Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Stocks in news : कोणता शेअर दमदार, कोणत्या कंपनीची कामगिरी चमकदार बीपीसीएल, कोल इंडिया, इन्फोसिस, बाटा इंडियासह इतर स्टॉक्सचा लेखाजोखा

बीपीसीएल, कोल इंडिया, एनएचपीसी, इन्फोसिस, बाटा इंडिया, बिर्लासॉफ्ट, सुझलॉन एनर्जी आणि इतर कंपन्यांच्या स्टॉक्सची सद्यस्थिती काय आहे ते जाणून घेऊयात

Stocks in news : कोणता शेअर दमदार, कोणत्या कंपनीची कामगिरी चमकदार बीपीसीएल, कोल इंडिया, इन्फोसिस, बाटा इंडियासह इतर स्टॉक्सचा लेखाजोखा
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 1:35 PM

मुंबई : एसजीएक्स निफ्टी (SGX Nifty)84 अंकांनी वधारून 16,105 अंकांवर पोहोचल्याने भारतीय बाजार आज तेजीत उघडण्याची शक्यता आहे. बुधवारी, आयटी शेअर्समधील (IT stocks) विक्रीच्या पार्श्वभूमीवर सेन्सेक्सने सलग तिसऱ्या सत्रात घसरण नोंदवली आणि आयटी क्षेत्रात सध्या 300 अंकांची घसरण झाली आहे. सेन्सेक्स 303.35 अंकांनी अथवा 0.56 टक्क्यांनी घसरून 53,749.26 वर बंद झाला आहे. निफ्टी 99.35 अंकांनी अथवा 0.62 टक्क्यांनी घसरून 16,025.80 वर बंद झाला.सेन्सेक्समध्ये एशियन पेंट्स(Asian Paints), टीसीएस(TCS), विप्रो(Wipro), टेक महिंद्रा, लार्सन अँड टुब्रो(Larsen & Toubro), इन्फोसिस, स्टेट बँक ऑफ इंडिया, एचसीएल टेक्नॉलॉजीज (HCL Technologies)आणि एम अँड एम हे शेअर 8.04 टक्क्यांपर्यंत घसरले. एनटीपीसी, भारती एअरटेल, एचडीएफसी, कोटक महिंद्रा बँक, नेस्ले, आयसीआयसीआय बँक आणि आयटीसी हे शेअर 3.84 टक्क्यांपर्यंत वधारले.

  1. BPCL: मार्च 2022 अखेर संपलेल्या तिमाहीत या कंपनीच्या निव्वळ नफ्यात 82 टक्के घट नोंदविण्यात आली असून, खर्चात वाढ होऊनही कंपनीने इंधनाचे दर कायम ठेवले आहेत. जानेवारी ते मार्च या कालावधीत 2,130.53 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला, परंतु पेट्रोल, डिझेल आणि देशांतर्गत एलपीजी विक्रीवरील तोट्यामुळे आर्थिक स्थिती कोलमडली.
  2. Coal India: देशातील कच्चे इंधन उत्खनन संस्थेने 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत आपल्या एकत्रित निव्वळ नफ्यात 45.9 टक्क्यांची वाढ नोंदवत, हा नफा 6,693 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीला वर्षभरापूर्वीच्या काळात 4,587 कोटी रुपयांचा नफा झाला होता.
  3. NHPC: सरकारी मालकीच्या या कंपनीने मार्च 2022 च्या तिमाहीत आपल्या एकत्रित निव्वळ नफ्यात सुमारे सात टक्क्यांनी वाढ नोंदवून तो 515.90 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मार्च 2021 अखेर संपलेल्या तिमाहीत कंपनीला 482.35 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा झाला होता. तिमाहीत एकूण उत्पन्न 2,026.62 कोटी रुपये होते, जे एक वर्षापूर्वी 2,100.12 कोटी रुपये होते.
  4. Max Healthcare Institute: मार्च 2022 अखेर संपलेल्या चौथ्या तिमाहीत कंपनीचा करोत्तर नफा 58 टक्क्यांनी वाढून 172 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीला 2020-21 या आर्थिक वर्षाच्या जानेवारी-मार्च तिमाहीत 109 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. समीक्षाधीन कालावधीत एकूण महसूल 1,298 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो वर्षभरापूर्वीच्या काळात 1,161 कोटी रुपये होता.
  5. IndiGo: कोविडच्या ओमिकॉर्न लाटेचा फटका बसल्याने देशांतर्गत बजेट कॅरियर इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेडेला (IndiGo) 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत 1,681 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ तोटा सहन करावा लागला आहे.
  6. Infosys: आयटी क्षेत्रातील प्रमुख कंपनीशी करारबद्ध झाली आहे. पालो अल्टो नेटवर्क्स (Palo Alto Networks,), एक जागतिक सायबर सुरक्षा कंपनी, मिशन-गंभीर डिजिटल लँडस्केपसह मोठ्या उद्योगांची सुरक्षा-परिपक्वता वाढविण्यासाठी आणि त्यांच्या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांवर सायबर हल्ल्यांचा धोका रोखण्यास मदत करण्यासाठी मोलाची मदत करते.
  7. Bata India:मजबूत विक्रीच्या मदतीने कंपनीने चौथ्या तिमाहीत आपल्या एकत्रित निव्वळ नफ्यात दुपटीने वाढ नोंदवत 62.96 कोटी रुपये नोंदविला आहे. गेल्या तिमाहीत ऑपरेशन्समधून मिळणारा महसूल 12.77% वाढून 665.24 कोटी रुपये झाला आहे.
  8. Birlasoft:कंपनीच्या प्रवर्तकांनी सांगितले की, फर्मच्या प्रस्तावित शेअर बायबॅक ऑफर मध्ये भाग घेण्याचा त्यांचा हेतू नाही. कंपनीने प्रत्येकी 2 रुपयांचे 78,00,000 पर्यंतचे शेअर्स परत खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता.
  9. Suzlon Energy: मार्च तिमाहीत निव्वळ तोटा 205.52 कोटी रुपयांवर आला. समीक्षाधीन तिमाहीतील एकूण उत्पन्न एक वर्षापूर्वी याच कालावधीत 1,141.15 कोटी रुपयांवरून 2,478.73 कोटी रुपयांवर गेले आहे.

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.