SBI ठेवीदारांसाठी खूषखबर: RD गुंतवणुकीवर अधिकचा परतावा, बँकेने व्याजदर वाढवले

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ठेवीदारांसाठी खूषखबर आहे. बँकेच्या आर्वती ठेव योजनेत (RD) ग्राहकांना आता अधिकचा परतावा मिळणार आहे. बँकेने आरडीच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. बँकेच्या आरडीवर आता 5.30 ते 5.50 टक्क्यांपर्यंत व्याज देण्यात येत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी या व्याजदरात 50 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली आहे.

SBI ठेवीदारांसाठी खूषखबर: RD गुंतवणुकीवर अधिकचा परतावा, बँकेने व्याजदर वाढवले
व्याजदर वाढलेImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 1:35 PM

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) खातेधारकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. बँकेने आवर्ती ठेव (Recurring Deposit) योजनेचा व्याजदर वाढवला आहे. हा नवीन नियम 14 जून 2022 रोजी पासून लागू होईल. आरडी खात्याचा कालावधी हा 12 महिन्यांपासून ते 10 वर्षांकरीता असतो. आरडीमध्ये खातेदाराला 100 रुपयांपासून गुंतवणूक करता येते. नवीन नियमानुसार, आता खातेदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर 5.30 ते 5.50 टक्क्यांनी व्याज मिळेल. सर्वसाधारण खातेधारकांसाठी हा नवीन दराने व्याज मिळेल. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी (Senior Citizens) या व्याजदरात आणखी वाढ करण्यात आली आहे. त्यांना गुंतवणुकीवर 50 बेसिस पॉईंट्स (Basis Points) म्हणजे 0.50 टक्क्यांनी अतिरिक्त व्याज अदा करण्यात येईल. एकीकडे महागाईने हैराण झालेल्या नागरिकांना त्यांच्या बचतीवर आता चांगले व्याज प्राप्त होणार असल्याने त्यांना अतिरिक्त कमाईचे आणि आर्थिक सुरक्षेची हमी देणारे साधन उपलब्ध आहे.

5 ते 10 वर्षांच्या आरडीवर 5.50 टक्क्यांचा नफा

एक वर्षांपेक्षा अधिक अथवा दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या आरडीवर आता खातेधारांना 5.30 टक्के व्याज मिळेल. दोन वर्षांपेक्षा जास्त अथवा तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या आरडीवर 5.35 टक्क्यांनी व्याज मिळेल. स्टेट बँकेने याच कालावधीतील आरडीसाठी व्याजदरात 15 बेसिस पॉईंट्सची म्हणजे 0.15 टक्क्यांची वाढ केली आहे. या कालावधीच्या आरडीवर यापूर्वी 5.20 टक्के व्याज देण्यात येणार आहे. त्यात वाढ करुन ते आता 5.35 टक्के करण्यात आले आहे. खातेदारांना त्यामुळे फायदा होईल. तीन वर्षांपेक्षा जास्त आणि पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या आरडीवर 5.45 टक्क्यांचा फायदा मिळेल. तर पाच वर्ष ते 10 वर्षांदरम्यानच्या कालावधीतील आरडीसाठी स्टेट बँकेच्या ग्राहकांना 5.50 टक्के लाभ मिळेल.

हे सुद्धा वाचा

अशी आहेत नवीन दर

1 वर्षापेक्षा जास्त आणि 2 वर्षांपेक्षा कमी आरडीसाठी 5.30 टक्के 2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपेक्षा कमी आरडीसाठी 5.35 टक्के 3 वर्षांपेक्षा जास्त आणि 5 वर्षांपेक्षा कमी आरडीसाठी 5.45 टक्के 5 वर्षे ते 10 वर्षांपर्यंतच्या आरडीसाठी 5.50 टक्के

RBI ने रेपो रेटमध्ये केली वाढ

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी 8 जून रोजी रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉईंट्सची वाढ करण्याची घोषणा केली. त्यानंतर रेपो रेटमध्ये 4.40 टक्के वाढ करण्यात येऊन ती 4.90 टक्के करण्यात आली. रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये केलेल्या वाढीनंतर सर्वंच बँकांनी त्यांच्या व्याजदरात वाढ केली आहे. यासोबतच बँकांनी बचत खाते, मुदत ठेवी आणि आर्वती ठेव योजनेच्या व्याज दरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.