गेल्या आठवड्यात सेन्सेक्सची 1500 अंकांनी घसरगुंडी! तब्बल 3.2 लाख कोटींचा चुराडा

गेल्या आठवड्यात सेन्सेक्स 8 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाला आहे. बीएसई लिंस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 246.79 लाख कोटी रुपयांवर घसरुन गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 3.2 लाख कोटींची घट झाली आहे.

गेल्या आठवड्यात सेन्सेक्सची 1500 अंकांनी घसरगुंडी! तब्बल 3.2 लाख कोटींचा चुराडा
शेअर बाजारात पडझड सुरूच Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 12:00 PM

गेल्या आठवड्याचा विचार करता हा काळ शेअर बाजारासाठी अत्यंत वाईट ठरला. या आठवड्यात सेन्सेक्सची 1525 अंकांनी (2.73 टक्के) घसरण झाली आहे. शेवटच्या ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्स (Sensex) 54333 च्या पातळीवर तर निफ्टी (Nifty) 16245 वर बंद झाला. सेन्सेक्स या आठवड्यात आठ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाला आहे. बीएसई लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 246.79 लाख कोटी रुपयांवर घसरले. गेल्या आठवड्यात बीएसईचे (BSE) मार्केट कॅप 249.97 लाख कोटी रुपये होते. या आठवड्यात शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या मालमत्तेत 3.18 लाख कोटी रुपयांची घसरण झाली आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे जागतिक बाजारावर मोठा दबाव आहे. याशिवाय फेडरल रिझर्व्हही व्याजदर वाढवू शकते या शक्यतेनेही आंतराष्ट्रीय पातळीवर वेगवान हालचाली झाल्या आहे. त्याचा परिणाम म्हणून शेअर बाजारात पडझड झालेली दिसून येत आहे.

भारतीय बाजारातून एक्झिट

परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून एक्झिट घेत आहेत. मार्चमध्ये आतापर्यंत फॉरेन पोर्टफोलियो इन्हेस्टर्सनी शेअर बाजारातून 14,721 कोटी रुपये काढून घेतले आहेत. या वर्षात आतापर्यंत FPI ने शेअर बाजारातून एकूण 83616 कोटी काढले आहेत. एकीकडे परदेशी गुंतवणूकदार विक्री करत आहेत. दुसरीकडे, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. गेल्या पाच महिन्यांच्या डीआयआयच्या खरेदीबद्दल बोलायचे तर फेब्रुवारीमध्ये त्यांनी 42084 कोटी, जानेवारीमध्ये 21928 कोटी, डिसेंबरमध्ये 31231 कोटींची कमाई केली. नोव्हेंबरमध्ये 30560 कोटींची आणि ऑक्टोबरमध्ये 4471 कोटींची खरेदी केली.

काय आहे ग्लोबल ब्रोकरेजचे मत

ब्रोकरेजबद्दल बोलायचे झाल्यास, जेफरीजने निफ्टीचे लक्ष्य 17500 पर्यंत कमी केले आहे. सिटी बँकेने गुंतवणूकदारांना डिफेंसिव्ह शेअर्सकडे वळण्याचा सल्ला दिला आहे. मॉर्गन स्टॅन्ले म्हणाले की, भारताचा ग्रोथ चांगला असल्याने त्यामुळे गुंतवणूकदारांनी खरेदीला प्राधान्य देण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. दरम्यान, या आठवड्यात सेन्सेक्समधील टॉप-10 कंपन्यांपैकी सात कंपन्यांचे मार्केट कॅप एकत्रितपणे 2,11,155.03 कोटी रुपयांनी घसरले. या कालावधीत, HDFC बँकेचे बाजार भांडवल 49,321.79 कोटी रुपयांनी घसरून 7,57,610.16 कोटी रुपयांवर आले. हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे ​​बाजार भांडवल 35,396.59 कोटी रुपयांनी घसरून 4,74,593.94 कोटी रुपयांवर आले. HDFC चे भांडवल 33,023.19 कोटी रुपयांनी घसरून 4,02,210.71 कोटी रुपये झाले आणि ICICI बँकेचे भांडवल 29,343.26 कोटी रुपयांनी घसरून 4,78,070.84 कोटी रुपये झाले. बजाज फायनान्स, भारती एअरटेल आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बाजार भांडवलातही गेल्या आठवड्यात घट झाली.

रिलायन्सचे मार्केट कॅप वाढले

दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​भांडवल 28,006.22 कोटी रुपयांनी वाढून 15,73,050.36 कोटी रुपयांवर पोहोचले. इन्फोसिसचे भांडवल 12,470.59 कोटी रुपयांनी वाढून 7,24,913.68 कोटी रुपये आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे भांडवल 2,034.48 कोटी रुपयांनी वाढून 13,03,989.59 कोटी रुपये झाले.

रोजगारावर आता कोरोनाचा परिणाम जाणवणार नाही, नोकऱ्या मिळत राहणार – सर्व्हे

Share बाजार सारखा आपटतोय! गुंतवणूक करण्याची हीच खरी सुवर्ण संधी? काय सांगतात तज्ज्ञ?

नव्या कारसाठी तुम्हाला अजून वाट पाहावी लागणार? रशिया-यूक्रेन युद्धामुळे चिपची कमतरता

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.