वर्ष 2022 ‘टाटागिरी’चं: उत्पादनात वाढ ते इलेक्ट्रॉनिक गाड्यांना वेटिंग, टाटा मोटर्सचा आत्मविश्वास!

टाटा मोटर्सच्या पोर्टफोलित प्रत्येक मॉडेल समाविष्ट आहे. सध्या सात प्रॉडक्ट आहे आणि प्रत्येक प्रॉडक्टमध्ये वाढीसाठी प्रयत्नशील असल्याचे चंद्रा यांनी म्हटले आहे.

वर्ष 2022 ‘टाटागिरी'चं: उत्पादनात वाढ ते इलेक्ट्रॉनिक गाड्यांना वेटिंग, टाटा मोटर्सचा आत्मविश्वास!
Follow us
| Updated on: Jan 23, 2022 | 7:41 PM

नवी दिल्ली – आघाडीची वाहन निर्मिती कंपनी टाटा मोटर्सने (Tata Motors) नव्या आर्थिक वर्षात कंपनीच्या विकासाची घौडदौड कायम राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी उत्पादन वाढ (Increase Production) आणि पुरवठा साखळीला बळकटी अशा दोन्ही आघाड्यांवर कंपनी कार्यरत असेल. मुंबई स्थित टाटा मोटर्स पंच, नेक्सन आणि हॅरियर सारख्या मॉडेलची विक्री करते. चालू आर्थिक वर्षात ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत कंपनीने डीलरला 99,002 वाहनांचा पुरवठा केला. गेल्या वर्षीच्या समान आर्थिक तिमाहीच्या तुलनेत 44 टक्क्यांनी अधिक होते. डिसेंबर 2021 मध्ये कंपनीची एकूण प्रवासी वाहन (Passenger vehicle) विक्री 50 टक्क्यांच्या वाढीसह 35,299 वर पोहोचली. टाटा मोटर्सचे मुख्य व्यवस्थापक शैलेश चंद्रा यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना टाटाची आगामी रणनीती स्पष्ट केली.

पोर्टफोलिओचा विस्तार:

टाटा मोटर्सच्या पोर्टफोलित प्रत्येक मॉडेल समाविष्ट आहे. सध्या सात प्रॉडक्ट आहे आणि प्रत्येक प्रॉडक्टमध्ये वाढीसाठी प्रयत्नशील असल्याचे चंद्रा यांनी म्हटले आहे. कंपनीकडे अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एकाधिक पर्याय उपलब्ध करण्याचा टाटाचा प्रयत्न आहे. टाटा मोटर्सने एसयूव्ही आणि सीएनजी मॉडेल बाजारात आणले आहेत. तसेच कंपनीकडून इलेक्ट्रॉनिक वाहनांची सीरिज बाजारात आणण्याची मोहीम सुरूच राहणार असल्याचे चंद्रा यांनी स्पष्ट केले.

इलेक्ट्रॉनिक वाहनांना ‘वेटिंग लिस्ट’:

कोरोनानंतर ‘ओमिक्रॉन’ सावटामुळे वाहन उद्योगांसमोर नवे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. वाहनांसाठीचा कच्चा माल वाहतुकीवर बंधने होती. मात्र, पहिल्या दोन लाटांच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत परिस्थितीमध्ये सुधारणा होत असल्याचे चंद्रा यांनी म्हटले आहे. इलेक्ट्रिक वाहनांत कंपनीने संशोधनावर अधिक भर दिला आहे. कंपनीकडे गाड्यांसाठी मागणी नोंदविली जात आहे. टाटा मोटर्सकडे बुकिंगसाठी वैशिष्ट्यपूर्ण यंत्रणा आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहित कंपनीने 1700 वाहने पाठविली. दुसऱ्या तिमाहीत 2,700 वाहन आणि तिसऱ्या तिमाहीत 5,500 वाहन रवाना करण्यात आल्याची माहिती चंद्र यांनी दिली आहे.

वाहनक्षेत्रातील ‘टाटा’गिरी:

टाटा मोटर्स ही भारतातील वाहनक्षेत्रातील आघाडीची कंपनी मानली जाते. गेल्या 15 ते 20 वर्षात टाटा मोटर्सने विविध प्रकारच्या वाहनांत लक्षणीय झेप घेतली आहे. टाटा मोटर्सने जगातील सर्वांत स्वस्त गाडी बनवण्याचा ध्यास घेतला होता. टाटा नॅनो 1 लाख रुपयांत सर्व सामान्यांसाठी चारचाकी गाडी उपलब्ध करण्याचा ध्यास घेतला होता. भारतीय वाहननिर्मितीची आंतराष्ट्रीय स्तरावर कौतुकास्पद दखल घेतली गेली.

संबंधित बातम्या :

धमाकेदार ऑफर! 5.55 लाखांची Renault कार 2.7 लाखात खरेदीची संधी, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

Budget 2022 : शेअर गुंतवणुकदारांना कर दिलासा की बोजा; टॅक्सचा ट्रिपल डोस हटविणार?

नोकरी गमावण्याची चिंता विसरा ; जॉब इन्शुरन्स घ्या आणि निर्धास्त व्हा 

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.