AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्समध्ये 400 अकांची घसरण, गुंतवणूकदारांना मोठा फटका

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. आज शेअर बाजार  सुरू होताच सेन्सेक्स तब्बल 422.83 अकंनी घसरून 56,701.48 अकांवर पोहोचला. तसेच निफ्टीमध्ये देखील 128.40 अकांची घट झाली आहे.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्समध्ये 400 अकांची घसरण, गुंतवणूकदारांना मोठा फटका
शेअर बाजार
| Edited By: | Updated on: Dec 27, 2021 | 1:11 PM
Share

मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. आज शेअर बाजार  सुरू होताच सेन्सेक्स तब्बल 422.83 अकंनी घसरून 56,701.48 अकांवर पोहोचला. तसेच निफ्टीमध्ये देखील 128.40 अकांची घट झाली आहे. सध्या निफ्टी 16,875.35 अकांवर आहे. दरम्यान गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी देखील सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घट झाली होती. हा आठवडा गुंतवणुकदारांसाठी काही अंशी निराशजनकच राहणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

गेल्या आठवड्यातही झाली होती घसरण 

दरम्यान दुसरीकडे गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी देखील शेअर बाजारामध्ये घसरण झाल्याचे पहायाला मिळाले होते. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सेन्सेंक्स 191 अकांनी घसरून 57,124.31 अंकांवर बंद झाला होता. तर निफ्टी 68.85 अंकाच्या घसरणीसह 17,003.75 अंकांवर बंद झाला होता. आज सोमवारी शेअर बाजार सुरू होताच पुन्हा एकदा कोसळला आहे. अनेक कंपन्यांच्या शेअरला याचा मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे.

‘या’ कंपन्यांना बसला मोठा फटका

सोमवारी पावरग्रीड, सनफार्मा, डी. रेड्डी, एनटीपीसी आणि एम& एम या कंपन्याच्या शेअरमध्ये काही अंशी तेजी दिसून आली, तर दुसरीकडे टीसीएस, एलटी, विप्रो, एचडीएफची बँक, भारती एअरटेल, आसीआसीआय बँक यांचे शेअर्स कोसळले आहेत. सलग दोन दिवस शेअरबाजारामध्ये होत असलेल्या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे.

संबंधित बातम्या 

म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक वाढली; वर्षभरात 24 टक्क्यांची वाढ, ‘ही’ आहेत प्रमुख कारणे

बेरोजगारांना मोठा दिलासा! नव्या वर्षात रोजगार वाढणार; जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ

Income Tax Return Filing : आतापर्यंत 4.43 कोटींपेक्षा अधिक आयकर रिटर्न दाखल

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.