Stock Market: बाजारात विक्रमी तेजी सुरूच, सेन्सेक्सने प्रथमच 57000 चा टप्पा केला पार, निफ्टी 17 हजारांच्या जवळ
तर निफ्टी 17,000 च्या पातळीवर पोहोचला. हेवीवेट्स भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, टीसीएस आणि एचडीएफसी देशांतर्गत शेअर बाजारात विक्रमी उच्चांक गाठण्यात यशस्वी झाले.
नवी दिल्लीः शेअर बाजारातील तेजीचा कल मंगळवारीही कायम राहिलाय. बीएसईचा बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी 50 विक्रमी उच्च पातळीवर व्यवहार करीत आहेत. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने प्रथमच 57,000 ची पातळी ओलांडली, तर निफ्टी 17,000 च्या पातळीवर पोहोचला. हेवीवेट्स भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, टीसीएस आणि एचडीएफसी देशांतर्गत शेअर बाजारात विक्रमी उच्चांक गाठण्यात यशस्वी झाले.
एअरटेलचा हिस्सा 2.43 टक्क्यांनी वाढलाय
सेन्सेक्स सध्या 121 अंकांच्या वाढीसह 57,011.21 वर व्यवहार करीत आहे आणि निफ्टी 30.40 अंकांनी वाढून 16,961 च्या पातळीवर आहे. सेन्सेक्समध्ये भारती एअरटेलचा हिस्सा 2.43 टक्क्यांनी वाढलाय. याशिवाय बजाज फायनान्स, एशियन पेंट्स, टीसीएस, टायटन, कोटक महिंद्रा बँक, बजाज फिनसर्व, टाटा स्टीलचे समभाग वधारलेत. दुसरीकडे इंडसइंड बँक, एम अँड एम, रिलायन्स इंडस्ट्रीज, अॅक्सिस बँक, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक आणि एसबीआय कमकुवतपणा दाखवत आहेत.
7 सत्रांमध्ये सेन्सेक्स 1000 अंकांनी वाढला
7 ट्रेडिंग सत्रांमध्ये सेन्सेक्सने 1000 हून अधिक अंकांची वाढ केली. 18 ऑगस्ट 20201 रोजी सेन्सेक्सने 56000 ची पातळी ओलांडली होती. त्याच वेळी 31 ऑगस्ट रोजी त्याने 57000 ची पातळी ओलांडली. यापूर्वी 13 ऑगस्ट रोजी सेन्सेक्सने 55000 ची पातळी ओलांडली होती.
सेन्सेक्सने पहिल्यांदा दिवसाच्या व्यवहारात 50,000 चा आकडा केला पार
बीएसईच्या 30 शेअर सेन्सेक्सने यावर्षी अनेक नवीन उंची गाठल्यात. 21 जानेवारी 2021 रोजी सेन्सेक्सने पहिल्यांदा दिवसाच्या व्यवहारात 50,000 चा आकडा पार केला. पुढच्या महिन्यात 3 फेब्रुवारी रोजी सेन्सेक्स प्रथमच 50,000 च्या वर गेला. 5 फेब्रुवारी रोजी सेन्सेक्सने दिवसभरात 51,000 चा टप्पा पार केला. 8 फेब्रुवारी रोजी सेन्सेक्स प्रथमच 51,000 च्या वर बंद झाला. 15 फेब्रुवारी रोजी सेन्सेक्सने 52,000 चा आकडा पार केला.
व्यवहारादरम्यान प्रथमच 54,000 चा आकडा पार
22 जून रोजी सेन्सेक्सने दिवसाच्या व्यवहारादरम्यान प्रथमच 53,000 चा आकडा पार केला. 7 जुलै रोजी सेन्सेक्स प्रथमच 53,000 च्या वर गेला. 4 ऑगस्ट रोजी सेन्सेक्सने दिवसभराच्या व्यवहारादरम्यान प्रथमच 54,000 चा आकडा पार केला आणि त्यानंतर 13 ऑगस्ट रोजी सेन्सेक्सने प्रथमच 55,000 चा आकडा पार केला. आता 18 ऑगस्ट रोजी सेन्सेक्सने 56000 ची पातळी ओलांडली. सेन्सेक्स 765 अंकांनी उडी मारून नवीन विक्रमी उच्चांकावर बंद झाला.
बीएसई सेन्सेक्स 765 अंकांनी उडी मारून विक्रमी उच्चांकावर बंद
सोमवारी बीएसई सेन्सेक्स 765 अंकांनी उडी मारून विक्रमी उच्चांकावर बंद झाला, तर एनएसई निफ्टी 16,900 च्या वर पोहोचला. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या वाढीमुळे बाजारही मजबूत झाला. व्यवहार करताना सेन्सेक्स एका वेळी 56,958.27 अंकांवर पोहोचला होता. सरतेशेवटी तो 765.04 अंक किंवा 1.36 टक्के वाढीसह 56,889.76 च्या नवीन विक्रमी पातळीवर बंद झाला. त्याचप्रमाणे निफ्टी 225.85 अंकांनी किंवा 1.35 टक्क्यांनी उडी मारून विक्रमी 16,931.05 वर बंद झाला. ट्रेडिंगदरम्यान एका टप्प्यावर तो 16,951.50 पॉईंटच्या उच्चांकावर गेला होता. गेल्या सहा ट्रेडिंग सत्रांपैकी पाचमध्ये निफ्टी विक्रमी उच्चांकावर बंद झाला.
संबंधित बातम्या
रेशन कार्डाच्या नियमांमध्ये मोठा बदल, दुकानात न जाता तुम्हाला तुमच्या हक्काचे धान्य मिळणार
FD वर Axis Bank ची विशेष ऑफर, जबरदस्त फायदा मिळणार
Stock Market: Sensex crosses 57,000 for first time, Nifty closes near 17,000