आयकर विभागाकडून ई-मेल आला असेल तर दुर्लक्ष करू नका, होईल मोठं नुकसान

आयकर विभागाने एक ट्वीट करून आम्ही पाठवलेल्या कोणत्याही ई-मेलकडे दुर्लक्ष करू नका असं करदात्यांना सूचित केलं आहे.

आयकर विभागाकडून ई-मेल आला असेल तर दुर्लक्ष करू नका, होईल मोठं नुकसान
10 rules changed from today
Follow us
| Updated on: Nov 19, 2020 | 11:44 AM

नवी दिल्ली : कोरोनाच्या या जीवघेण्या महामारीमध्ये (Coronavirus Crisis) आयकर विभागाने (Income Tax Department) वेळीवेळी करदात्यांना (Taxpayers) ई-मेलद्वारे सूचना केल्या. जेणेकरुन करदात्यांना प्रत्येक महत्त्वाचा मेसेज मिळावा. पण तरीदेखील अनेक करदाते मेले चेक करत नसल्यामुळे त्यांनी पुढे अडचणी येत असल्याचं समोर आलं आहे. यामुळे आयकर विभागाने एक ट्वीट करून आम्ही पाठवलेल्या कोणत्याही ई-मेलकडे दुर्लक्ष करू नका असं करदात्यांना सूचित केलं आहे. (taxpayers if you got income tax department email do not ignore it)

आम्ही पाठवलेले प्रत्येक ई-मेल हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केलं असता तुम्हाला नुकसान होऊ शकतं असं आयकर विभागानं ट्वीटद्वारे म्हटलं आहे. अधिक माहितीनुसार, आयकर विभागाने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 40 लाखांहून अधिक करदात्यांना 1.36 लाख कोटी रुपयांचा परतावा जारी केल्याचं म्हटलं आहे.

1.36 लाख कोटी परतावा जारी केला

यासंबंधी विभागाने एक ट्विट केलं आहे. आयकर विभागाने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 40 लाखांपेक्षा जास्त करदात्यांना 1.36 लाख कोटी रुपयांचा परतावा जारी केला आहे. त्यामध्ये आतापर्यंत 35,750 कोटी रुपयांचा वैयक्तिक आयकर परतावा (IT Refund) दिला आहे. या कालावधीत एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कॉर्पोरेट कर परतावा केला गेल्याचं म्हटलं आहे.

आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) 1 एप्रिल 2020 ते 17 नोव्हेंबर 2020 पर्यंत 40.19 लाख करदात्यांना 1,36,066 कोटींचा परतावा दिला आहे. यामध्ये 38,23,304 प्रकरणांमध्ये 35,750 कोटी रुपयांचा वैयक्तिक आयकर परतावा दिला गेला. इतकंच नाही तर 1,95,518 प्रकरणांमध्ये 1,00,316 कोटी रुपयांचा कॉर्पोरेट कर परतावाही देण्यात आला आहे. (taxpayers if you got income tax department email do not ignore it)

हे आहेत IT विभागाचे अधिकृत आयडी दरम्यान, कोरोनाच्या संकट काळात फसवणूकीचे अनेक प्रकार समोर आले आहेत. यामुळे अनेक लोक ई-मेल मिळाल्यानंतरही त्यावर उत्तर देत नाही आहेत. यासाठी आयकर विभागाकडून काही अधिकृत ई-मेलची यादी जारी करण्यात आली आहे. यामुळे तुम्हाला खरंच आयकर विभागाचा मेल आला आहे की फसवणुकीचा आहे हे शोधणं सोपं जाईल. यासाठी आयकर विभागाने खालीलप्रमाणे अधिकृत ई-मेल आयडीची यादी जाहीर केली आहे.

– @incometax.gov.in – @incometaxindiaefiling.gov.in – @tdscpc.gov.in – @cpc.gov.in – @insight.gov.in – @nsdl.co.in – @utiitsl.com

या ई-मेल आयडीद्वारे जर तुम्हाला मेल आला तरच त्यावर उत्तर द्या असं आयकर विभागानं स्पष्ट केलं आहे. तर हा ई-मेल पाठवणाऱ्या विभागांचे सेंडर आयडी खालीलप्रमाणे दिले आहेत. (taxpayers if you got income tax department email do not ignore it)

– ITDEPT – ITDEFL – TDSCPC – CMCPCI – INSIGT – SBICMP – NSDLTN – NSDLDP – UTIPAN

संबंधित बातम्या – 

Prithviraj Chavan | पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाची नोटीस

SBI मध्ये खातं असेल तर लगेच चेक करा अकाऊंट, बँकेकडून ग्राहकांना ‘Alert’ जारी

(taxpayers if you got income tax department email do not ignore it)

पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.