Royal Enfield | दोन लाख रुपयांची रॉयल एनफील्ड केवळ 80 हजार रुपयांमध्ये… काय आहे डील?

रॉयल एनफील्डच्या सर्वाधित विक्री होणार्या मॉडेल्समध्ये क्लासिक 350 नाव अग्रभागी येते. यावरुनच ग्राहकांमधील याची लोकप्रियता दिसून येते. ही बाइक आपल्या रेट्रो-स्टाइल आणि मॉडर्न टचसाठी अतिशय प्रसिध्द आहे. नवीन क्लासिक 350 ची मार्केटमधील ऑन रोड किंमत जवळपास 2.10 लाख रुपये इतकी आहे.

Royal Enfield | दोन लाख रुपयांची रॉयल एनफील्ड केवळ 80 हजार रुपयांमध्ये... काय आहे डील?
Royal Enfield, Classic 350
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 1:33 PM

रॉयल एनफील्ड (Royal Enfield) क्लासिक 350 कंपनीची सर्वाधिक लोकप्रिय व मागणी असलेली बाइक आहे. दुचाकी प्रेमींमध्ये क्लासिक 350 ची क्रेझ अद्यापही कायम आहे. रॉयल एनफील्डच्या सर्वाधित विक्री (sale) होणार्या दुचाकीमध्ये या मॉडेलचे नाव अग्रभागी येते. यावरुनच ग्राहकांमधील याची लोकप्रियता दिसून येते. ही बाइक आपल्या रेट्रो-स्टाइल आणि मॉडर्न टचसाठी अतिशय प्रसिध्द आहे. नवीन क्लासिक 350 ची (Classic 350) मार्केटमधील ऑन रोड किंमत जवळपास 2.10 लाख रुपये इतकी आहे. जर तुम्ही देखील क्लासिक 350 खरेदी करण्याच्या विचारात असाल तर या लेखातून आम्ही एका खास डीलबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत. या डीलच्या माध्यमातून तुम्ही तब्बल 1.27 लाख रुपयांची बचत करु शकणार आहात. सेकड हँड क्लासिक 350 बजेटमध्ये उपलब्ध आहे.

83 हजारांत मिळवा क्लासिक 350

क्लासिक 350 चे सेकंड हँड मॉडेल ड्रूम वेबसाइटवर लिस्टेड आहे. रॉयल एनफील्डची ही दुचाकी 2014 चे मॉडेल आहे. युजर्स या बाइकला वेबसाइटवर देण्यात आलेल्या 83000 रुपयांच्या किमतीमध्ये खरेदी करु शकतात. ही बाइक 34 हजार किमी चालली आहे. वेबसाइटवर लिस्टेड क्लासिक 350 एक सेकंड ऑनर बाइक आहे. क्लासिक 350 गौतमबुध्द नगर, उत्तर प्रदेश आरटीओमध्ये रजिस्टर्ड झालेली आहे.

काय आहेत स्पेसिफिकेशन्स

या बाइकमध्ये ग्राहकांना 346 सीसीचे पॉवर इंजिन मिळणार आहे. याचे इंजिन 19.80 Bhp आणि 28Nm टार्क जनरेट करेल. ड्रूम वेबसाइटनुसार, क्लासिक 350 चे 2014 चे मॉडेल 35 kmpl चा मायलेज देईल. युजर्सला यात 19 इंच के व्हील मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा

क्लासिक 350 चे फीचर्स

वेबसाइटवर क्लासिक 350 च्या सेकेंड हँड मॉडेलला 4.8 फूल सर्किल ट्रस्ट स्कोर मिळाला आहे. युसर्जला यात 13 लीटर क्षमता असलेली इंधनाची टाकी मिळणार आहे. बाइकच्या फ्रंटमध्ये डिस्क ब्रेक देण्यात आलेले आहेत. रियरमध्ये ड्रम ब्रेकचा वापर करण्यात आलेला आहे. ही बाइक 5 स्पीड गिअरबाक्ससह उपलब्ध आहे. क्लासिक 350 बाइक गाजियाबाद, उत्तर प्रदेशमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

काळजीपूर्वक खरेदी करावी

सेकंड हँड बाइक खरेदी तसेच विक्रीसाठी इंटरनेटवर अनेक वेबसाइट उपलब्ध आहे. परंतु ग्राहकांनी सेकंड हँड बाइकची खरेदी करताना काळजी घेणे आवश्‍यक आहे. लिस्टेड बाइकचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सचा व्यतिरिक्त ग्राहकांनी बाइकचे कागदपत्रे, चलन, अपघात माहिती, आदी विविध माहितींची पडताळणी करणे आवश्‍यक आहे. या लेखात देण्यात आलेली माहिती ड्रूम वेबसाइटच्या माहितीवर आधारीत आहे.

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.