ब्रिटेनमधील व्यक्ती एलन मस्कला मागे टाकत बनला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! अवघ्या 7 मिनिटात पलटवला डाव

एका यूट्यूबर ने दावा केला आहे की,तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे. त्याने असे सुद्धा सांगितले आहे कि, त्याची कमाई ही टेस्लाचे फाउंडर एलन मस्कच्या कमाई तुलनेत जास्त होती परंतु सारे कागदोपत्री फक्त हे अवघ्या सात मिनिटे करीता घडले होते.

ब्रिटेनमधील व्यक्ती एलन मस्कला मागे टाकत बनला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! अवघ्या 7 मिनिटात पलटवला डाव
सर्वात श्रीमंत असल्याचा दावा करणाऱ्या तरुणानं नेमकं काय म्हटलं?
Follow us
| Updated on: Feb 19, 2022 | 7:47 PM

एका यूट्यूबर (Youtuber) ने असा दावा केला आहे की, तो जगातील सर्वात श्रीमंत (World Richest Person) व्यक्ती झाला होता. त्याने असे सुद्धा सांगितले आहे कि ,त्याची कमाई ही टेस्लाचे फाउंडर एलन मस्कच्या (Elon Musk) कमाई तुलनेत जास्त होती परंतु हे सारे कागदोपत्री फक्त हे अवघ्या सात मिनिटे करीता घडले होते. या युटुबर चे नाव Max Fosh आहे आणि याला युट्युब वर 6 लाखापेक्षा जास्त लोक याला फॉलो करतात. फॉशने या घटनेबद्दल सविस्तर एक व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे. त्याने या व्हिडिओला आपल्या चॅनेलवर अपलोड केलं आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये यूट्यूबरने लिहिलंय की, कम एट मी एलन… मॅक्स फॉशने मार्केट कॅपिटलाइजेशन मधील एका कमतरतेचा फायदा घेतला आणि त्याला कळून आले की, लवकरच आता आपल्याला आपली कंपनी बंद करावी लागेल कारण की त्याच्यावर ब्रिटनमधील एका कंपनीला फसवल्याबद्दलचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणामध्ये तो सर्वस्वी जबाबदार आहे, असे सुद्धा त्याला सांगण्यात आले होते.

अशी बनवली कंपनी

वीडियो मध्ये फॉशने सांगितले आहे की, त्याने या कंपनीची स्थापना कशी केली. त्याने व्हिडीओ मध्ये सांगितले की, ब्रिटनमध्ये एखादी कंपनी स्थापन करणे खूपच सोपे असते. त्याने असे देखील म्हटले आहे की, कंपनी ही एका घरासारखी असते त्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागतो. त्याच्या साडे आठ मिनिटाच्या व्हिडिओमध्ये त्याने कशा प्रकारे कंपनी स्थापन केली याबद्दल सविस्तर माहिती सांगितली. या व्हिडिओची सुरुवात त्याने आपल्या कंपनीच्या नावावरून केली त्याच्या कंपनीचे नाव आहे अनलिमिटेड मनी. ही कंपनी भविष्यात कोणते काम करणार आहे याबद्दल सुद्धा त्याने ठरवले होते.

त्याने सांगितले की कंपनीला मॅकरोनी, couscous आणि farinaceous प्रोडक्ट्स च्या मॅन्युफॅक्चरिंग साठी तयार करण्यात आले होते. त्याने व्हिडिओ मध्ये हे सांगितले नाही की, farinaceous म्हणजे नेमके काय असते व त्याचा अर्थ काय असतो.

अशाप्रकारे बनला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

फॉश ने रजिस्ट्रेशनची प्रक्रिया खूप स्मार्टपणे हाताळली.रजिस्टर करतेवेळी फॉर्म मध्ये एक प्रश्न विचारला गेला होता. तो प्रश्न असा होता की, ही कंपनी भविष्यात नेमके काय काम करेल? तेव्हा या प्रश्नाचे उत्तर फॉशने पुढील प्रमाणे दिले होते.

त्यानं म्हटलं की, ही कंपनी भविष्यात पैसे बनवेल. जेव्हा कंपनीच्या शेअर गुंतवणूक बद्दल चर्चा केली जात होती तेव्हा या युट्युबर ने 10 बिलियनवर कंपनीत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी व्हिडिओमध्ये असेही म्हटले की, 10 बिलियन शेअर घेऊन तो कंपनी बनवतो अन् कंपनीचे रजिस्ट्रेशन करतो असे केल्यानंतर भविष्यात या कंपनी मधील एक शेअर जर 50 पाउंड प्रमाणे त्याने विकले तर कायदेशीररित्या त्याच्या कंपनीची व्हॅल्यू 500 बिलीयन पाउंड एवढी होईल. याचाच अर्थ असा की ,असे केल्याने तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनेल. त्याने आपल्या व्हिडिओत असे सुद्धा म्हटले की ,या सोबतच जर त्याने असे केले तर तो त्याचा जवळचा स्पर्धक म्हणजेच एलन मस्कला ही मागे टाकू शकतो.

संबंधित बातम्या :

सेशेल्स ट्रीपची प्लॅनिंग करतोय, येता का?; साधूकडून चित्रा रामकृष्ण यांना आणखी एक मेल; सेबीकडून चैकशी सुरू

या मेगा IPO मध्ये 1 कोटी किरकोळ गुंतवणूकदार सहभागी होण्याची शक्यता, 25 हजार कोटी जमा होण्याचा अंदाज!

अत्यंत महत्वाची माहिती…गुंतवणूक करण्याच्या अगोदर जाणून घ्या व्याज उत्पन्नावर कर कसा लागू होतो!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.