SBI| ज्येष्ठ नागरिकांसाठी खुशखबर…एसबीआयने दिले मोठे गिफ्ट!

मुंबई : देशातील सर्वात मोठी भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI)ने ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मुदत ठेव योजनेला दुसर्‍यांदा मुदतवाढ दिली आहे. मे महिन्यात एसबीआय ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेव योजना जाहीर केली, जी सुरुवातीला सप्टेंबरपर्यंत होती. ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेषता एफडी योजना 31 मार्च 2021 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापूर्वी ही योजना 31 डिसेंबरपर्यंत वैध […]

SBI| ज्येष्ठ नागरिकांसाठी खुशखबर...एसबीआयने दिले मोठे गिफ्ट!
Follow us
| Updated on: Dec 13, 2020 | 10:48 AM

मुंबई : देशातील सर्वात मोठी भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI)ने ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मुदत ठेव योजनेला दुसर्‍यांदा मुदतवाढ दिली आहे. मे महिन्यात एसबीआय ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेव योजना जाहीर केली, जी सुरुवातीला सप्टेंबरपर्यंत होती. ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेषता एफडी योजना 31 मार्च 2021 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापूर्वी ही योजना 31 डिसेंबरपर्यंत वैध असल्याचे बँकेने जाहीर केले होते. (senior citizens Good news, Big gift given by SBI)

ज्येष्ठ नागरिकांसाठी एसबीआयने व्हीकेअर ही योजना खास ज्येष्ठ नागरिकांसाठी आणली होती.आता तिचा कालावधी संपणार होता. मात्र, एसबीआय व्हीकेअर जमा योजनेचा कालावधी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बँकेच्या संकेतस्थळावर जाहिर केले आहे. आता ही योजना 31 मार्च 2021 पर्यंत सुरू राहील.

कोण गुंतवणूक करू शकेल 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाची व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते. ही योजना 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी आहे. त्याचबरोबर या योजनेत जास्तीत जास्त ठेव रक्कम दोन कोटींपेक्षा कमी पाहिजे. एसबीआय व्हीकेअर ठेवींमध्ये, मॅच्युरिटीपूर्वी पैसे काढताना अतिरिक्त व्याज दिले जात आहे. व्याज दर या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या ठेवींवर जास्त व्याज दिले जाते. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर 0.30 टक्के अतिरिक्त व्याज मिळते. त्याचबरोबर एसबीआय सर्व कालावधीच्या मुदत ठेवींवर ज्येष्ठ नागरिकांना आधीपासूनच 0.50 टक्के अतिरिक्त व्याज दर देत आहे. अशा प्रकारे एसबीआय व्हीकेअर ठेवीचा लाभ घेऊन ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या एफडीवर 0.80 (0.50+0.30) टक्के अधिक व्याज मिळू शकतात.

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाने सर्व एटीएम कार्ड ग्राहकांना 30 जून पर्यंतचे सर्व ट्रॅन्जेक्शन मोफत दिले होते. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या निर्णयामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला होता. एसबीआय ग्राहक कितीही वेळा आणि कोणत्याही बँकेच्या एटीएममधून ट्रॅन्जेक्शन करु शकत होते. यासाठी एसबीआय ग्राहकांकडून एकही शुल्क आकारणार नव्हता.

बँकने सेव्हिंग अकाऊंटसाठी 8 मोफत ट्रॅन्जेक्शन दिले होते. ज्यामध्ये तीन ट्रॅन्जेक्शनचा उपयोग तुम्ही दुसऱ्या बँकेच्या एटीएमसाठी करु शकता. तर छोट्या शहरात स्टेट बँकेकडून 10 ट्रॅन्जेक्शन दिली होती.

बँकेकडून ग्राहकांना काही मर्यादीतच एटीएम ट्रॅन्जेक्शन दिले जाते. पण जेव्हा मर्यादीत दिले गेलेले ट्रॅन्जेक्शन संपते. त्यानंतर पुढील ट्रॅन्जेक्शनसाठी बँक ग्राहकांकडून शुल्क आकारत होती.

संबंधित बातम्या : 

YES बँकेवरील निर्बंधावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणतात…

SBI ग्राहकांना फटका, FD वरील व्याज दरात कपात

(senior citizens Good news, Big gift given by SBI)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.