SHARE MARKET: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घसरण, सेन्सेक्स 482 अंकांनी गडगडला
सेन्सेक्स 482 अंकाच्या घसरणीसह 58964 च्या स्तरावर बंद झाला. निफ्टी 103 अंकांच्या घसरणीसह 17681 वर बंद झाला. आज (सोमवारी) सेन्सेक्सचे टॉप-30 मधील आठ शेअर तेजीसह आणि 22 शेअर घसरणीसह बंद झाले.
नवी दिल्ली : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराची (SHARE MARKET UPDATE) घसरणीनं सुरुवात झाली. सेन्सेक्स 482 अंकाच्या घसरणीसह 58964 च्या स्तरावर बंद झाला. निफ्टी 103 अंकांच्या घसरणीसह 17681 वर बंद झाला. आज (सोमवारी) सेन्सेक्सचे टॉप-30 मधील आठ शेअर तेजीसह आणि 22 शेअर घसरणीसह बंद झाले. आयसीआयसीआय बँक, एनटीपीसी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TATA CONSULTANCY SERVICE) मध्ये तेजी नोंदविली गेली. तर एचसीएल, एल अँड टी, इन्फोसिस आणि विप्रोच्या शेअरमध्ये घसरण झाली. आज अदानींच्या ग्रीन-20 शेअ्र्रर्समध्ये तेजी नोंदविली गेली. आजच्या घसरणीसह बीएसई सूचीबद्ध (लिस्टेड) कंपन्यांचा मार्केट कॅप 275.41 लाख कोटीवर पोहोचला. गेल्या आठवड्यात मार्केट कॅप (MARKET CAP) 274.10 लाख कोटींवर होता.
शेअर बाजारात घसरणीमुळे गुंतवणुकदारांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. आज (सोमवार) गुंतवणुकदारांच्या संपत्तीत तब्बल 1.31 लाख कोटींची भर पडली.
आजचे वधारणीचे शेअर्स (Todays Top Gainers)
- ग्रॅसिम (2.76%)
- अदानी पोर्ट्स (1.82%)
- जेएसडब्ल्यू स्टील (1.43%)
- सिप्ला (1.37%)
- यूपीएल (1.25%)
आजचे घसरणीचे शेअर्स (Todays Top Loosers)
- एचसीएल टेक (-2.73%)
- लार्सेन (-2.69%)
- इन्फोसिस (-2.65%)
- विप्रो (-2.15%)
- एसबीआय लाईफ इन्श्युरन्स (-1.55%)
अदानी ग्रीनमध्ये 15 टक्के तेजी
अदानी ग्रीनच्या शेअर्समध्ये तब्बल 20 टक्क्यांची तेजी नोंदविली गेली. आज शेअर 14.79 टक्क्यांच्या तेजीसह 2655 रुपयांच्या स्तरावर बंद झाला. व्यवहाराच्या दरम्यान 2786 रुपयांची सर्वोच्च किंमत मिळाली. तेजीनंतर कंपनीचा मार्केट कॅप 4.16 लाख कोटींवर पोहोचला. अदानी शेअर्सने गेल्या एक आठवड्यात 26 टक्के, एका महिन्यांत 43 टक्के आणि तीन महिन्यांत 70 टक्के आणि एक वर्षात तब्बल 100 टक्के रिटर्न मिळवून दिले.
अदानीत बंपर गुंतवणूक
अबुधाबी स्थित इन्व्हेस्टमेंट फर्म इंटरनॅशनल होल्डिंग कंपनीने (International holding company) अदानी ग्रूपच्या तीन कंपन्यांत 2 बिलियन डॉलर (15 हजार कोटी) रुपयांचा फंड उभारण्याची घोषणा केली आहे. अदानी ग्रूपच्या तीन कंपन्या अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी एंटरप्रायजेस यांचा समावेश आहे. गुंतवणुकीच्या घोषणेनंतर तीन शेअर्समध्ये तेजी नोंदविली गेली.