पहले आप! टाटामध्ये आता ‘महिला राज’; टाटाच्या सर्वात मोठ्या फॅक्ट्रीत किती महिलांची भरती होणार माहित्ये?

सध्या टाटाच्या 500 एकरावरील या प्लांटमध्ये तब्बल 10 हजार कर्मचारी काम करतात. यात महिलांची संख्या सर्वाधिक आहे. सप्टेंबरमध्ये या प्लांटमध्ये 5 हजार महिलांना नोकरी देण्यात आली होती.

पहले आप! टाटामध्ये आता 'महिला राज'; टाटाच्या सर्वात मोठ्या फॅक्ट्रीत किती महिलांची भरती होणार माहित्ये?
टाटाच्या सर्वात मोठ्या फॅक्ट्रीत किती महिलांची भरती होणार माहित्ये?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 02, 2022 | 12:32 PM

नवी दिल्ली: महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता लवकरच टाटा फॅक्ट्रीत (Tata Group) महिलांचं राज्य अवतरणार आहे. कारण टाटा ग्रुपने आपल्या फॅक्ट्रीत 45 हजार महिलांची (women workers) भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महिलांना देशातील सर्वात मोठ्या उद्योगात नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. तामिळनाडूच्या (tamilnadu) होसूर जिल्ह्यात टाटाने इलेक्ट्रॉनिक कारखान्यात कर्मचारी संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन वर्षात 45 हजार महिलांची भरती करण्यात येणार आहे.

टाटाची होसूरमध्ये इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्स तयार करण्याची फॅक्ट्री आहे. या फॅक्ट्रीत आयफोनचे पार्ट्स तयार केले जातात. ब्लूमबर्ग रिपोर्टनुसार, कोरोनामुळे चीनमध्ये अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे अॅप्पलचं उत्पादन थांबलं आहे. त्यामुळे भारताने आयफोनच्या उत्पादनावर भर दिला आहे.

हे सुद्धा वाचा

टाटा ग्रुपने अॅप्पलकडून अधिकाधिक ऑर्डर घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे येत्या 18 ते 24 महिन्यात टाटामध्ये 45 हजार नोकऱ्या निर्माण होणार आहेत. विशेष म्हणजे यातील सर्वाधिक नोकर भरती ही महिलांची करण्यात येणार आहे.

दरम्यान, सध्या टाटाच्या 500 एकरावरील या प्लांटमध्ये तब्बल 10 हजार कर्मचारी काम करतात. यात महिलांची संख्या सर्वाधिक आहे. सप्टेंबरमध्ये या प्लांटमध्ये 5 हजार महिलांना नोकरी देण्यात आली होती. रिपोर्टनुसार, या कंपनीत काम करणाऱ्या महिलांना 16000 रुपयाहून अधिक पगार देण्यात येत आहे.

तसेच कर्मचाऱ्यांना फॅक्ट्रीत भोजनाची व्यवस्था असून त्यांच्या निवासाची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे. तसेच या कामगारांना प्रशिक्षण आणि त्यांच्या मुलांना शिक्षण देण्याची तयारीही टाटा ग्रुपने सुरू केली आहे.

'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.