Boycott Amazon: ट्विटरवर झाले ट्रेंड, हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप

या प्रकरणी ॲमेझॉनसह बंगळुरू येथील आणखी एका कंपनीविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कंपनीसुद्धा आपल्या वेबसाइटच्या माध्यमातून या चित्रांची विक्री करत होती.

Boycott Amazon:  ट्विटरवर झाले ट्रेंड, हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप
AmazonImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 3:13 PM

ट्विटरवर पुन्हा एकदा बॉयकॉटची मोहीम सुरू झाली आहे. मात्र आता ही मोहीम एखाद्या चित्रपटाविरोधात किंवा कलाकारविरोधात नसून सध्या निशाण्यावर आहे, ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉन (Amazon). जन्माष्टमीच्या दिवशी राधा-कृष्णाची आक्षेपार्ह चित्रे (Painting) आपल्या प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचा आरोप ॲमेझॉनवर लावण्यात आला आहे. या प्रकरणी हिंदू संघटनांनी ॲमेझॉन विरोधात पोलिसात तक्रार (Complaint filed against amazon) दाखल केली आहे. हिंदू जनजागृती समितीने दिलेल्या माहितीनुसार, ॲमेझॉन तसचे एक्झॉटिक इंडिया (Exotic India website) या आणखी एका कंपनीच्या वेबसाईवर राधा-कृष्णाच्या त्या चित्राची विक्री होत आहे. त्यामुळे ॲमेझॉन सह त्या कंपनीविरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे. समितीच्या सांगण्यानुसार, वाढता विरोध पाहून ॲमेझॉनने त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून विक्रीसाठी उपलब्ध असलेले ते चित्र हटवले आहे.

ट्विटरवर वाढला ॲमेझॉन चा विरोध

राधा-कृष्णाच्या चित्राबाबत ही बातमी समोर आल्यानंतर आता सोशल मीडियावर ॲमेझॉन या ई-कॉमर्स कंपनीला जोरदार विरोध होत असून बॉयकॉट ॲमेझॉन हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आहे. हिंदू जागृती संघटनेने सोशल मीडियावर माहिती दिली आहे की, ॲमेझॉन आणि एक्झॉटिक इंडिया या दोन्हींच्या प्लॅटफॉर्मवरून सध्या हे चित्र हटवण्यात आले आहे. हे चित्र जन्माष्टमी सेल या नावाने वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध होते. या प्रकरणाचा वाद वाढल्यानंतर आता सोशल मीडियावर लोक ॲमेझॉनच्या पूर्वीच्या वादांबद्दलही बोलताना दिसत आहेत. आपल्या प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या उत्पादनांवरून ॲमेझॉन कंपनी यापूर्वीही अनेक वेळा वादात सापडली होती. मात्र हिंदू संघटनांच्या म्हणण्यानुसार, हे विवादीत चित्र फक्त प्लॅटफॉर्मवरून काढून टाकणेच पुरेसे नाही. तर दोन्ही कंपन्यांनी त्याबद्दल समोर यऊन माफीही मागितली पाहिजे, अशी मागणीही करण्यात येत आहे.

यापूर्वीही वादात सापडली होती ॲमेझॉन कंपनी

ॲमेझॉन वर यापूर्वीही अनेक वेळा धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप लावण्यात आला होता. 2019 सालीही कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ॲमेझॉनच्या अमेरिकेतील वेबसाईटवर रग आणि टॉयलेट कव्हर्सवर देवी-देवतांचे फोटो छापून, ते विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे प्रकरण तेव्हा घडले होते. सध्य ज्या राधाा-कृष्णाच्या पेंटिंगवरून वाद सुरू आहे, आणि दुसऱ्या कंपनीविरोधात लोकांच्या मनात राग आहे, ती कंपनी बंगळुरू येथील आहे. ही कंपनी ॲमेझॉनवर विक्रीसाठी पेंटिग्ज सादर करते. ट्विटरवर या कंपनीविरोधातही अनेक ट्विट्स केली जात आहेत.

हे सुद्धा वाचा

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.