AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्षभरात 300 टक्के परतावा, ज्यांनी ‘हा’ शेअर खरेदी केला ते मालामाल

सुदर्शन फार्मा इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअरने अवघ्या वर्षभरात गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला आहे. या काळात या शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे चौपटीने वाढवले.

वर्षभरात 300 टक्के परतावा, ज्यांनी ‘हा’ शेअर खरेदी केला ते मालामाल
Share MarketImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Edited By: | Updated on: Apr 09, 2025 | 3:41 PM
Share

शेअर बाजारात असेही काही शेअर्स आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना अल्पावधीतच कोट्यधीश बनवले आहे. या शेअर्समध्ये स्मॉलकॅप फार्मा कंपनी सुदर्शन फार्मा इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअरचाही समावेश आहे. गेल्या वर्षभरात या शेअरने गुंतवणूकदारांना जवळपास 300 टक्के मल्टिबॅगर परतावा दिला आहे. अशा प्रकारे या शेअरने वर्षभरात गुंतवणूकदारांचे पैसे चौपट केले.

गेल्या वर्षी कंपनीने आपल्या शेअरचे विभाजन केले होते. कंपनीने प्रत्येकी 10 रुपयांच्या फेस व्हॅल्यूचा एक इक्विटी शेअर तोडून प्रत्येकी 1 रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या 10 इक्विटी शेअर्समध्ये करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी 23 नोव्हेंबर 2024 ही विक्रमी तारीख होती. कंपनीचा 50.10 कोटी रुपयांचा IPO मार्च 2023 मध्ये आला होता. BSE SME वर 22 मार्च 2023 रोजी हे शेअर्स लिस्ट झाले होते.

BSE वर सुदर्शन फार्मा इंडस्ट्रीजच्या शेअरची 52 आठवड्यांतील उच्चांकी किंमत 53.50 रुपये आहे. तर, 52 आठवड्यांचा नीचांकी भाव 5.82 रुपये आहे. या कंपनीचे मार्केट कॅप 754 कोटी रुपये आहे.

सुदर्शन फार्मा इंडस्ट्रीजच्या शेअर्सची कामगिरी पाहिली तर गेल्या आठवडाभरात त्यात 2.69 टक्क्यांची वाढ झाली आहे. शेअरच्या किंमतीत 1 महिन्यात 8.10 टक्के वाढ झाली आहे. गेल्या 3 महिन्यांत 35.50 टक्क्यांची घसरण झाली आहे. या वर्षी आतापर्यंत 29.67 टक्के निगेटिव्ह परतावा देण्यात आला आहे. गेल्या वर्षभरात त्यात 299.49 टक्क्यांची वाढ झाली आहे.

स्वयंचलित गुंतवणूक

तुमच्या पगारातून आपोआप गुंतवणूक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा सुरू करा. याचा फायदा असा होईल की तुम्ही तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी सतत पैसा गोळा करत आहात. तसेच यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळी काळजी करावी लागणार नाही.

गुंतवणुकीबाबत नेहमी शिस्त बाळगा

तुम्ही जे काही गुंतवणुकीचे नियोजन कराल त्याबाबत नेहमी शिस्त बाळगा. म्हणजे पगार आल्यावर आधी स्वत:ची गुंतवणूक करावी. तसेच बाजारात चढ-उतार होऊ शकतात. तुमच्या दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांना धोका पोहोचेल असा कोणताही निर्णय घेऊ नका.

गुंतवणुकीवर लक्ष ठेवणं गरजेचं

गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगावी लागेल. वेगवेगळी उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक कशी कामगिरी करत आहे हे पहात रहा. गरज भासल्यास तुमच्या गुंतवणुकीत किंवा गुंतवणुकीच्या धोरणात गुंतवलेल्या रकमेत बदल करा जेणेकरून तुम्ही तुमच्या ध्येयापासून कमी पडणार नाही.

(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.