ग्राहकांकडे दोन लाखांपेक्षाही कमी सोने खरेदीवर ओळखपत्राची मागणी, कारण काय?

तुम्ही दोन लाख रुपये किंवा त्याहून अधिक किंमतीची सोन्याची खरेदी केली तर केवायसी अनिवार्य असणार आहे.

ग्राहकांकडे दोन लाखांपेक्षाही कमी सोने खरेदीवर ओळखपत्राची मागणी, कारण काय?
Follow us
| Updated on: Jan 06, 2021 | 5:01 PM

नवी दिल्ली : सोनं सोडलं तर सर्वच मालमत्ता व्यवहारासाठी KYC करणं अनिवार्य आहे. पण आता सोन्याच्या व्यवहारासाठीही हा नियम लागू होणार आहे. जर तुम्ही दोन लाख रुपये किंवा त्याहून अधिक किंमतीची सोन्याची खरेदी केली तर केवायसी अनिवार्य असणार आहे. स्टॉक्स, म्युच्युअल फंड आणि रिअल इस्टेट यासारख्या मालमत्ता वर्गात सोन्याला मोडण्यासाठी सरकारने हा नियम लागू केला आहे. (Why jewellers asking for kyc even for gold purchases below rs 2 lakh know here)

सरकारची योजना

एसेट क्लासमध्ये (Asset Class) सोन्याला आणखी बरकत देण्यासाठी सरकारने ही एक व्यापक गोल्ड पॉलिसी (Comprehensive gold policy) तयार केली आहे. म्हणजेची ही एक अघोषित संपत्ती नाही राहणार तर ती एक गुंतवणूक आणि लग्जरी होल्डिंग असणार आहे. भारतामध्ये दरवर्षी 800 ते 850 टन सोन्याचा व्यापर होतो. त्यामुळे याचा गुंवणूकदारांनाही फायदा होणार आहे.

सोने खरेदीसाठी ज्वेलर्स मागणार KYC

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमएलए अंतर्गत रत्नं आणि दागिने विक्रेते ज्वेलर्स फायनांशिअल इंटेलिजेंस यूनिटची रिपोर्टिंग संस्था बनली आहे. पीएमएलएमध्ये 28 डिसेंबर रोजी सोन्याचा व्यापार आणण्यात आला. यामुळे आता ज्वेलर्सना सर्व संशयास्पद व्यवहारांची माहिती सरकारला द्यावी लागणार आहे. यासाठी KYC करणं महत्त्वाचं आहे.

औद्योगित क्षेत्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अनेक लोक पकडले जाऊ नये यासाठी नातेवाईकांच्या नावे 2 लाख रुपयांपेक्षा कमी सोनं खरेगी करतात. पण आता सरकारी नियम कठोर झाले आहेत. त्यामुळे अशा अव्यवहाराबद्दल काहीही माहिती उघड झाली आणि आपण त्यात अडकलो तर त्याने मोठं नुकसान होईल अशी भीती सराफा बाजारात आहे.

ग्राहक नाही देत खासगी माहिती

मुंबईतील सोन्याच्या व्यापाराचे मुख्य केंद्र झवेरी बाजार आहे. इथं काम करणाऱ्या मेहता यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्वेलर्सनी सरकारी नियमानुसार, ग्राहकांकडून KYC ची मागणी करण्यास सुरवात केली आहे. पण ग्राहक KYC साठी आपली खासगी माहिती देण्यासाठी तयार नसल्यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे.

खरंतर, आता सोने, चांदी, हिरे, प्लॅटिनम आणि मौल्यवान रत्नांची खरेदी रोख पैसे देऊन करायची असल्यास तुम्हाला आधारकार्ड आणि पॅनकार्ड दाखवणे बंधनकारक राहील. अन्यथा देशातील कोणत्याही ज्वेलर्समध्ये तुम्हाला सोने खरेदी करता येणार नाही. एवढेच नव्हे तर आगामी काळात सोने-चांदीच्या दागिने खरेदीसाठी आर्थिक व्यवहारांप्रमाणे KYC सादर करावे लागण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने 28 डिसेंबरला सोन्याच्या व्यापाराला PMLA (Prevention of Money Laundering Act) कायद्याच्या अखत्यारित आणल्याची अधिसूचना जारी केली होती. त्यामुळे आता ईडीला कोणत्याही कागदपत्रांशिवाय सोन्याच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांची तपासणी करण्याचे अधिकार मिळाले आहेत.

या आदेशानुसार आता पेढी आणि सोने व्यापाऱ्यांना 10 लाखापेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारांचे तपशील ठेवणे बंधनकारक असेल. या नियमांचे उल्लंघन केल्यास तीन ते सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

रोखीच्या व्यवहारांसाठी KYC ची मागणी

केंद्र सरकारच्या निर्णयानंतर आता सोने व्यापारी अगदी 2 लाखांपर्यंतच्या रोखीच्या व्यवहारांसाठीही KYC ची मागणी करु लागले आहेत. तसेच दोन लाखांपेक्षा कमी रकमेच्या व्यवहारासाठी ग्राहकांकडून पॅनकार्ड मागितले जात आहे. जेणेकरून आपल्याला भविष्यात ईडीच्या कारवाईला सामोरे जावे लागणार नाही, याची काळजी सराफा व्यापारी घेत आहेत. (Why jewellers asking for kyc even for gold purchases below rs 2 lakh know here)

संबंधित बातम्या:

सोनं खरेदीसाठी जाताय तर लक्षात असूद्या ‘या’ 3 गोष्टी, नाहीतर होईल नुकसान

सोन्याचं नेमकं काय होणार? वाढत जाणार की कमी होणार?

…म्हणून आताच करा सोनं खरेदी, दिवाळीपर्यंत बसेल खिशाला कात्री

(Why jewellers asking for kyc even for gold purchases below rs 2 lakh know here)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.