शेअर बाजारात घसरण; चालू आठवड्यात कोट्यावधीचे नुकसान, आयटी क्षेत्रात गुंतवणुकीचा तज्ज्ञांकडून सल्ला

शेअर बाजारातील ( Stock market declines) पडझड कायम असून, आज बाजार सुरू होताच सेन्सेक्स( Sensex) तब्बल 720 अंकांनी कोसळला . त्यानंतर सेन्सेक्समधील घसरण सुरूच आहे. अशा परिस्थितीमध्ये आयटी कंपन्यांचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.

शेअर बाजारात घसरण; चालू आठवड्यात कोट्यावधीचे नुकसान, आयटी क्षेत्रात गुंतवणुकीचा तज्ज्ञांकडून सल्ला
Follow us
| Updated on: Nov 26, 2021 | 1:43 PM

मुंबई : शेअर बाजारातील ( Stock market declines) पडझड कायम असून, आज बाजार सुरू होताच सेन्सेक्स( Sensex) तब्बल 720 अंकांनी कोसळला . त्यानंतर सेन्सेक्समधील घसरण सुरूच आहे, सध्या सेन्सेक्स 1420 अंकांनी कमी झाला असून 58 हजार अंकांपेक्षाही कमी पातळीवर व्यवहार सुरू आहेत. गुरुवारचा अपवाद सोडता या आठवड्यात प्रत्येक दिवशी सेन्सेक्समध्ये घसरण झाल्याचे पहायला मिळाले. तज्ज्ञांच्या मते विदेशी गुंतवणुकदांकडून गुंतवणुक काढून घेतली जात असल्याने, शेअरबाजारावर दबाव असल्याचे पहायला मिळत आहे. पुढील काही दिवस शेअर बाजारामध्ये घसरण सुरूच राहणार असल्याचे संकते मिळत आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर आयटी कंपन्यांच्या शेअरमध्ये पैसा गुंतवल्यास एक चांगला परतावा मिळण्याची संधी आहे.

डॉलर अधिक मजबूत स्थितीमध्ये

कोरोना परिस्थिती आता पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे कोरोना काळात अमेरिकेने आपल्या नागरिकांसाठी जे विविध दिलासा पॅकेज घोषीत केले होते. ते पॅकेज आता अमेरिकेकडून पुन्हा एकदा वापस घेण्यात येत आहेत. त्यामुळे डॉलर इतर चलनाच्या तुलनेमध्ये मजबूत झाला आहे. डॉलर मजबूत झाल्याने इतर चलनाचे मूल्य घटले आहे. त्यामुळे देखील शेअर बाजारावर परिणाम होत आहे. अशा सर्व परिस्थितीमध्ये तज्ज्ञांनी आयटी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला आहे. आयटी कंपन्यांचे शेअर विकत घेतल्यास काही दिवसानंतर एक मजबूत परतावा मिळण्याची शक्यता आहे.

आयटी कंपन्यांचेच शेअर का घ्यावेत?

ज्या कंपन्यांचा व्यापार हा निर्यातीवर आधारीत आहे, जसे की, टेक्सटाईल, लेदर, आयटी, फार्मा, केमिकल या क्षेत्रातील कंपन्या. या कंपन्यांना रुपयाच्या मूल्यात घसरण झाल्यास मोठा फायदा होतो. कारण या सर्व कंपन्या आपले उत्पादन आणि सेवा निर्यात करत असतात. यामध्ये सर्वात मोठा वाटा हा आयटी क्षेत्राचा आहे. या कंपन्यांना मिळणारे बिल हे डॉलरमध्ये असते, त्यामुळे डॉलर मजबूत झाल्यास त्यांना फायदा होतो. दुसरीकडे ज्या कंपन्यांचा व्यापार हा आयातीवर अवलंबून असतो, किंवा उत्पादनासाठी कच्चा माल आयात करावा लागतो, अशा कंपन्यांना रुपयाचे मूल्य घटल्यास मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागतो. यामध्ये आटॉमोबाईल आणि इलेट्रॉनिक सेक्टरचा समावेश आहे. डॉलर जेवढा मजूबत होणार तेवढा अधिक आयटी सेक्टरचा फायदा होतो. त्यामुळे तज्ज्ञांकडून आयटी क्षेत्रात गुंतवणुक करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

शेअरबाजारात भूंकप! सेन्सेक्स 1420 अंकांनी कोसळला, गुंतवणुकदाराना कोट्यावधीचा फटका

महाराष्ट्रातल्या मराठी उद्योगपतीच्या घरातला वाद कसा मिटणार? किर्लोस्करांना सुप्रीम कोर्टानं मार्ग दाखवला

देशी की विदेशी? परदेशी ब्रँडच्या दारूच्या किंमतीत थेट 36 टक्क्यांनी घट, सरकारची कृपा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.