

याआधी 12 तासांसाठी होता नियम मीडिया रिपोर्ट्सनुसार, ओटीपी प्रक्रिया आधी रात्री 8 वाजल्यापासून ते सकाळी 8 वाजल्यापर्यंत सुरू करण्यात आली होती. यामध्ये रक्कम टाकल्यानंतर ओटीपी स्क्रीन उघडेल आणि तिथे तुमच्या मोबाइल नंबरवर पाठवलेला ओटीपी टाकावा लागेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच व्यवहार करणं शक्य होणार आहे.

फक्त 5 हजारांमध्ये सुरू करा व्यवसाय, प्रत्येक महिन्याला कमवाल बक्कळ पैसा

बँकेने का लागू केला नियम? देशभरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असताना ऑनलाइन घोटाळेही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. नवीन नियमानंतर बँकेतून पैसे काढण्यासाठी, तुम्हाला एटीएम स्क्रीनवरील रकमेसह ओटीपी स्क्रीनही दिसेल. ग्राहकांना नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ओटीपी येईल तो टाकल्यानंतर तुम्हाला पैसे काढता येणार आहेत.

(sbi state bank of india set a new rules for atm cash withdrawal)

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.