AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकदाच 50 हजार रुपये लावा, दहा वर्षात लाखो कमवा

जर तुम्हाला घरी बसून चांगली कमाई करायची असेल तर तुम्हाला शेवग्याच्या शेंगांच्या शेतीचा (Drumstick cultivation) एक चांगला पर्याय आहे (earn money from drumstick cultivation).

एकदाच 50 हजार रुपये लावा, दहा वर्षात लाखो कमवा
| Updated on: Dec 27, 2020 | 2:56 PM
Share

मुंबई : जर तुम्हाला घरी बसून चांगली कमाई करायची असेल तर तुम्हाला शेवग्याच्या शेंगांच्या शेतीचा (Drumstick cultivation) एक चांगला पर्याय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सिक्रेट रेसिपीमध्ये शेवग्याच्या शेंगांचादेखील समावेश आहे. शेवग्याच्या शेंग्यांना इंग्रजीत ड्रमस्टिक असं म्हटलं जातं. शेवग्याच्या शेंगांमध्ये प्रोटीन, आयरन, बीटा कॅरोटीन, अमीनो अॅसिड, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, ए, सी आणि बी जीवनसत्वे सारखे पोषक तत्व असतात (earn money from drumstick cultivation).

शेवग्याच्या शेंगांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्मदेखील आहेत. त्यामुळे एका आठवड्यातून फक्त तीनवेळा शेवग्याच्या शेंगा खाल्या तरी शरीरातील शुगरचं प्रमाण नियंत्रणात राहू शकतं. शेवग्याच्या शेंगांची शेती केल्यास तुम्ही बक्कड पैसे कमवू शकता. एक एकर जमिनीत शेवग्याच्या शेंगांच्या झाडांची शेतीत  करायची असल्यास 50 हजार रुपयांपर्यंतचा खर्च येतो. मात्र, या शेतीतून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता.

औषधी वनस्पतींची प्रचंड मागणी

शेवग्याच्या शेंगांच्या शेतीचा आणखी एक फायदा असा की, एकदा पेरणी केली की पुढचे चार वर्ष चिंता नाही. या औषधी वनस्पतीचे अनेक फायदे असल्यामुळे विक्रीसाठी किंवा मार्केटिंगसाठी जास्त मेहनत घेण्याची गरज भासत नाही. शेवग्याच्या शेंगा सहजपणे आपण निर्यात करु शकतो. कारण भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात औषधी वनस्पतींची प्रचंड मागणी आहे.

एका झाडाचं 10 वर्षांपर्यंत उत्पादन

उष्ण वातावरणात शेवग्याच्या शेंगांचं झाड लवकर मोठं होतं, अशी माहिती शब्ला सेवा संस्थानचे संस्थापक अविनाश कुमार यांनी दिली. विशेष म्हणजे या झाडाला जास्त पाण्याची आवश्यकता नाही. पण थंड वातावरणात चांगलं उत्पादन येऊ शकत नाही. कारण या झाडाचं फुल उगवण्यासाठी जवळपास 25 ते 30 अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते.

कोरड्या वाळूत किंवा गुळगुळीत वाळूच्या जमिनीत शेवग्याच्या शेंगांच्या पिकांची चांगली भरभराट होते. पहिल्या वर्षानंतर वर्षातून दोनदा त्याचे उत्पादन होते आणि साधारणपणे 10 वर्षे झाड चांगले उत्पन्न देते (earn money from drumstick cultivation).

किती होणार उत्पन्न?

अविनाश कुमार यांच्या माहितीनुसार, एका एकर जमिनीत जवळपास 1200 झाडं लावता येतील. त्यातून 50 हजार रुपयांचं उत्पन्न येईल. याशिवाय 60 हजार रुपयांपर्यंतची पाने तुम्ही विकू शकतात. त्यामुळे जवळपास एका एकर जमिनीत तुम्ही एक लाखापेक्षा जास्त रुपयांचं उत्पन्न काढू शकता.

शेवग्याच्या शेंगाच्या झाडाचा प्रत्येक भाग खाण्यासारखा असतो. तुम्ही कोशिंबिरमध्ये त्याचे पानं टाकू शकतात. शेवग्याची पानं, फुलं आणि फळं सर्वांमध्ये जीवनसत्व असतं. याशिवाय यांपासून तेलही तयार करता येतं.

हेही वाचा : Face Cure | चेहऱ्यावरील काळे डाग आणि पिंपल्समुळे तुम्ही त्रस्त आहात? तर ही खास बातमी तुमच्यासाठी!

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.