एंटीलियामध्ये मुकेश अंबानी कुटुंब 27 व्या मजल्यावरच का राहतात?
mukesh ambani residence antilia mumbai: एंटीलियामध्ये कामासाठी एकूण 600 कर्मचारी आहेत. त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. एटीलियामध्ये हेलीकॉप्टर उतवण्यासाठी 3 हेलीपॅडची निर्मिती केली गेली आहे. 2008 मध्ये एंटीलियाच्या बांधकामास सुरुवात झाली होती. केवळ दोन वर्षांत म्हणजे 2010 मध्ये हे घर बांधून तयार झाले.
रिलायन्स उद्योग समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे मुंबईत एंटीलिया हे लग्झरी घर आहे. सुमारे 15,000 कोटी रुपये या घराची किंमत आहे. मुकेश अंबानी आणि त्यांचा संपूर्ण परिवार या ठिकाणी राहतो. एकूण 27 मजले असणाऱ्या या इमारतीत मुकेश अंबानी 27 व्या मजल्यावर राहतात. मुकेश अंबानी, नीता अंबानी, त्यांची दोन्ही मुले आकाश, अनंत दोन्ही सूना श्लोका मेहता आणि राधिका मर्चंट या सर्व सदस्यांनी राहण्यासाठी 27 वा मजलाच निवडला आहे.
नैसर्गिक हवा आणि इतर सुविधा
काही वर्षांपूर्वी अंबानी परिवार 25 व्या मजल्यावर राहत होते. परंतु आता ते 27 मजल्यावर शिफ्ट झाले आहे. कारण 27 व्या मजल्यावर सर्वांसाठी वेगवेगळे फ्लॅटसारखी घरे आहेत. 27 मजल्यावर असणारे रुम मोठे आहेत. सर्वात महत्वाची गोष्टी म्हणजे या ठिकाणी नैसर्गिक हवा चांगली आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने 27 मजला सर्वात सुरक्षित आहे.
कार पार्किंगसाठी काही मजले राखीव
अंबानी कुटुंबाच्या एंटीलियामध्ये कोणीला प्रोटोकॉलनंतर प्रवेश दिला जातो. परंतु 27 व्या मजल्यावर जाण्याची संधी खूप कमी लोकांना मिळते. एकूण चार लाख फूट पसरलेला एंटीलियामध्ये सर्व प्रकारच्या लग्झरी सुविधा आहेत. काही मजले फक्त कार पार्किंगसाठी आहेत. या घरात नऊ हायस्पीड लिफ्ट (एलिवेटर) लावले आहेत. एंटीलियामध्ये स्विमिंग पूल, स्पा, योगा स्टुडिओसह इतर अनेक सुविधा आहेत. 50 आसनांचे थिएटर, टेरेस गार्डन्स हे यामध्ये आहे. आठ रिश्टर स्केलचा भूकंप ही इमारत सहन करू शकते.
कामासाठी एकूण 600 कर्मचारी
एंटीलियामध्ये कामासाठी एकूण 600 कर्मचारी आहेत. त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. एटीलियामध्ये हेलीकॉप्टर उतवण्यासाठी 3 हेलीपॅडची निर्मिती केली गेली आहे. 2008 मध्ये एंटीलियाच्या बांधकामास सुरुवात झाली होती. केवळ दोन वर्षांत म्हणजे 2010 मध्ये हे घर बांधून तयार झाले. अटलांटिक महासागरत असणाऱ्या एका बेटाच्या नावावर मुकेश अंबानी यांनी आपल्या घराचे नाव एंटीलिया ठेवले आहे.