Share Market: ‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणुकदार मालामाल; वर्षभरात 260 टक्के रिटर्न्स

Share market | APL Apollo Tubes ही कंपनी स्ट्रक्चरल स्टील ट्यूबची निर्मिती करते. यामध्ये प्री-गॅलन्वाईज ट्यूब, स्ट्रक्चरल स्टील ट्यूब आणि एमएस ब्लॅक पाईप्स आणि हॉलो सेक्शन्स अशा उत्पादनांचा समावेश आहे.

Share Market: ‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणुकदार मालामाल; वर्षभरात 260 टक्के रिटर्न्स
Follow us
| Updated on: Sep 12, 2021 | 7:11 AM

मुंबई: गेल्या वर्षभरात शेअर बाजारात अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. यावेळी सर्वाधिक कमाई करून देणाऱ्या शेअर्समध्ये अनेक मिडकॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांचा समावेश आहे. अशाच एका कंपनीच्या समभागाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. APL Apollo Tubes या समभागाने गेल्या वर्षभरात गुंतवणुकदारांना 260 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात APL Apollo Tubes च्या समभागाची किंमत 480 रुपये इतकी होती. मात्र, आता या समभागाची किंमत थेट 1880 रुपयांवर जाऊन पोहोचली आहे.

APL Apollo Tubes ही कंपनी स्ट्रक्चरल स्टील ट्यूबची निर्मिती करते. यामध्ये प्री-गॅलन्वाईज ट्यूब, स्ट्रक्चरल स्टील ट्यूब आणि एमएस ब्लॅक पाईप्स आणि हॉलो सेक्शन्स अशा उत्पादनांचा समावेश आहे.

या कंपनीच्या समभागात गुंतवणूक करावी का?

आगामी काळात APL Apollo Tubes कंपनीच्या समभागाचा भाव आणखी वाढू शकतो, असे जाणकारांचे मत आहे. तांत्रिक विश्लेषणानुसार हा समभाग 2065 रुपयांपर्यंत उसळी घेईल, असा अंदाज आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांना या समभागाच्या माध्यमातून चांगले पैसे कमावता येऊ शकतात.

महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडच्या शेअर्सवर बंपर रिटर्न्स

सध्या शेअर बाजारात महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडच्या (MLL) समभागाची प्रचंड चर्चा आहे. गेल्या वर्षभरात या कंपनीच्या समभागांनी गुंतवणुकदारांना 192 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. 27 जुलै 2020 रोजी महिंद्रा लॉजिस्टिक्सच्या शेअरचा भाव 276.7 रुपये इतका होता. आता याच समभागाची किंमत 807.30 इतकी झाली आहे. याचा अर्थ वर्षभरापूर्वी एखाद्या गुंतवणुकदाराने महिंद्रा लॉजिस्टिक्सचे एक लाख रुपयांचे समभाग विकत घेतले असतील तर आता त्यांची किंमत साधारण 14.58 लाखांच्या घरात गेली आहे.

गुडलक इंडियाची वेगवान घोडदौड

यंदाच्या वर्षात शेअर बाजारात अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. यावेळी सर्वाधिक कमाई करून देणाऱ्या शेअर्समध्ये अनेक मिडकॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांचा समावेश आहे. गुडलक इंडिया (Goodluck India) हा देखील अशाच समभागांपैकी एक आहे. या इंजीनिअरिंग कंपनीच्या शेअर्सनी गेल्या वर्षभरात गुंतवणुकदारांना 400 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. या कंपनीच्या एका समभागाचा भाव 39.05 रुपयांवरून 194.90 रुपये इतका झाला आहे.

संबंधित बातम्या:

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांनो 30 सप्टेंबरपर्यंत ‘हे’ काम आटपा, अन्यथा ट्रेडिंगला लागेल ब्रेक

फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा जास्त रिटर्न्स मिळवून देणारे पर्याय, जाणून घ्या सर्वकाही

ओलाच्या ई-स्कूटरसाठी कर्ज सहज उपलब्ध होणार, ईएमआय 2999 पासून सुरू, कंपनीने देशातील सर्व बँकांशी केला करार

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.