फक्त 250 रुपयांच्या गुंतवणुकीवर मुलीच्या भविष्याची चिंता सोडा, टॅक्स बचतीसोबत ‘हे’ आहे फायदे

पोस्ट ऑफिस (Post Office) किंवा कुठल्याही बँकेमध्ये खातं उघडता येऊ शकतं. या खात्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे अवघ्या 250 रुपयांमध्ये तुम्ही खातं उघडू शकता.

फक्त 250 रुपयांच्या गुंतवणुकीवर मुलीच्या भविष्याची चिंता सोडा, टॅक्स बचतीसोबत 'हे' आहे फायदे
Follow us
| Updated on: Dec 11, 2020 | 2:09 PM

नवी दिल्ली : प्रत्येक पालकांना आपल्या मुलांची काळजी असते. खासकरून लेकीची. यामुळेच मुलीचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली सुकन्या समृद्धि योजना (Sukanya Samriddhi Yojana- SSY) सध्या लोकप्रिय ठरत आहे. तुम्हीही सुकन्या समृद्धी योजनेमध्ये मुलीच्या नावे खातं (Sukanya Samriddhi Account) उघडू शकता. पोस्ट ऑफिस (Post Office) किंवा कुठल्याही बँकेमध्ये खातं उघडता येऊ शकतं. या खात्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे अवघ्या 250 रुपयांमध्ये तुम्ही खातं उघडू शकता. (secure daughter future by opening sukanya samriddhi account with pnb)

या खास योजनेसाठी देशातील दुसर्‍या क्रमांकाची सरकारी बँक पंजाब नॅशनल बँक (PNB) लोकांना सुकन्या समृध्दी योजनेत खातं उघडण्याची खास सुविधा देत आहे. पीएनबीने (PNB) ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. यात सुकन्या समृद्धि खात्यामध्ये काय सुविधा आणि फायदा आहे जाणून घेऊयात.

सुकन्या समृद्धि योजनेमध्ये (SSY) जर तुम्ही गुंतवणूक केली तर ती रक्कम मुलीच्या लग्नासाठी किंवा मॅच्युरिटीनंतर शिक्षणासाठी वापरता येऊ शकते. हे खातं उघडल्यानंतर 21 वर्षांत ही परिपक्व होते. पण यासाठी योजना उघडल्यानंतर 15 वर्ष पूर्ण होणं आवश्यक आहे.

जास्तीत-जास्त किती रक्कम जमा कराल?

सुकन्या समृद्धि खातं हे तुम्ही तुमच्या दोन मुलींच्या नावे उघडू शकता. मुलीने 10 वर्षे पूर्ण करण्याआधी हे खाते उघडलं जाऊ शकतं. फक्त 250 रुपयांमध्ये खातं उघडता येतं तर वर्षाला यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये जमा करू शकता. या खात्यात 15 वर्षे पैसे जमा केले जातात. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुकन्या समृद्धि योजना खात्यावर 7.6 टक्के व्याज दर मिळतो.

सुकन्या समृद्धि योजनेतून पैसे काढण्याचे नियम

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे खातं बंद केलं जाऊ शकत नाही किंवा मुलीचं वय 18 वर्ष होण्यापूर्वी गुंतवणूक केलेले पैसे काढता येणार नाहीत. मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर तुम्ही दोन अटींवर 50 टक्के पैसे काढू शकता. पहिली म्हणजे मुलीच्या उच्च शिक्षणासाठी आणि दुसरी म्हणजे तिच्या लग्नाची आर्थिक गरज. (secure daughter future by opening sukanya samriddhi account with pnb)

इतर बातम्या –

1 जानेवारीपासून बदलणार चेक पेमेंटची पद्धत, लागू होणार नवा नियम

19 कोटी नागरिकांसाठी मोठं गिफ्ट, आता या खात्यामध्ये सरकार जमा करणार एकमुखी रक्कम

(secure daughter future by opening sukanya samriddhi account with pnb)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.