मुकेश अंबानींना SC चा धक्का; Amazon-Future करारात मोठा निर्णय
सीएनबीसी टीव्ही 18 च्या अहवालानुसार, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की Emergency Arbitrator निर्णय लागू करण्यायोग्य आहे. Emergency Arbitrator ने फ्युचर रिटेल डीलवर स्थगिती आदेश जारी केला होता.
नवी दिल्लीः मुकेश अंबानींच्या रिलायन्स रिटेल आणि किशोर बियाणी यांच्या फ्युचर ग्रुपमधील 24,713 कोटी रुपयांच्या करारामध्ये (Reliance Future Group Deal) मुकेश अंबानींना मोठा धक्का बसला आहे. या कराराची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात झाली. सर्वोच्च न्यायालयाने अमेझॉनच्या बाजूने निकाल दिला आहे. सीएनबीसी टीव्ही 18 च्या अहवालानुसार, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की Emergency Arbitrator निर्णय लागू करण्यायोग्य आहे. Emergency Arbitrator ने फ्युचर रिटेल डीलवर स्थगिती आदेश जारी केला होता.
फ्युचर रिटेलने आपला संपूर्ण व्यवसाय रिलायन्स रिटेलला विकला होता
रिलायन्स रिटेलसोबत फ्युचर रिटेलचा 3.4 बिलियनचा करार Emergency Arbitrator निर्णयाची अंमलबजावणी करण्यास पात्र आहे, असंही सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात म्हटलेय. Arbitrator या करारावर स्थगिती आदेश जारी केला होता, ज्या अंतर्गत फ्युचर रिटेलने आपला संपूर्ण व्यवसाय रिलायन्स रिटेलला विकला होता. अॅमेझॉनने रिलायन्स आणि फ्युचर कराराला विरोध केला होता आणि त्यावर स्थगितीची विनंती केली होती.
SC rules in favour of Amazon, says Singapore’s Emergency Arbitrator award against FRL-Reliance Retail merger enforceable here
— Press Trust of India (@PTI_News) August 6, 2021
ही बातमी समोर आल्यानंतर रिलायन्सच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. सकाळी 11 वाजता रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर 1.79 टक्के (38.30 रुपये) घसरून 2095.95 रुपयांच्या पातळीवर आला. रिलायन्सच्या घसरणीमुळे बाजारातही घसरण दिसून येत आहे. यावेळी सेन्सेक्स 157 अंकांच्या घसरणीसह 54335 च्या पातळीवर व्यवहार करत होता आणि निफ्टी 22 अंकांनी 16272 च्या पातळीवर घसरला होता. सेन्सेक्समध्ये सध्या रिलायन्सला मोठा तोटा सहन करावा लागतोय.
संबंधित बातम्या
RBI Monetary Policy Updates: RBIकडून सातव्यांदा रेपो रेट जैसे थेच, रिव्हर्स रेपो रेटमध्ये बदल नाही
सरकारचा मोठा निर्णय, रिटर्न न भरणारे 15 ऑगस्टपासून करू शकणार नाहीत हे काम
supreme court pushes Mukesh Ambani; Big decision in Amazon-Future deal