अदानी ग्रुपचे शेअर्स तेजीत; ट्रेडिंगमध्ये सर्वोच्च पातळीवर
अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये मंगळवारी सर्वाधिक वाढ दिसून आली. सुमारे 14 टक्क्यांनी शेअर 173.55 रुपयांवर बंद झाला. तर व्यापारादरम्यान तो 181.40 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला होता. त्याच वेळी अदानी विल्मर शेअर 9 टक्क्यांनी वाढून 503 रुपयांवर बंद झाला होता.
अदानी पावर ग्रुपच्या शेअर्समध्ये मंगळवारी सगळ्यात जास्त तेजी दिसून आली. या कंपनीचे शेअर्स किमान 14 टक्क्यांनी वाढून 173.55 रुपयांवर बंद झाले. तर दिवसभराचा विचार केला तर तो 181.40 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर जाऊन पोहोचला होता.
शेअर्स बाजारात मंगळवारी झालेल्या चढ उतारानंतर सर्व क्षेत्रात चांगलेच व्यवहा झाल्याचे पाहायला मिळाले. शेअर्स मार्केटच्या या तेजीत अदानी ग्रुपचे शेअर्स सर्वाधिक वधारल्याचेही दिसून आले. अदानी ग्रुपच्या काही कंपन्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे शेअर्स खरेदी करणाऱ्यांना त्याचा फायदा होत आहे.
अदानी समूहाच्या एकूण 7 कंपन्या शेअर मार्केटमध्ये आहेत. आजच्या व्यवहाराअंती 6 कंपन्यांमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले, तर केवळ अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स काही कालावधीनंतर बंद झाले. वाढत्या शेअर्सच्या व तेजीमुळे अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्या संपत्तीत झपाट्याने वाढ झाली आहे.
अदानी ग्रुपची उसळी
अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये मंगळवारी सर्वाधिक वाढ दिसून आली. सुमारे 14 टक्क्यांनी शेअर 173.55 रुपयांवर बंद झाला. तर व्यापारादरम्यान तो 181.40 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला होता. त्याच वेळी अदानी विल्मर शेअर 9 टक्क्यांनी वाढून 503 रुपयांवर बंद झाला होता. सोमवारीही या समभागात 10 टक्के अपर सर्किट होते. अदानी विल्मरचे मार्केट कॅप 64970 कोटी रुपयांवर पोहोचले. एवढेच नाही तर अदानी एंटरप्रायझेस, अदानी पॉवर आणि अदानी ट्रान्समिशनसह अदानी विल्मारचा शेअर सार्वकालिक उच्चांकावर पोहोचल्याचे दिसून आले.
तसेच अदानी समूहाची लार्ज कॅप कंपनी अदानी पोर्टचे शेअर्स 3.39 टक्क्यांनी वाढून 762 रुपयांवर बंद झाले. तर अदानी टोटल गॅसचा समभाग 1.85 टक्क्यांच्या वाढीसह 2180 रुपयांवर बंद झाला होता. त्याच वेळी, अदानी ट्रान्समिशनचा समभाग 0.92 टक्क्यांच्या वाढीसह 2461 रुपयांवर बंद झाला. अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 0.40 टक्के वाढून 1917 वर बंद झाले. फक्त अदानी ग्रीन एनर्जीचा स्टॉक 0.40 टक्के घसरून 1923 वर बंद झाला.
शेअर्सची वाढ
अदानी पॉवरचा शेअर 14 टक्क्यांनी वाढ झाली अदानी विल्मरचा शेअर 8.45 टक्क्यांनी वाढला. अदानी पोर्टचा शेअर 3.39 टक्क्यांनी वाढला. अदानी टोटल गॅसचा साठा 1.85 टक्क्यांनी वाढ अदानी ट्रान्समिशनचे शेअर्स 0.92 टक्क्यांनी वधारले. अदानी एंटरप्रायझेसचे समभाग 0.40% वाढले. अदानी ग्रीन एनर्जीचे समभाग 0.40% घसरले.
गेल्या वर्षी अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ झाली होती. आता पुन्हा एकदा अदानी समूहाच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे.
संबंधित बातम्या
सामना वाचायचा नाही आणि संजय राऊतांवर बोलायचं नाही, चंद्रकांत पाटील असं का म्हणाले?
Nagpur Crime : भाड्याने घर बघण्याच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या वृद्ध महिलेला पोलिसांनी घातल्या बेड्या
‘अशी ही बनवाबनवी’ एकदा पहाच; जयंत पाटलांचा इस्त्रायलच्या अधिकाऱ्याला सल्ला!