Toyota India : टाटा नॅनोपेक्षाही छोटी आहे टोयोटाची ‘ही’ इलेक्ट्रिक कार; काय आहे खास, वाचा…
टोयोटा(Toyota)नं एक नवीन इलेक्ट्रिक कार (Electric Car) लॉन्च केलीय. या कारला "C+pod" असं नाव देण्यात आलंय. ही एक अल्ट्रा-कॉम्पॅक्ट बॅटरी इलेक्ट्रिक व्हेइकल (BEV) आहे. कार खूपच लहान आहे.
मुंबई : टोयोटा(Toyota)नं एक नवीन इलेक्ट्रिक कार (Electric Car) लॉन्च केलीय. या कारला “C+pod” असं नाव देण्यात आलंय. ही एक अल्ट्रा-कॉम्पॅक्ट बॅटरी इलेक्ट्रिक व्हेइकल (BEV) आहे. कार खूपच लहान आहे. त्यामुळे जी सहजरित्या फिरवणं आणि ती इनडोअर सेटिंग्जमध्ये चार्जिंग स्टेशनवर नेणंदेखील सोपं होईल.
युझरफ्रेंडली कार कंपनी जागतिक बाजारपेठेत त्यांचं वाहन वापरणाऱ्या ग्राहकांसाठी नवीन वाहनाची जाहिरात करण्याची योजना आखत आहे. नवीन C+pod ही दोन आसनी कार इको-फ्रेंडली आहे. याचं डिझाइन वेग आणि कार्यक्षमता समोर ठेवून करण्यात आलं आहे. दैनंदिन गरजेनुसार कमी अंतर कव्हर करण्याव्यतिरिक्त, कामासाठी याचा वापर करणाऱ्यांनादेखील ही कार युझरफ्रेंडली आहे.
सी+पॉड इंजिन आणि श्रेणी पॉवर आणि इतर गोष्टींबद्दल बोलायचं, तर इलेक्ट्रिक कार खूप चांगली आहे. ही 150 किमीच्या ड्रायव्हिंग रेंजसह येते आणि इंजिन 9.06 kWh लिथियम-आयन बॅटरीचं आहे. पॉडसारखी कार जास्तीत जास्त 60 किमी प्रतितास वेग मिळवू शकते.
कार टाटा नॅनोपेक्षा खूपच लहान कारची लांबी फक्त 2,490 मिमी आहे, जी नेहमीच्या एसयूव्हीच्या जवळपास निम्मी आहे. रुंदी 1,290 मिमी आणि 1,550 मिमी उंच आहे. महिंद्राची बंद झालेली मिनी इलेक्ट्रिक कार e2o NXTची एकूण लांबी 3,280mm होती. परवडणाऱ्या श्रेणीच्या दृष्टीनं लोकप्रिय असलेल्या टाटा नॅनोची, जी आता बंद करण्यात आलीय, तिची लांबी 3,164 मिमी होती, जी टोयोटाच्या C+ पॉडपेक्षा खूपच मोठी होती. C+Pod लाँच करण्याचं उद्दिष्ट टोयोटा ग्रीन चार्ज, चुबू इलेक्ट्रिक पॉवरसह विकसित केलेल्या एकत्रित प्रकल्पाला चालना देण्यासाठी आहे. भागीदारी अंतर्गत, कंपन्या चांगल्या चार्जिंग सुविधा निर्माण करण्यासाठी कार्बनडाय ऑक्साइडमुक्त उर्जेसारख्या पद्धतींचा अवलंब करतील.