SHARE MARKET: शेअर बाजारात मोठी पडझड, सेंन्सेक्स 1024 अंकांनी गडगडला, गुंतवणुकदारांत चलबिचल

नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय अर्थजगातील घडामोडींचा भारतीय शेअर (Indian share market) बाजारावर प्रतिकूल परिणाम दिसून आला. सेंन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण नोंदविली गेली. सेंन्सेक्स 1024 अंकांच्या घसरणीसह 57,621 वर बंद झाला. तर निफ्टी 303 अंकांच्या घसरणीसह 17214 वर पोहोचला. आज (सोमवारी) निफ्टीवर ऑटो, बँक, फायनान्स, रियल्टी शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली. ऑटो इंडेक्समध्ये 1.5 टक्के, बँक […]

SHARE MARKET: शेअर बाजारात मोठी पडझड, सेंन्सेक्स 1024 अंकांनी गडगडला, गुंतवणुकदारांत चलबिचल
गुंतवणूक हजारात, रिटर्न लाखात; शेअर फसवणुकीचा ‘सोशल’ पॅटर्न!
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 5:50 PM

नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय अर्थजगातील घडामोडींचा भारतीय शेअर (Indian share market) बाजारावर प्रतिकूल परिणाम दिसून आला. सेंन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण नोंदविली गेली. सेंन्सेक्स 1024 अंकांच्या घसरणीसह 57,621 वर बंद झाला. तर निफ्टी 303 अंकांच्या घसरणीसह 17214 वर पोहोचला. आज (सोमवारी) निफ्टीवर ऑटो, बँक, फायनान्स, रियल्टी शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली. ऑटो इंडेक्समध्ये 1.5 टक्के, बँक आणि फायनान्शियल निर्देशांकात 2 टक्के आणि 2.5 टक्के घसरण नोंदविली गेली. एफएमसीजी निर्दशांकात (FMCG Index) 2 टक्क्यांहून अधिक आणि आयटी व फार्मा निर्देशांकात 1 टक्क्यांहून अधिक घसरण झाली. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर (Bombay stock exchange) सूचीबद्ध (लिस्टेड) कंपन्यांचा मार्केट कॅप 3 लाख कोटींनी घसरला.

अर्थसंकल्प (Budget 2022) सादर झाल्यानंतर शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम दिसून आला होता. शेअर बाजार अर्थसंकल्पानंतर अवघ्या दोनच दिवसात स्थिरस्थावर झाल्याचं चित्र निर्माण झालं. प्रमुख वित्तीय संस्थांचे आर्थिक तिमाही अहवाल (Q3 Results) पटलावर येत असल्यामुळे गुंतवणुकदारांनी सावधगिरीचे धोरण स्विकारले आहे.

आजचे तेजीचे शेअर्स-

• पॉवर ग्रिड कॉर्प (1.88) • ओएनजीसी (1.47) • एनटीपीसी (0.71) • श्री सिमेंट (0.57) •टाटा स्टील (0.57)

आजचे घसरणीचे शेअर्स-

•टीसीपी (-3.95) • एचडीएफसी बँक (-3.66) •एचडीएफसी लाईफ (-3.38) •लार्सेन (-3.26) •बजाज फायनान्स (-3.18)

गुंतवणुकदारांत चलबिचल?

अर्थसंकल्पातील घोषणांचा किंवा तरतुदींचा प्रभाव उद्योगजगतावर अल्पकाळ टिकला. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर काही दिवसांतच बाजारात पडझड नोंदविली गेली. रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक समितीची बैठकीला आजपासून सुरुवात झाली आहे. बुधवारी चलनविषयक धोरण घोषित केले जाणार आहे. अर्थतज्ज्ञांनी रिझर्व्ह बँकेचं धोरण स्थिर राहणार असल्याचं म्हटलं आहे. रिव्हर्स रेपो दरात घट आणि रेपो दर स्थिर अशी शक्यता अर्थवर्तृळाने वर्तविली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांत चलबिचल निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.