Sensex Down : शेअर बाजारात घसरणीचं सत्र, सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स डाउन; विक्रीचा जोर

आजच्या वधारणीच्या शेअर्समध्ये एमअँडएम, एचडीएफसी, कोटक बँक आणि टाटा स्टील यांचा समावेश झाला. नेस्ले, टेकएम, बजाज फिनसर्व्ह, सन फार्मा आणि एचसीएल मध्ये विक्रीचा जोर दिसून आला.

Sensex Down : शेअर बाजारात घसरणीचं सत्र, सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स डाउन; विक्रीचा जोर
शेअर बाजारImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 01, 2022 | 6:02 PM

नवी दिल्ली : जागतिक अर्थकारणातील (International Economic affair) घडामोडींचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. शेअर बाजारात आज (बुधवार) तेजी-घसरणीचं चित्र कायम राहिलं. सेन्सेक्स आज (1 जून) 185.24 अंकांच्या घसरणीसह 55,381.17 आणि निफ्टी 61.80 अंकांच्या घसरणीसह 16,522.75 वर बंद झाला. आजच्या वधारणीच्या शेअर्समध्ये एमअँडएम, एचडीएफसी, कोटक बँक आणि टाटा स्टील यांचा समावेश झाला. नेस्ले, टेकएम, बजाज फिनसर्व्ह, सन फार्मा आणि एचसीएल मध्ये विक्रीचा जोर दिसून आला. बँकिंग शेअर्समध्ये (Banking Shares) खरेदीचं चित्र राहिल्यामुळं शेअर बाजार सावरला. आजच्या व्यवहारात आयटी आणि फार्मा क्षेत्रात सर्वाधिक घसरण नोंदविली गेली. भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (Life Insurance Corporation) शेअर 52 आठवड्यांच्या नीच्चांकी पातळीवर जाऊन पोहोचला.

कुठे खरेदी, कुठे विक्री-

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर सर्वाधिक खरेदी एमअँडएम, एचडीएफसी आणि कोटक बँकेत दिसून आली. सर्वाधिक विक्रीचा जोर नेस्ले, टेक एम आणि बजाज फिनसर्व्ह मध्ये राहिला. आज व्यवहार बंद होण्याच्या वेळी निफ्टी वर जेएसडब्ल्यू स्टील, कोल इंडिया आणि एचडीएफसी लाईफ सर्वाधिक वाढीसह बंद झाले. तर बजाज ऑटो, हिंदाल्को आणि टेकएम सर्वाधिक घसरणीसह बंद झाले.

शेअर बाजाराचे क्षेत्रनिहाय प्रदर्शन पुढीलप्रमाणे:

  1. आयटी क्षेत्र- 1.41% घसरण
  2. फार्मा क्षेत्र- 1.27% घसरण
  3. हे सुद्धा वाचा
  4. बांधकाम व हेल्थकेअर- 1% घसरण
  5. एफएमसीजी क्षेत्र- 0.72% घसरण
  6. वायू व तेल- 0.4% घसरण
  7. बँक क्षेत्र- 0.38% तेजी
  8. एलआयसी शेअर नीच्चांकी स्तरावर-

सर्वाधिक बाजार मूल्याच्या (मार्केट कॅपिटायलेझेशन) कंपन्यांच्या क्रमवारीत भारतीय आयुर्विमा महामंडळाची घसरण झाली आहे. एलआयसी इंडियाच्या मार्केट कॅप मधील घसरणीनंतर कंपनी 6 व्या क्रमांकावरुन 7 व्या क्रमांकावर पोहोचली आहे. मार्केट कॅपच्या क्रमवारीत आयसीआयसीआय बँक ही एलआयसीला सरस ठरली आहे. एलआयसीला धोबीपछाड देत सर्वाधिक बाजारमूल्य असणारी देशातील 6 व्या क्रमांकाची कंपनी ठरली आहे. आयसीआयसीआय बँक आणि एलआयसी इंडिया नंतर एचडीएफसी लिमिटेड 8 व्या आणि भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडिया 9 व्या स्थानावर आहे. देशातील सर्वाधिक बाजारमूल्य असलेल्या कंपन्यांच्या क्रमावारीत रिलायन्स इंडस्ट्रीज अग्रक्रमावर आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.