Gold Hallmarking: हॉलमार्किंग बंधनकारक; आता सोन्याच्या जुन्या दागिन्यांचं काय होणार?

Gold Hallmarking | सध्याच्या घडीला देशातील 40 टक्के सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क असतो. देशातील एकूण हॉलमार्किंग केंद्रांची संख्या बघता वर्षभरात 14 कोटी दागिन्यांचे हॉलमार्किंग शक्य आहे. भारतात अंदाजे 4 लाख ज्वेलर्स आहेत. यापैकी केवळ 35,879 आस्थापने BIS सर्टिफाइड आहेत.

Gold Hallmarking: हॉलमार्किंग बंधनकारक; आता सोन्याच्या जुन्या दागिन्यांचं काय होणार?
सोने हॉलमार्किंग
Follow us
| Updated on: Jun 16, 2021 | 7:19 AM

मुंबई: केंद्र सरकारच्या आदेशानुसार 15 जूनपासून देशभरात सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग सक्तीच्या नियमाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्यामुळे आता आपल्या जुन्या दागिन्यांना (Gold) किंमत उरणार नाही का, या भीतीने अनेकजण धास्तावले आहेत. मात्र, या नियमामुळे लोकांनी फार घाबरुन जाण्याचे कारण नाही. कारण केंद्र सरकारने सोन्याच्या जुन्या दागिन्यांच्या हॉलमार्किंगचीही सोय उपलब्ध करुन दिली आहे. (Gold Hallmarking know all details)

गेल्या पाच वर्षांमध्ये देशातील हॉलमार्किंग केंद्रांची संख्या 25 टक्क्यांनी वाढल्याचा सरकारचा दावा आहे. सध्याच्या घडीला देशातील 40 टक्के सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क असतो. देशातील एकूण हॉलमार्किंग केंद्रांची संख्या बघता वर्षभरात 14 कोटी दागिन्यांचे हॉलमार्किंग शक्य आहे. भारतात अंदाजे 4 लाख ज्वेलर्स आहेत. यापैकी केवळ 35,879 आस्थापने BIS सर्टिफाइड आहेत.

हॉलमार्किंगचा नियम लागू झाल्यानंतर तुमच्याकडे असलेल्या जुन्या दागिन्यांचे तुम्ही हॉलमार्किंग करू शकता. तुम्ही कोणत्याही हॉलमार्किंग सेंटरवर दागिन्यांचे हॉलमार्क करता येईल. पण जुन्या दागिन्यांच्या हॉलमार्किंगसाठी थोडे अधिक पैसे खर्च करावे लागतील. तसेच हॉलमार्किंग नसणारे दागिने विकल्यास तुम्हाला कमी पैसे मिळतील.

हॉलमार्किंग म्हणजे नेमकं काय?

सोने, चांदी आणि प्लॅटिनमच्या शुद्धतेचे प्रमाणिकरण करण्याचे एक साधन म्हणजे हॉलमार्किंग. एखाद्या धातूची विश्वासार्हता प्रदान करण्याचे माध्यम म्हणजे हॉलमार्किंग असे म्हटलं जाते. हॉलमार्किंगची संपूर्ण प्रक्रिया देशभरातील हॉलमार्किंग केंद्रांवर केली जाते. त्याचे निरीक्षण भारतीय मानक ब्युरो (BIS) द्वारे केले जाते. जर दागिन्यांवर हॉलमार्क असेल तर ते शुद्ध आहे, असे प्रमाणित केले जाते.

BIS चा हॉलमार्क हा सोन्यासह चांदीच्या शुद्धतेचे प्रमाणिकरण दर्शवतो. कोणत्याही दागिन्यांवर BIS चिन्ह असणे म्हणजे ते भारतीय मानक ब्यूरोच्या मानदंडांवर योग्य असल्याचे समजले जाते. त्यामुळे सोने खरेदी करण्यापूर्वी, दागिन्यांवर BIS चा हॉलमार्क आहे की नाही, याची खात्री करा. जर त्यावर हा हॉलमार्क असेल तर ते सोनं शुद्ध आहे. मात्र अनेकदा काही ज्वेलर्स तपास न करता हॉलमार्किंग करतात. त्यामुळे तो हॉलमार्क खरा आहे की नाही याची तपासणी करणे आवश्यक आहे.

भारतीय मानक ब्युरो (BIS) मूळ हॉलमार्क हे त्रिकोणी आकाराचे आहे. त्यावर हॉलमार्किंग सेंटरच्या लोगोसह सोन्याची शुद्धताही लिहिलेली असते. तसेच त्या दागिन्यांच्या उत्पादनाचे वर्ष आणि निर्मात्याचा लोगो देखील त्यावर असतो.

संबंधित बातम्या:

Gold Price: सोन्याची चमक फिकी पडली, उच्चांकी स्तरापेक्षा 8000 रुपयांनी स्वस्त

शेअर बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांनी सोन्याकडे फिरवली पाठ, Gold ETF मधील गुंतवणूकही झाली कमी!

Gold Hallmarking: सोने हॉलमार्किंगचा नवा नियम लांबणीवर पडणार? वाचा नेमकं कारण

(Gold Hallmarking know all details)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.