SmartPhone : टेक्नो कॅमन 18नं लॉन्च केला नवा स्मार्टफोन, 48MP सेल्फी कॅमेऱ्यासह आहेत जबरदस्त फिचर्स

मुंबई : स्मार्टफोन निर्माता कंपनी Tecnoनं आपला नवा Tecno Camon 18 स्मार्टफोन भारतात लॉन्च केलाय. कॅमन 17नंतर कंपनीनं हा लॉन्च केलाय. या वर्षी जुलैमध्ये तो आणला गेला होता. हा स्मार्टफोन 4 GB रॅम आणि 128 GB स्टोरेजसह येतो. यात अतिरिक्त 3 GB व्हर्च्युअल रॅम आहे, यामुळे एकूण रॅम 7 GBपर्यंत वाढवू शकतो. CAMON 18 प्रीमियर […]

SmartPhone : टेक्नो कॅमन 18नं लॉन्च केला नवा स्मार्टफोन, 48MP सेल्फी कॅमेऱ्यासह आहेत जबरदस्त फिचर्स
टेक्नो कॅमन-18
Follow us
| Updated on: Dec 23, 2021 | 6:03 PM

मुंबई : स्मार्टफोन निर्माता कंपनी Tecnoनं आपला नवा Tecno Camon 18 स्मार्टफोन भारतात लॉन्च केलाय. कॅमन 17नंतर कंपनीनं हा लॉन्च केलाय. या वर्षी जुलैमध्ये तो आणला गेला होता. हा स्मार्टफोन 4 GB रॅम आणि 128 GB स्टोरेजसह येतो. यात अतिरिक्त 3 GB व्हर्च्युअल रॅम आहे, यामुळे एकूण रॅम 7 GBपर्यंत वाढवू शकतो. CAMON 18 प्रीमियर उत्कृष्ट व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी नव्या गिम्बल कॅमेरा तंत्रज्ञानासह येतो.

32 तासाचा स्टँडबाय टाइम Camon 18 मोठ्या आणि चांगल्या व्हिज्युअल अनुभवासाठी डॉट-इन-डिस्प्लेसह 90.52% स्क्रीन-टू-बॉडी रेशोसह 6.8-इंच FHD+ डिस्प्ले आहे. हा हायपर इंजिन गेमिंग ऑप्टिमायझेशनसह Mediatek Helio G85 प्रोसेसरचालतो. यामुळे एक इमर्सिव गेमिंगचा फिल येतो. Camon 18मध्ये 18W टाइप C फ्लॅश चार्जरसह पॉवरफुल 5000mAh बॅटरी आहे. 32 दिवसांचा स्टँडबाय वेळ, 37 तास कॉलिंग वेळ, 24 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक आणि 163 तासांचा म्युझिक प्लेबॅक देतो, असा कंपनीचा दावा आहे.

Camon 18 स्मार्टफोनमध्ये आणखी काय खास? Camon 18मध्ये F1.79 अपर्चरसह 48-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि अल्ट्रा-क्लियर शॉट्ससाठी PDAF तंत्रज्ञान, 2-मेगापिक्सेल डेप्थ लेन्स आणि प्रत्येक पिक्सेलमध्ये हाय रिझोल्यूशन फोटोंसह पिक्सेल क्लिअर येणारी AI लेन्स समाविष्ट आहे. याशिवाय, यात ड्युअल-अ‍ॅडजस्टेबल ब्राइटनेससह 48-मेगापिक्सेलचा फ्रंट टिनी डॉट-इन स्टाइल कॅमेराही येतो.

ग्राहकांच्या चांगल्या अनुभवासाठी ट्रान्सियन इंडियाचे सीईओ अरिजित तलपात्रा म्हणाले, की आम्ही नेहमी अशी उत्पादनं आणि तंत्रज्ञान शोधतो, जे आमच्या ग्राहकांना चांगला अनुभव देऊ शकतील. आमचा नवा स्मार्टफोन सध्याची धावपळीची लाइफस्टाइल तसंच गेल्या वर्षभरातल्या डिजीटल बदलानुरूप उपलब्ध केलाय. सुरक्षिततेसाठी, Camon 18ला साइड-फेसिंग फिंगरप्रिंट स्कॅनर मिळतो. हा डिव्हाइस Android 11 OSवर चालते. HiOS 8.0शी तो कनेक्ट केलाय.

ऑडिओही सुपर… Tecno Camon 18 कोर ऑडिओ सुधारण्यासाठी DTS साउंडसारख्या उत्कृष्ट ऑडिओ वैशिष्ट्यांसह तो येतो आणि उच्च रिझोल्यूशन ऑडिओला सपोर्ट करतो. अॅडजस्टेबल म्युझिकसाठी SOPLAY 2.0 अॅप आहे. जे व्हॉइस रेकॉर्डिंग आणि लिरिक्स लिहिण्यास सपोर्ट करतं.

अलिकडेच लॉन्च केला बजेट स्मार्टफोन Tecnoनं अलीकडेच भारतात आपला बजेट स्मार्टफोन Tecno Spark 8T लॉन्च केला. बजेट स्मार्टफोनच्या 4GB+ 64GB व्हेरिएंटची किंमत 8, 999 रुपये आहे. यात 6.5 इंचाचा LCD डिस्प्ले, Helio G35 SoC, 4GB RAM आणि 64GB ऑनबोर्ड स्टोरेज आहे.

Air Purifier : फिलिप्सनं सादर केला 3 इन 1 प्युरिफायर, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Hyundai Venue : ह्युंदाईनं मागच्या 31 महिन्यात विकल्या 2.5 लाख वेन्यू! काय आहेत कारची वैशिष्ट्ये?

ITR साठी अवघे 9 दिवस; टॅक्स स्लॅब ते नवीन अपडेट, जाणून घ्या एका क्लिकवर

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.