Agneepath Scheme: नेव्ही फिमेल सेलर्स! नेव्ही मध्ये पहिल्यांदा महिलांना खलाशी व्हायची संधी, लवकरच भरती सुरु
या रिक्त पदावर निवड झालेल्या उमेदवारांना INS चिल्का इथे प्रशिक्षण दिले जाईल. विशेष म्हणजे ही भरती अग्निपथ योजनेंतर्गत केली जाणार आहे.
भारतात अग्निपथ योजना (Agneepath Scheme) सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत नौदलात प्रथमच मुलींची भरती होणार आहे. भारतीय नौदलात, ही भरती खलाशी (Navy Female Sailors) या पदांवर केली जाईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ओडिसाच्या INS चिल्काच्या (INS Chilka) नावाने नोटीस जारी करण्यात आली आहे. या भरतीबाबत संरक्षण मंत्रालयाने आयएनएस चिल्का या नौदल प्रशिक्षण संचालनालयाला सूचना दिल्या होत्या. या रिक्त पदावर निवड झालेल्या उमेदवारांना INS चिल्का इथे प्रशिक्षण दिले जाईल. विशेष म्हणजे ही भरती अग्निपथ योजनेंतर्गत केली जाणार आहे. अग्निपथ योजना सुरू झाल्यानंतर देशभरात तणावाचे वातावरण होते अनेक ठिकाणी अजूनही या योजनेला विरोध होताना दिसून येतोय. एका वृत्तानुसार, एका बॅचमध्ये नेव्ही फिमेल सेलर्सची (महिला खलाशांची) नियुक्ती केली जाईल. यामध्ये पद आणि पदाचे नावंही दाखविण्यात आलंय. फेब्रुवारी 2023 मध्ये पहिली तुकडी येणार असून, त्यासाठी तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नेव्ही फिमेल सेलर्स (नौदलातील महिला खलाशी)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नौदल प्रशिक्षण संचालनालय, INS चिल्का यांना संरक्षण मंत्रालयाने पुरुष-महिला खलाशांच्या भरतीबाबत निर्देश दिले आहेत. मात्र, पुरुष-महिला अग्निवीरांच्या प्रशिक्षणासाठीचे मापदंड बदललेले नाहीत. आयएनएस चिल्काकडे सर्व उमेदवारांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी देण्यात आलीये. नौदलात महिला आधीच सेवा देत आहेत, परंतु अधिकारी पदापेक्षा खालच्या पदावर कोणीही नाही.
या पदांसाठी भरती
- एव्हिएशन नॉन टेक्निक
- एव्हिएशन टेक्निक
- लॉजिस्टिक
- संगीतकार
- वैद्यकीय
जुलैमध्ये नौदलातील अग्निवीर भरती
- भारतीय नौदलातील नौदल अग्निवीर बॅच 2022 साठी तपशीलवार अधिसूचना 9 जुलै रोजी जारी केली जाईल.
- अग्निवीर 1ल्या बॅचसाठी अर्जाची विंडो 15 जुलै ते 30 जुलै 2022 पर्यंत खुली असेल.
- वेळापत्रकानुसार नौदलातील अग्निवीर भरतीची लेखी परीक्षा ऑक्टोबरच्या मध्यात होण्याची शक्यता आहे.
- वैद्यकीय चाचणी आणि प्रवेश 21 नोव्हेंबर 2022 रोजी INS चिल्का (ओडिशा) येथे होईल.
भारतीय वायुसेनेची भरती
अग्निपथ योजनेबाबत भारतीय सैन्यानंतर आता भारतीय वायुसेनेने (IAF) देखील अधिसूचना जारी केली आहे. 24 जून ते 05 जुलै या कालावधीत एअरफोर्समध्ये भरतीसाठी नोंदणी होईल. 10वी पास ते डिप्लोमा धारक किंवा व्यावसायिक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्जाची प्रक्रिया अधिकृत वेबसाइट agnipathvayu.cdac.in वर सुरू होईल. भरतीचे संपूर्ण वेळापत्रक संकतेस्थळावर दिले आहे.