पीयुष बन्सलला रात्री 1 वाजता करावी लागली साफ-सफाई, सांगितलं या मागचं कारण

लेन्सकार्टचा सीईओ आणि को-फाउंडर पियुष बन्सल सध्या शार्क टँक इंडिया शोमुळे चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. त्याचे चाहते ही या शोमुळे वाढले आहेत. सध्या त्याचा एक फोटो व्हायरल होत आहे.

पीयुष बन्सलला रात्री 1 वाजता करावी लागली साफ-सफाई, सांगितलं या मागचं कारण
Lenskart founder
Follow us
| Updated on: Feb 13, 2023 | 8:03 PM

मुंबई : लेन्सकार्टचा संस्थापक पियुष बन्सल याची आज वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाही. शार्क टॅंक इंडियामुळे त्याला आज मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. या शोमधून त्याचे फॅन फॉलोअर्स देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तो आज कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक आहे. पण यासाठी त्याने खूप मेहनत घेतली हे वेगळं सांगण्याची गरज नाही. कारण आज लेन्सकार्टचं यश जगासमोर आहे. पियुष बन्सलचा एक फोटो सध्या चर्चेत आहे. एखाद्या स्टार्ट-अप व्यवसाय यशस्वी करण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो. हे त्याचं उदाहरण आहे. भारतात सध्या अनेक तरुण नव्या स्टार्टअपच्या माध्यमातून उद्योजग होण्याचं स्वप्न पाहत आहेत. त्यांना शार्क टँक शोच्या माध्यमातून चांगली मदत होत आहे.

Lenskart चं सिंगापूरमधलं पहिलं स्टोअर

लेन्सकार्टचे पहिले स्टोअर सिंगापूरमध्ये सुरु होणार होते. साडेतीन वर्षांपूर्वी सिंगापूरमध्ये पहिले स्टोअर सुरू केले होते. त्याआधी दुकानाची स्वच्छता करण्यासाठी कोणीच नव्हते. म्हणून पियुष बन्सल याने स्वत:च कापड हातात घेतलं आणि कामाला लागला. पियुष बन्सल म्हणाले की, मला त्यांच्या ग्राहकांना चांगला अनुभव द्यायचा आहे. यामुळे तो स्वतः रात्री एक वाजता दुकानाची साफसफाई करण्यात गुंतला होता.

पियुष बन्सल शार्क टँक इंडिया या शोमध्ये जज म्हणून दिसत आहे. तो अनेक नव्या उद्योजकांना नेहमीच सपोर्ट करताना दिसतो. त्यामुळे लोकं त्याला आणखी पसंत करु लागले आहेत. शोदरम्यान त्याला त्याचे जुने दिवस आठवत आहेत. पीयूष बन्सल यांनी सह-संस्थापक, त्यांची टीम आणि त्यांच्या पत्नीसह लेन्सकार्ट स्टोअर सकाळी 1 वाजेपर्यंत कसे स्वच्छ केले ते सांगितले आहे.

अनेक स्टार्टअपमध्ये गुंतवणूक

पियुष बन्सल सध्या शार्क टँक इंडियाच्या सीझन-2 मध्ये देखील दिसत आहे. सीझन-1 मध्ये, पियुषने 27 कंपन्यामध्ये जवळपास 8.7 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. दुसऱ्या सीजनमध्ये त्याने आतापर्यंत 9.45 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

36 वर्षांचा पियुष बन्सल याने आतापर्यंत अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलीये. तो अनेक युवा उद्योजकांना मदत करण्यासाठी नेहमीच पुढे येतो. जिथे पैसे गुंतवणूक करत नाही तिथे त्या उद्योजकांना योग्य सल्ले आणि वेळ पडली तर मार्गदर्शन करण्यासाठी तयार असल्याचं देखील सांगतो.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.