SHARE MARKET UPDATE : घसरणीचं सत्र थांबेना, सेन्सेक्स 383 अंकांनी गडगडला; रशिया-युक्रेन वादाचा परिणाम

आज सेन्सेक्स 383 अंकांच्या घसरणीसह 57,300.68 वर बंद झाला. निफ्टी 114 अंक अंकांच्या घसरणीसह 17092 वर पोहोचला. सेन्सेक्स 30 पैकी 20 शेअर वर घसरण झाली.

SHARE MARKET UPDATE : घसरणीचं सत्र थांबेना, सेन्सेक्स 383 अंकांनी गडगडला; रशिया-युक्रेन वादाचा परिणाम
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 4:52 PM

मुंबई : आंतरराष्ट्रीय घडामोडींचा प्रभाव भारतीय शेअर बाजारावर (SHARE MARKET UPDATE) कायम राहिला. रशिया-युक्रेन वादाचा भारतीय शेअर बाजाराला मोठा फटका बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले घसरणीचे सत्र आज कायम राहिले. दिवसभरात सातत्यपूर्ण कामगिरीच्या अभावामुळे सेन्सेक्स व निफ्टीमध्ये घसरण नोंदविली गेली. सेन्सेक्सवर 400 अंकांची घसरण झाली. तर, निफ्टी 17092 अंकांच्या नजीक बंद झाला. आज निफ्टीवर मेटल इंडेक्स (METAL INDEX) 1 टक्क्यांनी घसरला. पीएसयू बँक, फार्मा आणि रिअल्टी शेयरवर विक्रीचा दबाव कायम राहिला. बँक आणि फायनान्शियल इंडेक्सची निफ्टीवर समाधानकारक कामगिरी राहिली. आज सेन्सेक्स 383 अंकांच्या घसरणीसह 57,300.68 वर बंद झाला. निफ्टी 114 अंक अंकांच्या घसरणीसह 17092 वर पोहोचला. सेन्सेक्स 30 पैकी 20 शेअर वर घसरण झाली.

आजचे वधारणीचे शेअर्स

• एम अँड एम(1.44) •बजाज फिनसर्व्ह(1.11) •आयसर मोटर्स(0.98) •ओएनजीसी (0.95) •हिंदाल्को(0.82)

आजचे घसरणीचे शेअर्स

•बीपीसीएल (-3.65) •टाटा स्टील(-3.65) •टीसीएस(-3.58) •टाटा मोटर्स (-3.28) •एसबीआय लाईफ इन्श्युरन्स (-2.98)

वाद मिटेना, गुंतवणूकदारांना टेन्शन

गेल्या आठवड्याभरात युक्रेन-रशिया वादाचे पडसाद भारतासह आंतरराष्ट्रीय अर्थजगतावर उमटले. रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिलेल्या निवेदनानंतर वातावरणातील तणाव निवळला होता. पश्चिमी देशांसोबत चर्चेची दारं खुली असल्याचं निवेदन केलं होतं. त्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण नोंदविली गेली. सध्या कच्च्या तेलात 2.55 टक्क्यांची घसरण दिसून आली आणि 94.21 डॉलर प्रति बॅरल वर तेलाचे व्यापार सुरू आहेत. मात्र, पुन्हा एकदा वादानं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांवर अनिश्चिततेचं सावट आहे.

चंद्रपूर औष्णिक वीज केंद्रातील वाघ अखेर जेरबंद, वनविभागाने का घेतला हा निर्णय?

नागपूर मनपा प्रभाग रचनेवर सुनावणी; कुठे वस्ती, कुठे सीमारेषा चुकल्या, नावे शोधायची कशी?

नागपूर जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर, कसा येणार आणि जाणार मिनी मंत्रालयाचा पैसा?

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.