शार्क टँक इंडिया’ चौथ्या सीझनची नोंदणी प्रक्रिया सुरू, असा करा अर्ज
शार्क टँक इंडिया हा भारतातील लोकप्रिय रिॲलिटी शो पैकी एक आहे. या शोचे तीन यशस्वी सीझन आले आहेत. आता शार्क टँक इंडिया सीझन 4 सह परतण्यासाठी सज्ज आहे. शोचा नवा प्रोमो रिलीज झाला असून शार्क टँक इंडिया सीझन 4 साठी नोंदणी सुरू झाल्याची माहिती देण्यात आली.
भारतातील सर्वात प्रसिद्ध बिझनेस रियालिटी शो ‘शार्क टँक इंडिया’च्या चौथ्या सीझन लवकरच प्रक्षेकांच्या भेटीला येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या शोची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. हा शो नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी जज फंडीग करतात. गुंतवणूकदारांसमोर ते आपल्या बिझनेसची कल्पना मांडण्यासाठी एक मोठं व्यासपीठ देतो. सीझन 4 सह, ‘शार्क टँक इंडिया’ पुन्हा एकदा भारताच्या सर्व भागातून स्पर्धकांना आमंत्रित करत आहे.
‘शार्क टँक इंडिया’च्या मागील सीझनमध्ये, अनेक नवीन आणि अनोख्या व्यावसायिक कल्पना आल्या होत्या. ज्यांनी गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले होते. ‘शार्क टँक इंडिया’ने आपल्या शोमध्ये येणाऱ्या स्पर्धकांना केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम केले नाही तर त्यांना आणि त्यांच्या ब्रँडची ओळखही दिली आहे. नवीन हंगामातही आता देशभरातील उद्योजकांना त्यांच्या व्यवसायाच्या संकल्पना मांडण्यासाठी संधी दिली जाणार आहे.
24 जून रोजी ‘शार्क टँक इंडिया’चा नवीन प्रोमो रिलीज झालाय. यासोबतच शोसाठी नोंदणी विंडो उघडण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. शोच्या चौथ्या सीझनसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. शोमध्ये सहभागी होण्यासाठी, स्पर्धक अधिकृत वेबसाइटला भेट देऊन स्वतःची नोंदणी करू शकतात. नोंदणीसाठी, उमेदवारांना त्यांची वैयक्तिक माहिती, व्यवसाय कल्पनेशी संबंधित तपशील आणि एक व्हिडिओ अपलोड करावा लागेल ज्यामध्ये ते त्यांची कल्पना तपशीलवार स्पष्ट करू शकतील.
शार्क टँक इंडिया सीझन 3 मध्ये रॉनी स्क्रूवाला (चित्रपट निर्माता-व्यावसायिक), रितेश अग्रवाल (ओयो रूम्सचे संस्थापक आणि सीईओ), दीपंदर गोयल (झोमॅटोचे संस्थापक आणि सीईओ), अझहर इकबाल (इनशॉर्ट्सचे सह-संस्थापक आणि सीईओ) हे जज होते.
राधिका गुप्ता (एडलवाईस म्युच्युअल फंडचे एमडी आणि सीईओ), आणि वरुण दुआ (संस्थापक आणि सीईओ ACKO). त्यांच्यासोबत जुने न्यायाधीश अमन गुप्ता, अमित जैन, अनुपम मित्तल, नमिता थापर, विनिता सिंग आणि पियुष बन्सल यांचाही समावेश होता.